Jhimma 2 Parkinson Meaning, How It Happens: दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या झिम्माचा दुसरा भाग अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीस आला. हसता हसता रडवणारा आणि रडताना पुन्हा आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा झिम्मा २ सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. सिनेमाचा टर्निंग पॉईंट ठरणारा एक मुद्दा म्हणजे यातील एका अत्यंत प्रिय पात्राला पार्किनसन आजाराचे निदान असल्याचे कळते. झिम्मा २ च्या माध्यमातून समोर आलेला हा आजार काय आहे व नेमका कोणाला त्याचा धोका असतो याविषयी अनेकांना प्रश्न पडला असेलच. या आजराचे स्वरूप गंभीर असूनही अजूनही याविषयीची जागरूकता फार कमी आहे. यासाठी दरवर्षी ११ एप्रिलला जागतिक पार्किनसन दिवस साजरा केला जातो. आज आपण झिम्मा २ चित्रपटाच्या निमित्ताने या आजाराविषयी प्रत्येकाला माहित असायला हव्यात अशा काही घटकांची माहिती तज्ज्ञांकडून घेणार आहोत.

डॉ व्ही पी सिंग, इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस, मेदांता, गुरुग्रामचे अध्यक्ष, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला पार्किनसन या आजाराविषयी दिलेली माहिती पाहूया..

RRC NCR Apprentice Recruitment 2024: Apply for 1679 posts at rrcpryj.org know how to apply
RRC NCR Recruitment 2024: रेल्वेत १६७९ रिक्त पदांची भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
Dentists are challenged to perform cosmetic and hair transplant surgery Mumbai print news
दंतचिकित्सकांना सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याला आव्हान
Trigrahi Yog 2024
Trigrahi Yog 2024 : ५० वर्षानंतर कन्या राशीमध्ये बनतोय त्रिग्रही योग, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
Strong economic growth opportunities Financial sector in economics
लेख: …तरच सशक्त आर्थिक वाढीच्या भरपूर संधी!
retirement planning, financial freedom, emotional aspects, senior financial planning, peace of mind, financial mentor, heritage, family values, mental preparation,
निवृत्तीच्या उंबरठ्यावरचं अर्थकारण!
lokrang
पडसाद: तार्किक बुद्धी वापरावी
Indian society, Ramayana, Mahabharata, positive ideals, negative tendencies, Rama, Krishna, Ravana, Duryodhana, social consciousness, judicial system, cultural influence,
रावणाच्या मर्यादांची प्रतिष्ठापना आज आवश्यक आहे…

पार्किनसन्स म्हणजे काय?

१८१७ मध्ये जेम्स पार्किनसने वर्णन केल्याप्रमाणे, हा एक प्रकारचा पक्षाघात (पॅलसी) आहे. एक असं रेडिएशन ज्यामुळे शरीराला हादरे बसून हात-पाय थरथरतात. हे सहसा वयाच्या साठीनंतर उद्भवते, परंतु अलीकडे लहान वयोगटांमध्ये देखील हा आजार आढळून आला आहे.

काय आहेत कारणे?

पार्किनस ही मेंदूचा डिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे जो डोपामाइन नावाचे रसायन कमी झाल्यावर उद्भवते. या स्थितीचे नेमके कारण अद्याप शोधले गेलेले नाही, परंतु काही प्रकरणांमध्ये, अनुवांशिक घटक आणि पर्यावरणीय विषारी घटक जसे की कीटकनाशके, हवेतील रसायनांचा संपर्क इ. गोष्टी या आजाराला कारणीभूत ठरत असल्याचे आढळून आले आहे.

लक्षणे काय आहेत?

पार्किनसन्सच्या लक्षणांमध्ये हालचालींसंबंधित व मानसिक अशा दोन्ही घटकांचा समावेश होतो. हालचाल करण्यास अडथळा ठरणारे त्रास हे मुख्यतः स्नायूंशी संबंधित आहेत, ज्यामुळे शरीरात कडकपणा येतो, अंग थरथरणे, हात आणि पायांची सुन्नता, चालण्यात अडचण, वारंवार पडणे आणि दैनंदिन कामात संथपणा येणे ही याची प्राथमिक लक्षणे आहेत. तर मानसिक चिन्हे आजाराच्या प्रगत (पुढील) टप्प्यात आढळतात ज्यामुळे वर्तणूक आणि मानसिक समस्या उद्भवतात. काही लोकांना नंतरच्या टप्प्यात नैराश्य, तीव्र चिंता आणि स्मृतिभ्रंशाचाही अनुभव येतो.

पार्किनसन्सचे निदान कसे होते?

पार्किनसन्सचे निदान करण्यासाठी कोणतीही विशिष्ट चाचणी नाही. पण क्लिनिकल तपासणीमध्ये मेंदूचा एमआरआय आणि डोपा पीईटी स्कॅन चाचणी केली जाते ज्यामध्ये मेंदूमधील डोपामाइनची पातळी मोजकली जाते. या स्कॅनद्वारे डोपामाइनच्या पातळीत लक्षणीय बदल आहेत का हे तपासले जाते. कारण हा पार्किनसन्सचे निदान करण्याचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.

पार्किनसन्सच्या उपचारांमध्ये काय समाविष्ट आहे?

पार्किन्सन्सच्या उपचारामध्ये लेव्हो डोपा नावाच्या औषधांचा समावेश होतो, ज्यामध्ये डोपामाइनची संयुगे असतात जी मेंदूमध्ये डोपामाइनमध्ये रूपांतरित होतात. डोपामाइन शरीरातील हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदार आहे. रुग्ण औषधांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये, औषधोपचारानंतरही डोपामाइनची पातळी कमी होते, ज्यामुळे स्थिती आणखी वाईट होते, लोक औषधांना प्रतिसाद देत नाहीत आणि शरीराच्या हालचालींमध्ये अडथळे येऊ शकतात.

ही स्थिती सामान्यतः ८- १० वर्षांच्या औषधानंतर अगदी नंतरच्या टप्प्यात उद्भवते, टी सुद्धा काहीच मोजक्या प्रकरणांमध्ये. अशा प्रकरणांवर डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) द्वारे उपचार केले जातात. DBS तरुणांमध्ये अधिक फायदेशीर ठरले आहे कारण त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. पार्किनसन प्लस नावाची आणखी एक स्थिती आहे ज्यामध्ये डोपामाइन बरोबरच मेंदूतील इतर प्रणालींवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत असलेले रुग्ण दोन्ही उपचारांना प्रतिसाद देत नाहीत.

डीबीएस तंत्रज्ञान काय आहे?

डीबीएस ही एक उच्चस्तरीय शस्त्रक्रिया आहे ज्याने पार्किनसन्सच्या रूग्णांमध्ये काही उल्लेखनीय प्रभाव सिद्ध केले आहेत. शस्त्रक्रियेची किंमत तुलनेने जास्त आहे, परंतु प्रगत प्रकरणांमध्ये तत्काळ परिणाम प्रदान करणारे हे तंत्रज्ञान खूप प्रभावी मानले जाते. उपचार प्रक्रियेतील आणखी एक प्रगती म्हणजे सीटी पीईटी इमेजिंग जी मेंदूतील सध्याच्या डोपामाइनची पातळी तपासण्यात मदत करते.

पार्किनसन्स आयुष्यभर बरा होत नाही का?

दुर्दैवाने, होय. स्थिती पूर्णपणे बरी होऊ शकत नाही, केवळ रुग्णाला कार्यक्षम बनवण्यासाठी नियंत्रित केली जाऊ शकते.

हे ही वाचा<< डायबिटीसचा स्त्री व पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर नेमका कसा परिणाम होतो? बाळंतपणानंतर काय धोका असतो, वाचा

पार्किनसन्स रोग प्रतिकारशक्तीशी कसा संबंधित आहे?

पार्किन्सन्स हा रोगप्रतिकारक शक्तीशी कोणताही संबंध नसलेला डिजनरेटिव्ह विकार आहे. तथापि, नियमित शारीरिक व्यायाम, श्वासोच्छवासाचे व्यायाम, जीवनशैलीच्या चांगल्या सवयी आणि सकस आहारामुळे रोगाचा विकास दर कमी होण्यास मदत होते.