Karwa Chauth Fasting: करवा चौथ हा एक पारंपरिक हिंदू सण आहे, जो संपूर्ण भारतातील विवाहित महिलांद्वारे साजरा केला जातो, विशेषतः उत्तरेकडील राज्यांमध्ये. या दिवशी महिलांद्वारे सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास केला जातो आणि विश्वास असा आहे की, यामुळे त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभते आणि त्यांचे आरोग्य निरोगी होते. जर तुम्ही हा उपवास करण्याची तयारी करत असाल, तर हा उपवास निरोगी आणि आरोग्यदायी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही कोणते पदार्थ खाऊ शकता?

उपवासाआधी (प्री-फास्ट)

प्रॅगमॅटिक न्यूट्रिशनच्या मुख्य पोषणतज्ज्ञ मीनू बालाजी यांनी उपवासाची मानसिक तयारी करण्यासाठी दीर्घ श्वासोच्छ्वास किंवा ध्यान यांसारख्या सजग क्रियाकलापांनी तुमचा दिवस सुरू करण्याची शिफारस केली आहे. “तुमच्या दिनक्रमाची आधीच योजना करून ठेवा आणि करवा चौथच्या दिवशी ऊर्जा राखून ठेवण्यासाठी तुमची कामे आधीच ठरवा आणि मेहनतीची कामे टाळा. तुमचं रुटीन अगदी सरळ सोपं ठेवा”, असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा… “गेले सहा दिवस मी बेडवर…”, रकुल प्रीत सिंगला झाली गंभीर दुखापत, इन्स्टाग्रामवर VIDEO शेअर करत दिली माहिती, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

बालाजी यांनी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स यांसारखे ऊर्जा देणारे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला. “पाच भिजवलेले बदाम, दोन खजूर, एक वाटी भाजी, ओट्स दलिया आणि एक ग्लास कमी लो-फॅट दूध वापरून पाहा. वैकल्पिकरित्या, ग्रीक योगर्टसह चिया सीड पुडिंग, ताज्या फळांचे तुकडे, नट्स आणि सुकामेवा असलेले पदार्थ यादरम्यान चांगले काम करतात,” असं बालाजी म्हणाल्या.

द क्लेफ्ट अँड क्रॅनिओफेशियल सेंटर आणि श्री बालाजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, चेन्नई येथील नोंदणीकृत आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांनी सांगितले की, उपवास करण्यापूर्वी लोकांनी ऊर्जा मिळवण्यासाठी संतुलित आहाराचा पर्याय निवडला पाहिजे. “टिकाऊ ऊर्जा मिळवण्यासाठी रोटी किंवा पोळी, प्रथिनेयुक्त पदार्थ जसे की जाड डाळ, पनीर किंवा दही यांना तुम्ही प्राधान्य देऊ शकता. जेवणात बाजरीचाही समावेश केला जाऊ शकतो,” असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा… ‘या’ आयड्रॉपचा वापर कराल तर चष्मा विसरून जाल? किंमत फक्त ३५० रुपये, तज्ज्ञ सांगतात ‘असा’ होईल फायदा

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उपवास करण्यापूर्वी हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे. दिवसभर डिहायड्रेशन टाळण्यासाठी नारळ पाणी, ताक किंवा साधे पाणी पिण्यावर भर द्या.

उपवासानंतर (पोस्ट-फास्ट)

एकदा उपवास संपला की, रीहायड्रेटिंग ही पहिली प्राथमिकता असते. साधे पाणी, नारळ पाणी किंवा लिंबू पाणी प्यावे, त्यानंतर हलके, पचायला सोपे जेवण घ्यावे. बालाजी यांनी पौष्टिक पदार्थांची भरपाई करण्यासाठी धान्य, प्रथिने आणि निरोगी फॅट्स यांचे संतुलित मिश्रण असलेले लहान भाग खाण्याचा सल्ला दिला; तर दीपलक्ष्मी यांनी मसूरचे सूप, खिचडी, दही किंवा पनीरसह रोटी, पपई आणि टरबूज यांसारख्या फळांसह डाळ असे पर्याय सुचवले.

कोणते पदार्थ टाळावेत?

तुमचा उपवास सोडल्यानंतर साखरयुक्त, खारट किंवा मसालेदार पदार्थ टाळणे चांगले आहे; कारण ते आम्लपित्तसारख्या पाचन समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. चहा किंवा कॉफीसारखी कॅफिनयुक्त पेयेदेखील वगळली पाहिजेत, कारण ते शरीराला निर्जलीकरण करू शकतात. उकडलेले कॉर्न, भाजलेले मखना किंवा स्प्राउट्स चाट यांसारखे लाईट स्नॅक्स निवडा. मिठाईसाठी लो-फॅट खीर किंवा गूळ घालून बनवलेले खजूर आणि नट्स असलेले लाडू हे आरोग्यदायी पर्याय आहेत. शांत प्रभावासाठी नियमित चहाच्या जागी कॅमोमाइल चहाची शिफारस बालाजी या करतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karwa chauth fasting what to eat during fasting pre and post fasting for karwa chauth 2024 dvr