Viral Video : उन्हाळ्यात घरात डास खूप येतात आणि डासांपासून रोगराई पसरते. अशात आरोग्य जपायचे असेल तर डासांपासून दूर राहणे गरजेचे आहे. डासांपासून वाचवण्यासाठी आपण अनेकदा घरगुती उपाय करतो पण काहीवेळा त्याचा काहीही फायदा होत नाही. सोशल मीडियावर डासांना पळवण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये फक्त एका कांद्याचा वापर करून तुम्ही डास पळवू शकता. तुम्हाला वाटेल ते कसं शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (Jugaad Video get rid of mosquitoes at home by using single onion)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

prajakta_salve_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये डास आणि माशांपासून सुटका करण्यासाठी एक घरगुती उपाय सांगितला आहे. एका कांद्याच्या मदतीने डास कसे पळवता येईल, हे तुम्हाला या व्हिडीओतून दिसून येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

सुरुवातीला एक कांदा घ्या. त्यानंतर कांद्याची खालची बाजून थोडी कापून घ्या त्यानंतर एका छोट्या चमच्याने कांद्याच्या आतील भाग थोडा काढून घ्या. त्यानंतर तीन कापूरच्या गोळ्या घ्या. त्यात दोन तीन लवंग घ्या. कापूरच्या गोळ्या आणि लवंग बारीक वाटून घ्या. त्यानंतर एका प्लेटमध्ये कांटा ठेवा. कांद्याचा आतील भाग काढल्यामुळे कांद्याला वाटीसारखा आकार येईल.त्यात थोडं तेल टाका आणि कापूर आणि लवंगचे बारीक केलेले मिश्रण त्यात टाका. त्यानंतर वात घ्या आणि दिवा लावा. संध्याकाळी हा दिवा लावल्याने घरातील डास गायब होतील. डासांपासून सुटका मिळवायची असेल तर घरगुती उपाय फायद्याचा ठरू शकतो.

हेही वाचा : Zomato कडून मोठी चूक; शाकाहारी गर्भवती महिलेला पाठवली नॉनव्हेज थाळी; Photo शेअर करीत पती म्हणाला, “माझ्या पत्नीला त्रास…”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : मोबाईलचा डिस्प्ले गेल्यावर आता काळजी करु नका; पैसे खर्च न करता फक्त ‘हा’ जुगाड करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आम्ही केला होता हा उपाय तर पूर्ण बिल्डींगमध्ये माशा गोळा झाल्या होत्या” तर एका युजरने लिहिलेय, “मी हा घरगुती उपाय केला तर कांद्यावर माशा बसायला लागल्या” आणखी एका युजरने लिहिलेय, “आतापर्यंत खूप दिवे लावलेत, कांद्याचा राहिला होता फक्त”

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jugaad video get rid of mosquitoes at home by using single onion video goes viral on social media ndj