Chronic Kidney Disease: किडनी हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यात काही समस्या आली तर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यासोबतच किडनीशी संबंधित गंभीर आजारांनाही सामोरे जावे लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, किडनीचे मुख्य काम रक्त शुद्ध करणे आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, किडनीचे मुख्य काम रक्तातील पाणी आणि सोडियम काढून टाकणे आहे. याव्यतिरिक्त, मूत्रपिंड रेनिन एंजाइम तयार करते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
फोर्टिस हॉस्पिटल नोएडाच्या अतिरिक्त संचालक आणि प्रमुख, नेफ्रोलॉजी आणि किडनी प्रत्यारोपण विभागाच्या डॉ. अनुजा पोरवाल यांनी जनसत्ताशी बोलताना सांगितले की, किडनीचे आरोग्य चांगले ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत. उदाहरणार्थ, तुमच्या वार्षिक चेकअपमध्ये तुमच्या किडनीचे कार्य आणि लघवीच्या चाचण्या नियमितपणे करा. तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा असल्यास किंवा ६० वर्षांपेक्षा जास्त वय असल्यास, किडनी फंक्शन टेस्ट, किडनी इमेजिंग आणि लघवीचे विश्लेषण नियमितपणे केले पाहिजे. जर लघवीमध्ये प्रथिने कमी प्रमाणात असतील तर तुम्ही नेफ्रोलॉजिस्टला भेट द्या.
चुकीच्या आहारामुळे किडनीमध्ये खडे तयार होऊ लागतात. त्यामुळे पाठ आणि पोटातही वेदना होतात. तसेच लघवीला त्रास होतो. यासाठी किडनी निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हालाही तुमची किडनी निरोगी ठेवायची असेल, तर तुम्ही ‘या’ टिप्स फॉलो करा..
( हे ही वाचा: कोणतीही औषधे न घेता वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल होईल झपाट्याने कमी? डॉक्टरांनी दिलेला ‘हा’ सल्ला एकदा वाचाच)
उच्च रक्तदाब आणि साखर नियंत्रित करा
किडनी निरोगी ठेवण्यासाठी उच्च रक्तदाब आणि साखर नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी पोटॅशियम युक्त पदार्थ खा. यासोबतच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहार आणि रोजचा व्यायाम आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, साखर आणि मीठ यांचे सेवन मर्यादित करा.
जास्त वेदनाशामक औषधे घेऊ नका
औषधे प्रमाणा बाहेर घेतल्यास त्याचा किडनी वर वाईट परिणाम होऊ शकतो. सामान्य डोकेदुखी आणि थकवा यासाठी वेदनाशामक औषधांचा अवलंब करणारे लोक तुम्ही अनेकदा पाहिले असतील. हे अजिबात करू नका. जर मोठी गरज नसेल तर औषध अजिबात घेऊ नका. त्याऐवजी तुम्ही घरगुती उपाय करू शकता.
नियमित व्यायाम करा
आरोग्य तज्ञ नेहमी निरोगी राहण्यासाठी दररोज व्यायाम करण्याचा सल्ला देतात. तसेच संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. किडनी निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करा. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. हे मेटाबॉलिज्म देखील वाढवते.
( हे ही वाचा: तुमच्या वयानुसार तुमची Blood Sugar किती हवी? जाणून घ्या ‘हा’ सोपा तक्ता)
भरपूर पाणी प्या
किडनी निरोगी ठेवण्यासाठी दररोज पुरेसे पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. तसेच पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते. यासोबतच ते किडनीसाठीही फायदेशीर ठरते. यासाठी दररोज किमान ३ लिटर पाणी प्यावे.