दैनंदिन आयुष्यात जास्तीत जास्त क्रियाशील राहण्याचे मार्ग आपण आज बघूया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरी असताना जास्तीत जास्त क्रियाशील कसं राहता येईल ?

-आपल्या घरातली दैनंदिन कामं योग्य प्रकारे (शरीराच्या कोणत्याही एका भागावर अवास्तव ताण येऊ न देता) आणि योग्य त्या साधनांची मदत घेऊन स्वतः कामं करणं.
-घरातली कामं जसं केर काढणं, लादी पुसणं, बागकाम करणं, ओटा स्वच्छ करणं, भांडी लावणं, सडा रांगोळी करणं अशी अनेक सोपी कामं शरीरातील महत्वाचे स्नायू आणि सांधे यांच्या उत्तम आणि सुसूत्रीत हालचाली घडवून आणतात.

बहुतेकवेळा संध्याकाळचा वेळ हा टीव्ही समोर सगळ्यांनी एकत्रितपणे घालविला जातो, यावेळी आपल्या आवडीच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळी ब्रेक लागला की उठून घरात एक चक्कर मारून या.

-शरीरातील महत्वाच्या स्नायूंचं (पोटरी आणि मांडीचे स्नायू) स्ट्रेचिंग करा, पायाच्या पंज्याची वर खाली हालचाल करा, मानेच्या सावकाश आणि नियंत्रित हालचाली करा. टीव्ही बघताना उभं राहून कपड्यांच्या घड्या घालणं किंवा कपड्यांना इस्त्री करणं अशी कामं करा.
-टीव्हीवरची चॅनल्स रिमोटने न बदलता उठून टीव्ही जवळ जाऊन बदला.
-फोन वर बोलताना उभं राहून किंवा चालत चालत बोला.
-बसून पुस्तक वाचण्याऐवजी घरामधे फिरत ऑडिओ बुक्स ऐका
-जेवायला आवर्जून खाली बसा, आणि सगळे जिन्नस स्वतहून ओट्यावरुन खाली घ्या आणि पुन्हा परत ठेवा.
-घरात पायर्‍या असतील तर आवर्जून चढ उतार करा
-कुठलंच काम हे सलग तासनतास करू नका, कितीही महत्वाचं काम असेल तरीही दर अर्ध्या तासाला शरीराची हालचाल करा.
-वर्क फ्रॉम होम करणार्‍यांनी आपल्या स्मार्ट वॉचमध्ये अॅक्टिविटी रिमायंडर सेट करा आणि दर अर्ध्या तासाला शरीराची स्थिती बदला, शक्यतो उठून चालून या.
-सोपे स्ट्रेचेस आणि व्यायाम करा, पाणी प्या. खांदे, कोपर, मनगट यांच्या हालचाली करा, थोडावेळ दूरच्या वस्तूंकडे बघा.
-घरचा व्यायाम करण्यासाठी योगा मॅट, डंबेल्स, जिम बॉल अस साहित्य आणून ठेवा आणि नियमितपणे वापरा

हेही वाचा : टॅटू काढायचा आहे पण भीती वाटते का? टॅटू काढणे खरंच सुरक्षित आहे का? टॅटूमुळे आरोग्याला काही धोका आहे का?

कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिस मध्ये जास्तीत जास्त क्रियाशील कसं राहता येईल ?

-प्रत्येक तासाला आपल्या खुर्चीवरून उठून एक फेरी मारून या
-कामाचे फोन बसून घेऊ नका किंवा करू नका, उभे राहून किंवा चालत फोन वर बोला
-एकाच इमारतीत किंवा एकाच मजल्यावर सहकार्‍यांशी प्रत्यक्ष जाऊन बोला , फोन करू नका.
-प्रत्येक वेळी पायर्‍यांचा वापर करा, लिफ्टचा वापर टाळा
-शक्य झाल्यास जेवणाचा डबा सकाळीच बरोबर आणू नका, पार्किंगमध्ये गाडीत ठेवा आणि लंचटाइम मध्ये चालत जाऊन डबा घेऊन या
-कामाच्या मीटिंग्स कॉन्फरन्स रूममधे न घेता , नवीन पद्धतीच्या ‘वॉकिंग’ किंवा ‘स्टँडिंग’ मीटिंग्स घ्या
-कामासाठी लागणार्‍या वस्तू डेस्क वर ठेवू नका, उदाहरणार्थ प्रिंटर जवळ ठेवू नका, प्रिंट घेण्यासाठी काही पावला चालत जा, स्टेशनरी स्वतःजवळ ठेवू नका.
-डस्टबिन्स आपल्या डेस्क जवळ ठेवू नका, प्रत्येक वेळी कचरा टाकण्यासाठी काही पावलं चालत जा.
-आपण आहोत त्या मजल्यावरचे वॉशरूम्स न वापरता खालच्या किंवा वरच्या मजल्यांवर पायर्‍या चढून किंवा उतरून जा
-गाडी कामाच्या ठिकाणापासून दूर पार्क करा आणि राहिलेलं अंतर चालत जा
-शक्य झाल्यास कामाच्या ठिकाणी स्टँड अप किंवा ट्रेडमिल डेस्क वापरा

हेही वाचा : बदलती जीवनशैली, प्रदूषणामुळे श्वसनविकाराचा धोका वाढतोय! आरोग्यतज्ज्ञ म्हणतात, वेळीच लस घ्या…

याव्यतिरिक्त सर्वसाधारणपणे क्रियाशील राहण्यासाठी

-शक्य झाल्यास आठवड्यातून एक दिवस सायकलने कामाला जा
-बस, किंवा ट्रेनने जाताना अर्धा प्रवास बसून आणि अर्धा प्रवास उभं राहून करा
-आठवड्यातून एकदा भाज्या, फळं स्वतः बाजारात जाऊन, फिरून विकत घ्या, आणि सामानाच्या पिशव्या स्वतः उचलून चालत घरी या
-ऑनलाइन कपडे ऑर्डर करण्यापेक्षा बाजारात किंवा मॉलमध्ये भरपूर फिरून मग कपडे विकत घ्या
-आठवड्यातून एकदा शहरातल्या उंच टेकडीवर फिरायला जा

हेही वाचा : बटाट्याच्या फेस पॅकने चेहऱ्यावरील काळे डाग, मुरम, सुरकुत्या होतात का? त्वचारोगतज्ज्ञ काय सांगतात एकदा वाचा

वरच्या सगळ्या उपायांमधले एक किंवा दोन वगळता बाकी उपाय हे अतिशय प्रॅक्टिकल आणि सहज साध्य होण्यासारखे आहेत. क्रियाशील राहणं ही फार क्लिष्ट किंवा अवघड गोष्ट नसून विचारपूर्वक निर्णय आहे !