आठवड्याच्या शेवटी जेव्हा शनिवार-रविवारी सुट्टी असते, तेव्हा Binge-Watch करायला कोणाला आवडत नाही? पलंगावर बसून आरामात गरमा गरम पॉपकॉर्न आणि थंडगार कोल्डड्रिंकचा आनंद घेऊन एखादी सीरिज बघणे म्हणजे Binge-Watch. पुढच्या आठवड्याची चिंता न करता काही क्षणांसाठी स्वत:चे मनोरंजन करणे. Bumble च्या ओपनिंग मूव्ह्स मोहिमेसाठी (Opening Moves campaign) केलेल्या एका रीलमध्ये खुशी कपूरने सांगितले की, “ती तिच्या पाळीव श्वानासह सात ते आठ तासांची Binge-Watch सहजपणे पाहू शकते. तुम्हीदेखील खुशी कपूरप्रमाणे Binge-Watch करत असाल तर याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याचा कधी विचार केला आहे का? याबाबत द इंडियन एक्स्प्रेसबरोबर संवाद साधताना बंगळुरूच्या ॲस्टर व्हाईटफिल्ड हॉस्पिटलमध्ये मुख्य सल्लागार आणि अंतर्गत औषध विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सुची स्मिता राजमान्या यांचा सल्ला घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आठवड्याच्या शेवटी मिळणारी सुट्टी ही कामातून आराम आणि विश्रांती मिळावी यासाठी असते, पण तुम्ही जर बराच वेळ Binge-Watch करत असाल आणि एकापाठोपाठ एक चित्रपट पाहत असाल तर तुमच्या शरीराच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रात व्यत्यय येऊ शकतो. स्वत:ला शिस्त लावणे आणि तुमच्या आठवड्याच्या दिवसाच्या दिनचर्येशी जुळवून घेणे महत्त्वाचे आहे, अन्यथा शनिवार व रविवार ‘विश्रांती’ घेऊनही सोमवारी थकल्यासारखे वाटू शकते,” असे सांगून डॉ. राजमान्या यांनी सावध केले आहे.

डॉ. राजमान्या यांनी सांगितले की, “बरेच लोक मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ न घालवता त्याऐवजी ते Binge-Watch रात्रभर जागे राहतात. काही लोक चित्रपट सीरिज पाहून पडद्यावरच्या पात्रांशी संबंध जोडतात आणि त्यांचे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात.”

हेही वाचा – ‘हे’ फळ खाल्ल्याने तुम्ही खरोखर तरुण दिसू शकता; तज्ज्ञांचा दावा

तुम्ही सलग सात-आठ तास चित्रपट, सीरिज पाहत राहिल्यास काय होते?

डॉ. राजमान्या यांनी सांगितले की, “लोक बऱ्याचदा अस्वास्थ्यकर, जंक फूड पदार्थांचे सेवन करतात, ज्यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढते आणि संभाव्य वजन वाढते. अल्कोहोल आणि कोल्डड्रिंक्स या समस्या वाढवतात. सुस्तावल्यामुळे मेंदूची प्रक्रिया क्षमताही कमी होऊ शकते.”

त्याबरोबरच ते चित्रपट पाहताना काही लोक चुकीच्या पद्धतीने बसतात. एकतर तासनतास पडून असतात किंवा हातातील मोबाइलमध्ये डोकावलेले दिसतात, डोळे स्क्रिनवर असतात. यामुळे डोळ्यांवर अनावश्यक ताण येतो आणि डोळे कोरडे पडू शकतात,” असे डॉ. राजमान्या यांनी सांगितले.

हेही वाचा- पावसाळ्यात डोळ्यांना होऊ शकतो ‘या’ ५ प्रकारचा संसर्ग? कशी घ्यावी काळजी, तज्ज्ञांकडून जाणून घ्या

डॉ. राजमान्या यांच्या मते, “हे दुर्दैवी आहे की, या बदललेल्या जीवनशैलीमुळे लहान मुलांमध्ये प्री-डायबिटीज आणि फॅटी लिव्हरची समस्या होत आहे, ज्यामुळे त्यांना पुढील आयुष्यात अधिक आजार होण्याची शक्यता असते.”

हे धोके कमी करण्यासाठी, त्यांनी दर ३० मिनिटांनी स्ट्रेचिंग करण्यासाठी ब्रेक घेण्याचा सल्ला दिला. “उठा, थोडे फिरायला जा, कदाचित एखादे पुस्तक वाचा किंवा खरेदीला जा. स्वतःला अॅक्टिव्ह ठेवा आणि हालचाल करत राहा,” असेही डॉ. राजमान्या यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khushi kapoor says she can binge watch for 7 8 hours straight expert shares why thats harmful snk