Katrina Kaif black patch: केरळच्या कोची येथे नवरात्रीच्या उत्सवात कतरिना कैफने अलीकडेच हजेरी लावली होती. तरुण ताहिलियानी साडीत ती अतिशय सुंदर दिसत होती. या सगळ्यात कतरिनाच्या हातावरील एका काळ्या पॅचने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि अनेकांना प्रश्न पडला की हा पॅच नेमका काय आहे?

कतरिना कैफ फिटनेस पॅचसह दिसल्याने पॅचची प्रासंगिकता आणि तो प्रत्येकाने वापरावा की नाही हे समजून घेण्यासाठी आम्ही वैद्यकीय सल्ला घेतला.

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Girl hugged her mother with the help of AI
VIRAL VIDEO: ‘ती पुन्हा कधीच दिसणार नाही…’ AI च्या मदतीने आईला मारली मिठी, लेकीने शेअर केला व्हिडीओ
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं

हेही वाचा… नवरात्रीत उपवास करताय? कसा असावा नऊ दिवसांचा आहार? डॉक्टरांकडून जाणून घ्या

डॉ. श्रेय श्रीवास्तव, एमडी (इंटर्नल मेडिसिन), शारदा हॉस्पिटल, नोएडा यांनी indianexpress.com शी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी सांगितले की, असे पॅचेस प्रामुख्याने मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी डिझाइन केले जातात, परंतु त्यांच्या फिटनेस लेव्हलचं ट्रॅकिंग ठेवण्यास स्वारस्य असलेल्या कोणीही या पॅचचा वापर करू शकतात. हा फिटनेस पॅच आरोग्याच्या अनुकूलतेसाठी ग्लुकोजच्या पातळीचा ट्रॅक ठेवण्यास मदत करतो. “हा पॅच वापरण्यापूर्वी, डॉक्टर आणि हेल्थ केअर प्रोवायडर्सचा सल्ला घेणे योग्य आहे; विशेषतः जर वापरकर्त्याला मधुमेह नसेल. कारण योग्य संदर्भाशिवाय ग्लुकोज डेटाचा अर्थ लावल्यास अनावश्यक चिंता होऊ शकते,” असे डॉ. श्रीवास्तव म्हणाले.

पॅचची कार्ये काय आहेत?

रिअल-टाइम ग्लाइसेमिक मॉनिटरिंग : हे पॅचेस इंटरस्टिशियल फ्लुइडमधील ग्लुकोजच्या एकाग्रतेचे सतत निरीक्षण करतात, ग्लुकोजच्या डायनॅमिक्सवर चोवीस तास डेटा प्रदान करतात.

हायपो/हायपरग्लाइसेमिया चेतावणी : ॲप वापरकर्त्यांना हायपोग्लाइसेमिया (low blood glucose) किंवा हायपरग्लाइसेमिया (high blood glucose) च्या संभाव्य धोक्यांबद्दल सतर्क करू शकते.

ग्लायसेमिक व्हेरिएबलिटी इनसाईट्स : ॲप ग्लायसेमिक परिवर्तनशीलतेवर (variability) डेटा ऑफर करतो, वापरकर्त्यांना रक्तातील ग्लुकोजमधील चढ-उतार व्यवस्थापित करण्यात आणि अन्न सेवन, फिजिकल अ‍ॅक्टिविटी किंवा औषधांचा प्रभाव समजून घेण्यास मदत करतो.

डेटा इंटीग्रेशन : अनेक पॅच हेल्थकेअर प्रोवायडर प्रगत ग्लायसेमिक व्यवस्थापनासाठी एकात्मिक आरोग्य ॲप्ससह डेटा शेअर करण्यास अनुमती देतात.

मुख्य विचार

कॅलिबरेशन आवश्यकता : काही पॅच सिस्टम्सना केशिका रक्त ग्लुकोज चाचणी (capillary blood glucose test) वापरून नियतकालिक कॅलिब्रेशनची आवश्यकता असू शकते.

त्वचाविज्ञानविषयक प्रतिक्रिया : डॉ. श्रीवास्तव यांनी नमूद केले की, काही लोकांना ग्लुकोज मॉनिटरिंग सेन्सर वापरल्याने त्वचेच्या समस्या येऊ शकतात. जसे की त्वचेचा दाह होणे, अ‍ॅलर्जी होणे इ.

ग्लुकोजचे मोजमाप करताना होणारा उशीर : काही ग्लुकोज मॉनिटरींग पॅचेस थेट रक्तातील ग्लुकोजची पातळी न मोजता, पेशींच्या आसपासच्या द्रवामधील ग्लुकोजची पातळी मोजतात, यामुळे योग्य पातळी दर्शविण्यात विलंब होऊ शकतो; विशेषत: जेव्हा जेवणानंतर रक्तातातील साखरेची पातळी लगेच बदलते.

जीवनशैली सुसंगतता : हे डिव्हाइस तुमच्या जीवनशैलीला अनुकूल आहे याची खात्री करणे महत्त्वाचे आहे, विशेषत: पोहणे, खेळ किंवा जास्त घाम येणे यांसारख्या अ‍ॅक्टिविटीजसाठी. “डिस्पोजेबल सेन्सर दर ७ ते १४ दिवसांनी बदलले पाहिजेत,” असे डॉ. श्रीवास्तव म्हणाले.

(टीप : हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. आपल्या दिनचर्येत कोणताही बदल करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)