water diet pros and cons : वजन कमी करण्यासाठी अनेक लोक खूप प्रयत्न करत असतात; पण अनेकदा त्यांचे आरोग्यासकडे दुर्लक्ष होते. अनेकदा काही जण सोशल मीडियावर सांगितल्या जाणाऱ्या डाएटिंग टिप्स किंवा ट्रेंड आधंळेपणाने पाळतात आणि स्वत:चा जीव धोक्यात घालतात. असाच काहीसा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. केरळमधील एका १८ वर्षीय मुलीने दीर्घकाळापासून Water Diet (फक्त पाणी पिऊन उपवास करणे) केले आणि ऑनलाइन वजन कमी करण्याच्या टिप्सचे पालन केले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे किशोरवयीन मुलांच्या शारीरिक स्वरूपाबद्दलच्या चिंता आणि काळजी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करीत आहेत ही गंभीर समस्या आहे. हे प्रकरण वजन कमी करण्याच्या बेजबाबदार सल्ल्याचे आंधळेपणाने पालन केल्याने किती भयानक परिणाम होतात याचे एक उदाहरण आहे.

जवळजवळ सहा महिने योग्य अन्न न खाणाऱ्या आणि वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यावर जगणार्‍या या तरुणीला तिच्या मृत्यूच्या १२ दिवस आधी थॅलेसेरी सहकारी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील सल्लागार डॉक्टर नागेश मनोहर प्रभू यांनी सांगितले, “मुलीचे वजन फक्त २४ किलो होते आणि तिच्या रक्तातील साखरेची पातळी, सोडियम, तसेच रक्तदाब या बाबी धोकादायकपणे कमी झाल्या होत्या. तिचे शरीर व्हेंटिलेटरला साथ देत होते; पण उपचारांना प्रतिसाद देण्याच्या बाबतीत खूप कमकुवत झाले होते.

“आजकाल तरुण मुले-मुली त्यांच्या दिसण्यावर अधिकाधिक नाराज असतात आणि ते स्वतःहून अतिरेकी आहाराचे पालन आणि व्यायामाच्या दिनचर्येचा अवलंब करतात. पण, ते हे विसरतात की, ही त्यांच्या वाढ आणि विकास होण्याची वेळ आहे आणि या टप्प्यावर संतुलित पोषण हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. तरुणांना वाटते की अन्नसेवन हीच बाब त्यांच्या वजनावर नियंत्रण ठेवू शकते. केरळच्या मुलीच्या शरीरात इलेक्ट्रोलाइट असंतुलन स्पष्टपणे दिसत होते, ज्यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि अवयवांचे नुकसान होऊ शकते. मुलीला कदाचित हे समजले नसेल की, तिच्या अतिरेकी आहारामुळे गंभीर एनोरेक्सिया (anorexia) झाला आहे म्हणजेच तिने जे काही खाल्ले, तेदेखील तिला पचत नव्हते. कारण- तिला उलट्या होत होत्या.” असे दिल्लीच्या सर गंगा राम सिटी हॉस्पिटलच्या सल्लागार आहारतज्ज्ञ मुक्ता वशिष्ठ यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

Water Diet म्हणजे काय? ते विश्वासार्ह आहे का?

Water Diet हे एक ऑनलाइन मिथक आहे, ज्यात अन्नाशिवाय फक्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. हे डाएट करणार्‍यांना वाटते की, हे तंत्र ऑटोफॅगीमध्ये (autophagy) मदत करते, जेव्हा पेशी स्वत:चा पुन्हा वापर करतात आणि स्वत:ला नव्याने तयार करतात. अशा प्रकारे त्यांचे आरोग्य परत मिळवतात. पण, वस्तुस्थिती अशी आहे की, या दाव्याला समर्थन देण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. खरे तर, अभ्यासातून असे दिसून आले आहे की, खनिज असंतुलन रोखण्यासाठी खनिज पाण्याचा वापर केला जात असला तरीही पाण्यावरील उपवासाचे कोणतेही ठोस फायदे नाहीत. त्याशिवाय, सहभागींची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे अभ्यास वैद्यकीय देखरेखीखाली करण्यात आले. त्यामुळे या ऑनलाइन मिथकाला बळी पडू नका – वजन कमी करण्याचा हा शाश्वत किंवा निरोगी मार्ग नाही!

पण, वैज्ञानिक पुराव्याअभावी पाण्यावर उपवास करणे रोखले गेले नाही आणि ते पाळणे सोपे असल्याने, व्यायाम, आहार आणि जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न करण्याऐवजी बरेच लोक असा डाएट करण्यास पसंत देतात.

फक्त पाणी पिऊन उपवास केल्याने काय परिणाम होतात?

मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्सची मोठी कमतरता असते. सोडियम आणि पोटॅशियमसारख्या इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता असू शकते, ज्याच्या कमतरतेमुळे शरीराच्या महत्त्वाच्या कार्यांसाठी मज्जातंतूचे संकेतामध्ये (nerve signals) व्यत्यय येतो. त्यामुळे अनियमित हृदयाचे ठोके, स्नायू कमकुवत होणे, गोंधळणे, झटके येणे आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जर तुम्ही जास्त पाणी प्यायले, तर तुमचा रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो. जास्त साधे पाणी प्यायल्याने पाण्याची विषबाधा किंवा हायपोनेट्रेमिया होऊ शकतो, ही अशी स्थिती आहे की, जिथे घामामुळे शरीरातील सोडियमची पातळी धोकादायकपणे कमी होते. संतुलित आहाराद्वारे मिळणाऱ्या आवश्यक खनिजांची भरपाई करण्याऐवजी साधे पाणी प्यायल्याने हे होऊ शकते.” मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो आणि तुमचे अवयव बंद पडू लागतात.

किशोरवयीन मुलांमधील एनोरेक्सिया कसा हाताळायचा? (How to handle teens with anorexia?)

सर्वप्रथम वैद्यकीय मार्गदर्शनाने योग्य आहार घेण्यास सुरुवात करा. वजन कमी करण्यासाठी जास्त काळ कॅलरीजची संख्या मर्यादित करणाऱ्या आहाराचे सेवन केल्याने रिफीडिंग सिंड्रोम (refeeding syndrome) होतो. मग सामान्य जेवणानेदेखील कॅलरीज खूप जास्त (ओव्हरलोड) झाल्यासारखे वाटते आणि जलद चयापचयामध्ये बदल होऊ शकतात, ज्यामुळे अतिसार, उलट्या आणि अवयव बिघाड यांसारख्या आरोग्यविषयक गुंतागुंतीच्या समस्या होऊ शकतात. कारण- शरीर अन्नसेवनाशी संबंधित चयापचयाकडे परत येऊ इच्छिते; परंतु तसे करण्यासाठी पुरेसे सूक्ष्म पोषक घटक त्याच्याकडे नसतात. म्हणून रुग्णाला खूप हळूहळू अन्नाची ओळख करून द्यावी लागते आणि कमी कॅलरीजची संख्या कमी असलेल्या आहाराने सुरुवात करावी लागेल.नंतर ८०० कॅलरीजपर्यंत जावे लागेल आणि हळूहळू ते प्रमाण वाढवावे लागेल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक स्वरूपाबद्दल वाटणारी चिंता आणि ऑनलाइन सांगितले जाणाऱ्या डाएट ट्रेंडचे पालन करण्याचे व्यसन लागले असेल, तर त्यांना मानसोपचार तज्ज्ञांच्या समुपदेशनाची आवश्यकता आहे. पालकांनी सतर्क राहून मुलांशी त्यांच्या सामाजिक प्रतिमेच्या चिंतांबद्दल (social image concerns) बोलले पाहिजे आणि त्यांच्या मुलांसाठी उपयोगी ठरेल, अशी आहार योजना निवडली पाहिजे.

Story img Loader