व्यस्त जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे बहुतेक लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रासलेले असतात. सतत वाढते वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन ट्राय केले जातात. आजकाल लोक वजन कमी करण्यासाठी केटो डाएटचे पालन करताना दिसतात. केटो डाएटला कीटोजेनिक डाएट, लो-कार्ब डाएट, लो-कार्ब हाय फॅट डाएट इ. असेही म्हणतात. केटो डाएट हा जास्त चरबी व कमी कार्बचा आहार आहे. ज्यामध्ये आपल्या आहारातून ७५ टक्के चरबी, ५ ते १० कार्ब व २० टक्के प्रथिने असे पदार्थ यात घेतले जातात. पण का केटो आहारामुळे तुमच्या किडनीचे नुकसान होऊन मुतखडा होऊ शकतो का? पी डी हिंदुजा हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ रुतु धोडपकर यांनी याबाबत इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया तज्ज्ञ काय सांगतात…?
रुतु धोडपकर सांगतात, आजकाल तुम्ही किटो डाएट हे नाव ऐकले असेलच. केटो आहार म्हणजे असा आहार ज्यामध्ये कार्बोहायड्रेट कमी किंवा जास्त नसतात आणि जास्त चरबी खाल्ली जाते. वास्तविक, शरीराला एक सवय असते की, ते कार्बोहायड्रेट्स पचवून ऊर्जा तयार करते. किटो डाएटचा उद्देश कर्बोदक पदार्थ खाणे हा नाही. ज्यामुळे शरीरात साठलेली चरबी पचवली जाते आणि त्यातून ऊर्जा तयार करत असते. अलीकडच्या काळात, जगभरातील लोकांनी वजन कमी करण्यासाठी केटो आहाराचा अवलंब केला आहे. पण हा केटो आहार प्रत्येकासाठी योग्य नाही, असे त्या म्हणाल्या.
काय आहे केटो डाएट?
आहारतज्ज्ञ म्हणतात, या आहारात कार्बोहायड्रेटच प्रमाण अतिशय कमी केल जाते आणि फँटस हे विपुल प्रमाणात घेतले जातात. म्हणजेच कमी कार्बोदके आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ असलेला आहार म्हणजे केटो डाएट. केटो डाएटला आपण ‘केटोजेनिक डाएट’ असे देखील संबोधित असतो. केटो डाएटमध्ये एक उच्च आणि चरबीयुक्त आहाराचा समावेश होतो. केटो आहारात फॅट, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्सचे ठराविक टक्के विभागले गेलेत.
(हे ही वाचा : सकाळी तोंड न धुता, दात न घासता पाणी प्यावे का? तज्ज्ञ सांगतात करु नका ‘ही’ चूक शरीराचे होऊ शकते मोठे नुकसान )
केटो डाएट कोणी करु नये?
- आरोग्याचा बाबतीत ज्या व्यक्तींना काही तक्रारी असतील तर त्यांनी केटो डाएट करु नये, असा नेहमी सल्ला दिला जातो.
- लहान मुलांनी केटो डाएट करु नये.
- गरोदर किंवा बाळाला दूध पाजणाऱ्या महिलांनी केटो डाएट पासून तर दूरच राहिले पाहिजे.
केटो डाएटमुळे किडनी स्टोन होऊ शकतो?
रुतु धोडपकर सांगतात, हल्ली बदलत्या लाईफस्टाईलनुसार वजन वाढीच्या समस्या भरपूर प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकजण वजन कमी करण्यासाठी केटो डाएट फाॅलो करतात. केटो आहारात चरबी, प्रथिने जास्त आणि कर्बोदके कमी असतात. सामान्य किडनीशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी वाढलेल्या पॅरामीटर्सनुसार प्रथिनांच्या सेवनाचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. अशा रूग्णांना जास्त प्रथिने, जास्त चरबीयुक्त आहार घेता येत नाही कारण त्यामुळे मूत्रपिंडावर जास्त भार पडू शकतो आणि समस्या वाढू शकते. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्यांनी या आहारापासून दूर राहावे नाहीतर किडनी स्टोनचा धोका होऊ शकतो.
जास्त प्रमाणात प्रोटीन सेवन केल्याने मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो, कारण आपल्या शरीरातून प्रोटीनवर प्रक्रिया करण्यासाठी आणि फिल्टर करण्यासाठी मूत्रपिंडांना अजून कठोर परिश्रम करावे लागतात. जेव्हा मूत्रपिंड निरोगी असतात, तेव्हा आहारातील प्रथिनेंच्या पातळीचा मूत्रपिंडाच्या कार्यावर कोणताही परिणाम होत नाही. निरोगी मूत्रपिंडांसह, उच्च प्रथिने आहार सुरक्षित असतो, परंतु विद्यमान असलेल्या एखाद्यासाठी मूत्रपिंड समस्या, आहार अत्यंत हानिकारक असू शकतो.
केटो डाएट ही एक मेडिकल डाएट असून ही डाएट एखाद्या एक्सपर्टच्या देखरेखीत फॉलो केली गेली पाहिजे. जेणेकरुन कोणतीही आरोग्यदायी समस्या होऊ नये, असेही त्या सांगतात.