Kidney Failure: किडनी स्टोनचा त्रास हा ताप खोकल्याप्रमाणे पटकन लक्षात न आल्याने त्याचे परिणाम आणखी गंभीर वेळीच उपचार न केल्यास संसर्ग होऊ शकतो. किडनी स्टोन वाळूच्या दाण्याएवढे लहान किंवा गारगोटीएवढे मोठे असू शकतात. किडनी स्टोन जितका मोठा तितकी त्याची लक्षणे अधिक त्रासदायक असतात.जेव्हा रक्तातील युरिक ऍसिड शरीराबाहेर टाकण्यास किडनीची कार्यक्षमता कमी होते तेव्हा हेच युरिक ऍसिड क्रिस्टल्सच्या रूपात शरीरात जमा होते. हेच क्रिस्टल खडे साचून मुतखडा होऊ शकतो. सर्वच आजारांप्रमाणे आहारात काही गोष्टीचे सेवन केल्यास किडनी स्टोनचा धोका बळावू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. डिंपल जांगडा यांच्या माहितीनुसार किडनी स्टोनचा त्रास वाढण्यासाठी दोन भाज्या मुख्य कारण ठरू शकतात त्यामुळे या भाज्या चुकूनही कच्च्या खाऊ नये. एरवी भाज्यांचे सत्व पूर्ण मिळावे यासाठी त्या कच्च्या खाण्याचा सल्ला दिला जातो पण पालक व केल या दोन भाज्या जर आपण कच्च्या खाल्ल्या तर यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. कालांतराने किडनी पूर्ण निकामी होण्याचा सुद्धा धोका असतो.

पालक व केलच्या भाजीत भरपूर फायबर, जीवनसत्त्वे ए, सी, के आणि लोहासारखी खनिजे असतात. पण, तुम्हाला माहित आहे का की कच्च्या पालकामध्ये ऑक्सॅलिक ऍसिड असते, हा एक असा सेंद्रिय पदार्थ आहे जो कॅल्शियम आणि लोह सारख्या आवश्यक पोषक तत्वांच्या शोषणात व्यत्यय आणू शकतो. परिणामी किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.

पालेभाज्या ‘या’ पद्धतीने खाल्ल्यास मिळते भरपूर पोषण (How To Eat Leafy Vegetables)

मंद आचेवर काही मिनिटे गरम पाण्यात पालेभाज्या शिजवून घ्या. हिरवी मिरची, धणे, जिरे व बडीशेप यांसारख्या इतर मसाल्यांसह भाजीची पेस्ट बनवा व मग त्यातून रेसिपी बनवू शकता. पालक पनीर, पालक सूप यासाठी ही एक स्टेप अगदी बेस्ट ठरते. तुमच्या हिरव्या भाज्यांचे सूप बनवल्यास ऑक्सलेटची पातळी कमी होण्यास मदत होते, त्यामुळे पचन, शोषण होण्यास मदत होते.

हे ही वाचा<< किडनी स्टोन झाल्यास शरीरात सर्वात आधी दिसतात ‘ही’ लक्षणे; नेमका धोका कशाने वाढतो?

दरम्यान, शरीरातील अतिरिक्त कॅल्शियम, ऑक्सलेटमुळे सुद्धा हे क्रिस्टल आणखी कडक होतात. तुम्ही स्वतःला आवश्यकतेनुसार पाणी पिण्याची सवय न लावल्यास तर किडनी स्टोनचा धोका तिथेच बळावतो.काही वेळा हा किडनी स्टोन मूत्राशयाशी जोडणार्‍या नळ्या म्हणजेच मूत्रवाहिनीं अडकून सूज येऊ शकते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kidney failure caused by eating raw vegetables leads to kidney stone how to cook leafy veggies to get maximum benefits svs