Karan Singh Grover On Daughter Devi’s Surgery: अभिनेता करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसू यांच्या लहान लेकीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अलीकडेच एका मुलाखतीत करण सिंग ग्रोवरने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला होता. तर, मागच्या वर्षी बिपाशाने मुलीच्या आरोग्याबाबतची मोठी माहिती उघड केली होती. आता तिचा पती करणने मुलगी देवी हिच्यावर करण्यात आलेल्या ओपन हार्ट सर्जरीबद्दलचा अनुभव सांगितला आहे. देवीच्या हृदयात जन्मापासूनच दोन छिद्रे असल्याने तिच्यावर सर्जरी करण्यात आली असल्याचे करणने नुकतेच सांगितले.
ग्रोव्हरने दैनिक भास्करला सांगितले की, त्याच्या मुलीने लहान वयात जे काही सहन केले, ते तो शब्दांत व्यक्त करू शकत नाही. त्यांच्या मुलीच्या छातीवर एक लांबलचक जखम आहे, जी पोटापर्यंत आहे. त्याची मुलगी आणि पत्नी बिपाशाने खूप त्रास सहन केला आहे. अभिनेता, त्यांची लेक खरी लढाऊ आहे, असेही म्हणाला. पण, करण आणि बिपाशाने हिंमत कायम ठेवली. त्यांनी कधीही हिंमत तुटू दिली नाही. बिपाशा बासूने लग्नाच्या सहा वर्षांनंतर मुलीला जन्म दिला. तिचे नाव त्यांनी देवी, असे ठेवले.
शस्त्रक्रियेनंतर मुलाची काळजी घेण्यासाठी केवळ शारीरिक उपचारच नव्हे, तर त्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याकडे लक्ष देणेदेखील आवश्यक असते. पालकांनी त्यांच्या मुलाच्या दीर्घकालीन आरोग्याविषयीच्या चिंता दूर केल्या पाहिजेत, तणावाचे व्यवस्थापन केले पाहिजे आणि त्यांच्या अपत्याच्या पुनर्जीवनप्तीच्या प्रवासादरम्यान मुलाला सुरक्षित आणि आधार वाटेल, या दृष्टीने त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कॅडाबॅम्स माइंड टॉकचे वरिष्ठ सल्लागार व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अरुण कुमार यांनी अशा प्रसंगी पालकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याविषयीची माहिती दिली आहे, ती आपण जाणून घेऊया…
(हे ही वाचा: रोज किती तास झोपल्याने कोलेस्ट्रॉल अन् मधुमेहाचा धोका होईल कमी? संशोधनातून मोठा खुलासा)
डॉ. कुमार म्हणतात, “हृदय शस्त्रक्रियेनंतरचे लगेचचे दिवस तुमच्या मुलाच्या बरे होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. योग्य डोस आणि वेळ यांचे योग्य रीतीने पालन होत असल्याची खात्री करून, औषधे काळजीपूर्वक द्या. तुम्हाला औषधांबद्दल काही चिंता किंवा प्रश्न असल्यास, तुमच्या मुलाच्या डॉक्टर किंवा फार्मासिस्टशी संपर्क साधण्याच्या बाबतीत अजिबात संकोच बाळगू नका.”
ते म्हणतात, निरोगी आहार बरे होण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. तुमच्या मुलाला पौष्टिक पदार्थ खाण्यास प्रोत्साहित करा आणि तुमचे अपत्य चांगले हायड्रेटेड राहील याबाबत दक्ष राहा. जर तुमचे मूल त्याच्या भुकेशी संघर्ष करीत असेल, तर वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
चिंता, भीतीपासून ते दुःख, थकवा यांपर्यंत अनेक भावनांचा अनुभव घेणे स्वाभाविक आहे. तुमच्या भावना कोंडून ठेवू नका; तुमचा जोडीदार, मित्र, कुटुंब किंवा थेरपिस्टशी त्याबाबत स्पष्टपणे बोला. तुम्ही चिंता, नैराश्य किंवा इतर मानसिक आरोग्याच्या आव्हानांशी झुंज देत असाल, तर संबंधित व्यावसायिकांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. एक थेरपिस्ट तणावाचे व्यवस्थापन करणे आणि कठीण भावनांना तोंड देण्याबाबत मार्गदर्शन आणि समर्थन देऊ शकतो.
हृदयाची मोठी शस्त्रक्रिया झालेल्या मुलांना भीती आणि चिंता यांपासून दुःख आणि रागापर्यंत अनेक प्रकारच्या भावनांचा अनुभव येऊ शकतो. डॉ. कुमार यांनी शिफारस केल्यानुसार त्यांना मदत करण्यासाठी येथे काही धोरणे आहेत :
मुक्त संवाद : तुमच्या मुलाला त्यांच्या भावना उघडपणे आणि प्रामाणिकपणे व्यक्त करण्यास प्रोत्साहित करा. एक सुरक्षित जागा तयार करा; जिथे त्यांना त्यांच्या भीती आणि चिंता सामायिक करणे सोईस्कर वाटेल.
भावना सामान्य करा : तुमच्या मुलाला कळू द्या की, शस्त्रक्रियेनंतर घाबरणे, रागावणे किंवा दुःखी होणे या सामान्य बाबी आहेत. त्यांच्या भावनांची पुष्टी करा आणि त्यांना आश्वस्त करा की, तुम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी तेथे आहात.
शरीराची प्रतिमा : जर तुमचे मूल त्यांच्या शरीरातील प्रतिमेत बदल करीत असेल, तर त्याला आश्वासन आणि समर्थन द्या. त्यांच्या भावनांबद्दल त्यांच्याशी बोला आणि आवश्यक असल्यास व्यावसायिकाची मदत घेण्याचा विचार करा.
खेळ आणि सर्जनशीलता : तुमच्या मुलाला खेळात आणि सर्जनशील क्रियाकलापांमध्ये गुंतवून ठेवा; ज्यामध्ये त्याला त्याच्या भावना व्यक्त करणे शक्य होईल आणि त्याच्या अनुभवांवर प्रक्रिया करणे साधता येईल.