Kidney Disease & Diabetes Remedies: किडनी व डायबिटीजच्या विकाराने जगभरातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या त्रस्त आहे. हे असे क्रोनिक आजार आहेत की ज्यामध्ये पथ्यपाणी पाळण्याची प्रचंड गरज असते. अनेकदा तर गोळ्या औषधांचा मारा जरी झाला तरी हे त्रास बळावू शकतात. अशावेळी आयुर्वेदिक उपचार हे नेहमीच उत्तम पर्याय ठरू शकतात. आययुर्वेदातील सर्वात शक्तिशाली मानला जाणारा मसाल्याचा पदार्थ म्हणजे आले. आल्याचा वापर आजवर आपण सर्दी- ताप, खोकल्यावर उपचार म्हणून केलाच असेल पण तुम्हाला माहित आहे का आल्यातील काही गुणधर्म हे किडनीसाठीही अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. तसेच डायबिटीजच्या रुग्णानं रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा आले हा उत्तम पर्याय आहे. आल्याचे नेमके फायदे काय व त्याचे सेवन कसे करायचे हे आपण आज तज्ज्ञांकडून जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैदिक काळापासून आले त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. आल्याचे अँटी-ऑक्सिडेटिव्ह आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुण मधुमेह आणि किडनीच्या आजाराच्या विकासास प्रतिबंधित करू शकतात. टाइप २ मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये तणाव व जळजळीचा त्रास वारंवार उद्भवण्याचा धोका असतो. आल्याच्या सेवनाने हे त्रास सुद्धा नियंत्रणात राहू शकतात.

ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातील संशोधकांना असे आढळून आले की आल्याचा सक्रिय घटक जिंजरोल्स इंसुलिन न वापरता स्नायूंच्या पेशींमध्ये ग्लुकोजचे शोषण वाढवू शकतो आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करतो.

युरोपियन जर्नल ऑफ फार्माकोलॉजी (२००९) मध्ये, संशोधकांनी नोंदवले आहे की आल्याचे दोन भिन्न अर्क, स्पिसम व सेरोटोनिन इन्सुलिनच्या स्रावावर परिणाम करतात. या दोन्ही रसांच्या अर्काने रक्तातील ग्लुकोजमध्ये ३५ टक्के तर प्लाझ्मा इन्सुलिनच्या पातळीत १० टक्के वाढ झाली होती.

हे ही वाचा<< आलिया भट्टने २० किलो वजन कमी करताना फक्त ‘हा’ एक नियम पाळला; पाहा तिचा नियमित डाएट प्लॅन

आल्याच्या सेवनाची सोपी पद्धत

आल्याचा वापर अनेक प्रकार आहेत आणि सर्वात जलद मार्गांपैकी एक म्हणजे दररोज आल्याचा रस किंवा चहा घेणे. सकाळी किंवा झोपेच्या वेळी आल्याचा रस कोमट पाण्यात घालून घेऊ शकता. चहाचे पाणी उकळताना पावडर टाकण्याआधी आल्याचा तुकडा ठेचून पाण्यात घातल्यास त्याचा अर्क पाण्यात नीट उतरतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kidney failure and diabetes threat reduces with ginger tea how to eat ginger daily to lower uric acid blood sugar svs