Junk Food Cravings : हल्ली लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना बाहेरचं जंक फूड खायला आवडतं. जंक फूडचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो हे माहीत असूनही लोक ते आवडीने खातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, जंक फूड खाण्याची इच्छा रात्रीच कशी होते. सकाळीच सकाळी लवकर आपल्याला जंक फूड खावंसं का वाटत नाही. याच विषयावर दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना बेंगळुरूमधील एस्टर व्हाइटफील्ड हॉस्पिटलच्या चीफ क्लिनिकल डाएटिशियन वीणा व्ही. यांनी सविस्तर माहिती दिली आहे. डाएटिशियन वीणा यांनी सांगितले की, सामान्यतः आपल्याला सकाळी जंक फूड खाण्याची इच्छा होत नाही. कारण- रात्री झोपेनंतर आपले शरीर संतुलनावर अधिक लक्ष केंद्रित करत असते. सकाळी आपण जेव्हा जागे होतो तेव्हा आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झालेले असते आणि ते स्थिर राखण्यासाठी आपल्याला संतुलित आहार सेवन करण्याची इच्छा होते. त्यामुळेच सामान्यतः बहुतेक वेळा सकाळच्या वेळी आपले शरीर साखरयुक्त किंवा चरबीयुक्त पदार्थांच्या नाही तर प्रोटीन, कार्बोहायड्रेट्ससारखी मॅक्रोन्यूट्रिएंट्स शोधत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डाएटिशियन वीणा यांनी स्पष्ट केले की, आपल्या शरीरात लेप्टिनचे प्रमाण जास्त असते, जे आपली भूक कमी करते; पण घ्रेलिनचे प्रमाण कमी होताच आपली भूक वाढते. झोपेनंतर आपल्याला डिहायड्रेटदेखील होते. म्हणूनच आपण उठल्यानंतर नैसर्गिकरीत्या हायड्रेटिंग आणि पौष्टिक पदार्थांच्या शोधात असतो. पण, दिवसाच्या शेवटी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होत असल्याने भावनिक ट्रिगर सुरू होतो. अशाने जंक फूड खाण्याची लालसा वाढते.

पण असे का होते?

बहुतेक वेळा आपल्या शरीरातील हार्मोन्स चांगल्या प्रकारे कार्य करीत असतात, त्यामुळे जंक फूडची इच्छा कमी होण्यास मदत होते. पण, जेव्हा रक्तातील साखरेची पातळी बिघडते, कमी झोप, पौष्टिक घटकांची कमतरता व भावनिक ट्रिगर्स यांसारख्या घटकांमुळे हार्मोनल असंतुलन होते; असावेळेस जंक फूड खाण्याची इच्छा वाढते.

उदाहरणार्थ, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी असंतुलित झाली, तर अशा वेळी शरीराला जलद ऊर्जेच्या स्रोतांची आवश्यकता भासू शकते. अशा वेळी तुमचे शरीर रक्तातील साखरेची पातळी कमी असल्याचे दर्शवू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही साखरेची पातळी पटकन वाढवण्यासाठी उच्च कॅलरीजयुक्त पदार्थांचा वापर करू शकता. त्यात साखरयुक्त पेये किंवा सकाळचा चहा या गोष्टींचा समावेश करू शकता. कारण- त्यात जास्त साखर असते, असेही वीणा म्हणाल्या.

कमी झोप ही आणखी एक सामान्य समस्या आहे. जेव्हा शरीरास पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा घ्रेलिन हा हार्मोन तुमची भूक वाढवतो. सामान्यतः सकाळी घ्रेलिनची पातळी कमी असते; परंतु हार्मोनल असंतुलन वाढू शकते, ज्यामुळे भूक वाढते. खाण्याची इच्छा वाढवणाऱ्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे मॅग्नेशियम किंवा प्रोटीनसारख्या आवश्यक पोषक घटकांची कमतरताही दर्शवली जाते.

बंगळुरू येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स एडविना राज म्हणाल्या की, रात्रीच्या जेवणात सामान्यतः पुरेसे फायबर, प्रथिने व कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ नसतात तेव्हा जेवणानंतर मिठाई आणि साखरयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. एका संशोधनानुसार, रात्रीच्या जेवणासाठी पॉलिश केलेले तांदूळ, मैद्यापासून तयार केलेले पदार्थ किंवा कमी प्रोटीनयुक्त भाज्या म्हणजे बटाट्यासारख्या रिफाइंड कार्बोहायड्रेट्सवर जास्त लक्ष केंद्रित केले, तर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते आणि त्यानंतर साखरेची पातळी झपाट्याने कमी होते.

ही एक वर्तणुकीची समस्यादेखील असू शकते, ज्यात बहुतेकांना जेवणानंतर गोड मिठाई खाण्याची सवय असते. त्यामुळे त्यांना चांगलेही वाटते; पण शरीरात डोपामाइन स्रावामुळे तुम्ही अशा सवयींच्या आहारी जाता. डोपामाइन हे फील गुड हार्मोन म्हणून ओळखले जाते, जे अनेकदा साखरेची लालसा वाढवते. क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स एडविना राज म्हणाल्या की, संध्याकाळच्या वेळेत जंक फूड खाण्याची इच्छा अधिक असते; पण असंतुलित खाण्याच्या सवयी, फायबर व प्रोटीनच्या कमतरतेमुळे असे होते. दीर्घकाळ उपवास केल्याने आवडते पदार्थ जास्त प्रमाणात खाण्याची इच्छा वाढते, तसेच अवेळी द्रवपदार्थांचे सेवन केल्याने भूक लागल्याची भावना निर्माण होऊ शकते.