कढीपत्ता(Curry leaves) ज्या पदार्थांमध्ये वापरला जातो त्यांची चव वाढवितो. पण आरोग्यासाठी त्याचे अनेक गंभीर फायदे देखील देतात. वजन कमी करणे आणि हृदयाच्या आरोग्याला चालना देण्यापासून ते सकाळी जाणवणारा थकवा आणि जंतूच्या संसर्गाशी लढा देण्यापर्यंत – त्याच्या फायद्यांची यादी मोठी आहे!
या आणि कढीपत्त्याच्या इतर असंख्य आरोग्य फायद्यांवर प्रकाश टाकत, आहारतज्ञ मॅक सिंग यांनी इंस्टाग्रामवर एक यादी शेअर केली. “कढीपत्ता हा कोणत्याही भारतीय खाद्यपदार्थात वापरले जाणारा नैसर्गिक चव वाढवणारा पदार्थ आहे.” असे त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले.
कढीपत्त्याचे आरोग्य फायदे (Health benefits of curry leaves)
सिंग यांनी शेअर केल्याप्रमाणे कढीपत्त्याचे आरोग्यासाठी फायदे पहा:
- पोटाची चरबी कमी करते: कढीपत्त्याच्या परिणामकारकतेवर संपूर्ण संशोधन झाले आहे. “अँटीओबेसिटी आणि लिपिड लोअरिंग इफेक्ट्स ऑफ मुरराया कोएनिगी” या संशोधनानुसार, कढीपत्यामध्ये असणारे संयुग कार्बाझोल अल्कलॉइड्स हे लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतात आणि लठ्ठपणा वाढवणाऱ्या ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी करतात.
- सकाळी जाणवणार थकवा कमी करते: कढीपत्त्यांमध्ये क्षारीय गुणधर्म असतो, याचा अर्थ ते गॅस आणि पोट फुगणे यावर उपचार करतात, त्यामुळे पचनास मदत होते. अपचन हे सकाळी येणाऱ्या थकव्याचे आणि मळमळण्याचे प्रमुख कारण आहे. गरोदर स्त्रियांनी हे लक्षात ठेवावे.
- त्वचेच्या जखमा बरे करतात: कढीपत्त्यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असल्याने, त्यांची पेस्ट जळजळ, जखमांवर उपचार करण्यासाठी वापरली जाऊ शकते. कढीपत्ताच्या लेप मधमाशीचा डंख आणि विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांच्या चाव्याच्या बाबतीतही उपयुक्त आहे. याशिवाय, हे तोंडाच्या अल्सरवर उपचार करण्यास देखील मदत करते.
- कोलेस्टेरॉल कमी करते: त्याच संशोधनात सिद्ध केल्याप्रमाणे, कढीपत्त्यात असलेले कार्बाझोल अल्कलॉइड्स कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडेशन रोखतात, ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल कोलेस्टेरॉल वाढते. यामुळे हृदयाशी संबंधित विकारांचा धोका टळतो.
- बॅक्टेरियाच्या संसर्गाशी लढा देते: आणखी एका संशोधनात असे दिसून आले आहे की, कढीपत्ता ई. कोलाई आणि स्टॅफिलोकोकस ऑरियस सारख्या जिवाणूंच्या स्ट्रेनमुळे होणाऱ्या संसर्गाविरूद्ध शक्तिशाली क्रिया करतो. दोन्ही कार्बाझोल अल्कलॉइड्स आणि दुसरे संयुग — लिनालूल — फ्रि रॅडिकल्स आणि हानिकारक जीवाणू नष्ट करण्यासाठी ओळखले जातात.
- यकृताचे रक्षण करते: कार्बाझोल अल्कलॉइड्स आणि टॅनिन नावाची संयुगे यकृतावर हेपेटोप्रोटेक्टिव्ह प्रभाव देतात. ते यकृत सिरोसिसच्या पारंपारिक उपचारांमध्ये देखील उपयुक्त आहेत.
- मधुमेहावर उपचार करते: कढीपत्ता, रिकाम्या पोटी घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे वरदान मानले जाते.
- कॅल्शियमच्या कमतरतेवर उपचार करते: कढीपत्त्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते (830 mg/100 g).
हेही वापरा: पॅनिक अटॅक आणि एंग्झायटी अटॅक, दोन्हीमध्ये काय आहे फरक?
कढीपत्ता आणि वजन कमी (Curry leaves and weight loss)
इंडियान एक्सप्रेसोबत संवाद साधताना, नवी मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमधील सल्लागार, आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ प्रतीक्षा कदम यांनी सांगितले की, “कढीपत्त्यात कॅलरीज कमी असतात आणि फायबरचा चांगला स्रोत असतो, ज्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे आणि समाधानी वाटण्यास मदत होते, एकूण कॅलरी सेवन कमी होण्याची संभाव्यता निर्माण होते. याव्यतिरिक्त, काही संशोधन असे सूचित करतात की, कढीपत्ता रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते, ज्याचा वजन व्यवस्थापनावर देखील सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
तसेच, त्यांनी स्पष्ट केले की, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की आपल्या आहारात फक्त कढीपत्ता जोडल्याने स्वतःहून लक्षणीय वजन कमी होण्याची शक्यता नाही. “वजन कमी करण्यासाठी, निरोगी आणि संतुलित आहार, नियमित शारीरिक क्रियाकलाप आणि इतर जीवनशैली घटक जसे की, तणाव व्यवस्थापन आणि पुरेशी झोप यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे.”
कढीपत्ता वजन कमी करण्यास कशी मदत करू शकते हे स्पष्ट करताना, हैदराबादच्या हाय-टेक सिटी केअर हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ, समीना अन्सारी सांगतात की, या“कढीपत्त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. ते अँटिऑक्सिडंट्सचे समृद्ध स्त्रोत आहेत आणि त्यांच्यात दाहक-विरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म आहेत. कढीपत्ता पचन सुधारण्यास, हृदयविकाराचा धोका कमी करण्यास आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. ते डोळे, त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. याव्यतिरिक्त, ते वजन कमी करण्यात मदत करू शकतात कारण त्यात कार्बाझोल अल्कलॉइड्स असतात, ज्यात लठ्ठपणाविरोधी गुणधर्म असल्याचे दर्शविले गेले आहे. याव्यतिरिक्त, कढीपत्ता पचन आणि चयापचय सुधारण्यास मदत करू शकते, जे वजन कमी करण्यास देखील मदत करू शकते.
हेही वाचा – ३ हटके पद्धतीने घरीच तयार करा लिंबू पाणी; उन्हाळ्यासाठी सर्वात्तम पेय
लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
कढीपत्ता खाण्यासाठी सामान्यतः सुरक्षित असले तरी, काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. असे अन्सारी यांनी सांगितले.
- कोणत्याही प्रकारची घाण किंवा कीटकनाशके काढून टाकण्यासाठी कढीपत्ता खाण्यापूर्वी ते चांगले धुवावे.
- ते कमी प्रमाणात सेवन केले पाहिजेत, कारण त्यांना कडू चव असू शकते आणि काही लोकांमध्ये पचन समस्या उद्भवू शकतात.
- गर्भवती स्त्रिया आणि विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती असलेल्या व्यक्तींनी कढीपत्ता किंवा इतर कोणतेही हर्बल उपचार घेण्यापूर्वी आरोग्यसेवा व्यावसायिकांचा