Karisma Kapoor Fitness : अभिनेत्री करिश्मा कपूर वयाच्या ५० व्या वर्षी देखील तरुण दिसते. आजही तिच्या त्वचेवरील तेज आणि तिच्या केसांची चमक कायम आहे. तिचा फॅशन सेन्स उत्तम आहे आणि अजूनही तंदुरुस्त आहे. पण, करिष्मा कपूरच्या सौंदर्याचे रहस्य काय, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. आपल्या सौंदर्याचे श्रेय ती आपल्या आई-वडिलांना देते. आहार आणि फिटनेसबाबत खूप कठोर मेहनत घेणे हा माझा फिटनेस मंत्र नाही, असे करिष्मा सांगते. “मी माझ्या फिटनेसला फारसे महत्त्व देत नाही. मला तरुण मुलींना हेच सांगायचे आहे. स्वत:ला उपाशी ठेवू नका. शरीरासाठी विषारी असू शकतात असे हिरव्या पालेभाज्यांचे रस आणि डिटॉक्स पेये पिऊ नका. प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे मी सर्व काही प्रमाणात खाते. मी मिठाई किंवा चॉकलेट कुकी खाईन. मला प्रत्येक गोष्ट संयमाने करायला आवडते. हीच माझी गुरुकिल्ली आहे,” कपूर म्हणाले.

ती पुढे म्हणाली, “मला आई-वडिलांकडून मिळालेला हा वारसा आहे. व्यक्तीने सकारात्मक असणे महत्त्वाचे आहे. कारण- त्यामुळे आंतरिक शांती मिळते. तुम्ही हसता तेव्हा तुम्हाला आतून आनंद वाटतो. मग तो आनंद तुम्ही इतरांना देता आणि त्यातून सकारात्मकता पसरवता.”

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
madhuri dixit mumbai home inside photos
माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर आतून कसं दिसतं? पाहा ५३ व्या मजल्यावरील अपार्टमेंटचा Inside Video
Deepika Padukone Ranveer Singh Reveals Baby Girl Name
दीपिका पादुकोण-रणवीर सिंह यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ठेवलं लाडक्या लेकीचं नाव; फोटो शेअर करत सांगितला अर्थ
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Arjun Kapoor Confirms Breakup With Malaika Arora
Video: ६ वर्षांचं नातं संपलं, मलायकाचं नाव ऐकू येताच राज ठाकरेंच्या शेजारी उभा असलेला अर्जुन कपूर म्हणाला…

हेही वाचा –जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

कोलकाता येथील ‘Fabulous Lives Vs Bollywood Wives’ या कार्यक्रमात कल्याणी साहा चावला व मिनी जुनेजा यांच्याशी बोलताना करिश्मा कपूरनेही तिच्या फिटनेस दिनचर्येबद्दल खुलासा केला. “मला योगा करायला आवडते. मी अजिबात जिममध्ये जाणारी व्यक्ती नाही. मी नेहमीच योगसाधना करीत आले आहे. माझा फिटनेस खूप खासगी आहे. तुम्हाला मी कुठेही जिमच्या कपड्यांमध्ये दिसणार नाही. माझ्यासाठी ती फक्त एक खासगी वेळ आहे. अर्थात, मी तंदुरुस्त राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते.”

संयम का आवश्यक आहे ते समजून घ्या (let’s understand why moderation is essential)

पौष्टिकतेसाठी एक समग्र दृष्टिकोन (A holistic approach) आवश्यक असतो. संतुलन आणि संयम यांवर लक्ष केंद्रित केलेला हा दृष्टिकोन ९० टक्के वनस्पती-आधारित, ३० टक्के लीन प्रोटीन व ५० टक्के संपूर्ण धान्य या प्रमाणात मॅक्रोन्यूट्रिएंट्सचे विभागणे दर्शवतो. याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना अहमदाबाद, झायडस हॉस्पिटल्स, मुख्य आहार तज्ज्ञ, श्रुती के. भारद्वाज यांच्या मते, “आहारातील हे संतुलन अत्यावश्यक पोषक घटक पुरवते आणि संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आहार घेताना प्रामुख्याने संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. आहारात फायबरचे सेवन वाढल्याने पाचक आरोग्य सुधारते आणि वजन व्यवस्थापनाचा अनुभव मिळू शकतो.”

हेही वाचा –Coriander Juice : खरंच कोथिंबिरीचा रस प्यायल्याने वजन कमी होते? जाणून घ्या, हा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर?

भारद्वाज यांनी लीन प्रोटीन्सचा समावेश करण्यावर भर दिला, जे स्नायूंचा विकास आणि दुरुस्तीच्या योगदानावर भर देतात. “संपूर्ण धान्य शाश्वत ऊर्जा आणि आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये प्रदान करते. या पथ्याचे सातत्याने पालन केल्याने चयापचय सुधारते, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि दिवसभर ऊर्जा पातळी कायम राहून, तुम्हाला ताजेतवाने असल्यासारखे वाटते,” भारद्वाज म्हणाले.

वैयक्तिक आरोग्य परिस्थिती आहारातील प्राधान्ये आणि जीवनशैली घटकांनुसार तुमची आहार योजना वैयक्तिक करणे आवश्यक आहे.

भारद्वाज यांनी लीन प्रोटीन्सचा समावेश करण्यावर भर दिला जे स्नायूंचा विकास आणि दुरूस्तीसाठी योगदान देते. “संपूर्ण धान्य हे शाश्वत ऊर्जा आणि आवश्यक सूक्ष्म अन्न द्रव्ये प्रदान करतात. या पथ्याचे सातत्याने पालन केल्याने चयापचय सुधारते, रोगप्रति
कारक शक्ती वाढवते. तसेच दिवसभर ऊर्जा पातळी कायम राहिल्याने ताजतवानेपणाची भावना वाढवते,” असे भारद्वाज म्हणाले.

हेही वाचा – एक्सपायरी डेट संपल्यानंतर बिस्किटे खाल्ल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा

प्रत्येक व्यक्तीची आरोग्य परिस्थितीनुसार आहारातील प्राधान्ये आणि जीवनशैली घटकांनुसार तुमची आहार योजना ठरविणे आवश्यक आहे. कोणताही विशिष्ट आहार सुरू करण्यापूर्वी नेहमीच योग्य त्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Story img Loader