Disadvantages of Chyawanprash: प्रत्येकजण आरोग्याची काळजी घेतो. पण आपल्याच चुकांमुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. हिवाळ्यात आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतो. साधारणपणे आपण असे पदार्थ खातो ज्यामुळे आपले शरीर गरम राहते. च्यवनप्राश हे त्यापैकीच एक आहे. च्यवनप्राशचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. पण हा पदार्थ तुमच्यासाठी कसा धोकादायक ठरू शकतो? ते जाणून घ्या…

च्यवनप्राश हे औषधी असले तरी काही लोकांनी याचे सेवन करणे वेळीच टाळावे. च्यवनप्राश खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. च्यवनप्राशमध्ये मध, सफेद केशर, पांढरी कस्तुरी आणि तमालपत्र असे गुणधर्म आहेत. त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगले असते. पण काही लोकांनी च्यवनप्राशचे सेवन टाळावे. च्यवनप्राशचे सेवन कोणी करू नये? ते जाणून घेऊया..

triphala in excess is beneficial or harmful for health
जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Dentists are challenged to perform cosmetic and hair transplant surgery Mumbai print news
दंतचिकित्सकांना सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याला आव्हान
Alankrita Sakshi’s Success Story
Alankrita Sakshi : अलंकृतासारखे तुम्हीही Google मध्ये नोकरी मिळवू शकता; बीटेक, मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम अन् या आयटी स्कीलच्या जोरावर मिळवले ६० लाखांचे पॅकेज
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
e vehicle prices will remain under control even without subsidy says nitin gadkari
अनुदानाविनाही ई-वाहनांच्या किमती आटोक्यात राहतील -गडकरी
thane passengers suffer financial loss
एसटी अचानक रद्द झाल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भूर्दंड, संपाचा परिणाम प्रवाशांच्या पथ्यावर
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?

‘या’ रुग्णांनी च्यवनप्राशचे सेवन अजिबात करू नये ( Who should not eat chyawanprash)

मधुमेही रुग्ण ( Chyawanprash for Diabetes Patient)

मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही च्यवनप्राशाचे सेवन करू नये. चव संतुलित करण्यासाठी बरेच लोक च्यवनप्राशमध्ये साखर घालतात परंतु हे टाळले पाहिजे. च्यवनप्राश सेवन केल्याने या रुग्णांच्या शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेहींनी च्यवनप्राश सेवन केल्याने आरोग्याचा धोका वाढतो.

किडनीचे रुग्ण ( Chyawanprash for Kidney Patient)

किडनीच्या रुग्णांसाठी च्यवनप्राश स्वतःच खूप उष्ण आणि पचायला जड आहे. जर तुम्हाला किडनीशी संबंधित कोणताही आजार असेल तर तुम्ही च्यवनप्राशचे सेवन टाळावे.

( हे ही वाचा: दुधात ‘या’ ३ गोष्टी मिसळल्यास बनतात अमृतासमान; याच्या सेवनाने रक्तातील साखर झपाट्याने कमी होऊ शकते)

पोटाचे विकार (Chyawanprash for Stomach Disease)

पोटाच्या समस्या असणाऱ्यांनी च्यवनप्राशचे सेवन करू नये. च्यवनप्राश पचण्यास जड आहे, त्यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्या असतील तर तुम्ही च्यवनप्राशचे सेवन करू नये. काहींना पोटभर जेवूनही च्यवनप्राश खाण्याची सवय असते. त्यामुळे नंतर अपचन किंवा पोटाचा त्रास झाल्यास त्यांनी च्यवनप्राशचे सेवन करू नये.

रक्तदाबाचे रुग्ण (Chyawanprash for Blood Pressure Patient)

जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर तुम्ही च्यवनप्राशचे सेवन टाळावे कारण च्यवनप्राशची उष्णतेमुळे तुम्हाला गंभीर परिणाम सहन करावा लागू शकतो.