Kidney Cleaning Detox Drink: जेव्हा खड्याच्या रूपात युरिक ऍसिड किडनीमध्ये जमा होऊ लागते तेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होते. परिणामी शरीरातील टाकाऊ पदार्थ व द्रव्य लघवीवाटे बाहेर टाकण्यास किडनी अकार्यक्षम होऊ शकते. किडनीतील फिल्टर खराब झाल्यास युरिक अॅसिड, अमोनिया, युरिया क्रिएटीनिन, अमिनो अॅसिड, सोडियम, पाणी वाढते. किडनी कायम स्वच्छ ठेवायची तर एका खास पेयाचा आहारात समावेश करायला हवा. आहारतज्ज्ञ ख्याती रुपाणी यांनी इंस्टाग्रामवर डिटॉक्स ड्रींक तयार करण्याची सोपी पद्धत सांगितली आहे. किडनीतील युरीक ऍसिड लघवीवाटे बाहेर काढण्यासाठी हे डिटॉक्स ड्रिंक तयार करून पाहू शकता.
किडनी स्वच्छ करणारे डिटॉक्स ड्रिंक कसे बनवायचे? (Kidney Cleaning Detox Drink)
एक ग्लास पाणी घ्या. यात मूठभर हिरवीगार ताजी कोथिंबीर (बारीक चिरुन), २ ते ३ वेलदोडे घेऊन पातेल्यात चांगलं उकळून घ्या. एका गाळणीने गाळून घ्या. कोथिंबीर आणि वेलदोड्याचा अर्क किडनी व लिव्हर डिटॉक्स करू शकतो. आठवड्यातून किमान ३ वेळा रात्री झोपण्यापूर्वी १ कप हे ड्रींक प्यायचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
हे ही वाचा<< उन्हाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करावी का? ‘हे’ ५ मुद्दे देतील तुमच्या प्रश्नाचं नेमकं उत्तर
दरम्यान, मळमळ, उलट्या, भूक न लागणे, अशक्तपणा, झोप न लागणे, वारंवार किंवा कमी लघवी, मसल क्रम्प्स, पाय आणि घोट्याला सूज येणे, कोरडी, खाज सुटणे, उच्च रक्तदाब, श्वास न घेता येणे ही अशक्त किडनीची लक्षणे आहेत. याशिवाय अगदी मोजक्याच प्रकरणात फुफ्फुसात द्रव जमा होणे, छातीत दुखणे अशी लक्षणे सुद्धा दिसून येऊ शकतात. अशी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा आवश्य सल्ला घ्या.