Fruits That Boost Uric Acid: रक्तातील यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने हाडे आणि सांधे ठिसूळ होणे, किडनीचे आजार आणि हृदयविकार यासारख्या स्थिती निर्माण होऊ शकतात. युरिक ऍसिड हे प्युरिनचे उपउत्पादन आहे, शरीरात नैसर्गिकरित्या आढळणारे प्युरीन, सामान्यत: लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडते पण जेव्हा प्युरीचे प्रमाण वाढत जाते तेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होऊ लागते परिणामी या प्युरीनचे रूपांतर युरिक ऍसिडमध्ये होते. हेच ऍसिड छोट्या क्रिस्टलच्या रूपात हाडांमध्ये व सांध्यांमध्ये व किडनीमध्ये जमा होऊ लागते. यामुळे अत्यंत वेदना होऊ शकतात व किडनी पासून हृदयापर्यंत महत्त्वाचे अवयव निकामी होऊ शकतात. या सर्व समस्या टाळण्यासाठी तुमच्या आहारात कमी प्युरीन असणारे पदार्थ असायला हवेत.
पोषणतज्ञ व हाफ लाइफ टू हेल्थच्या संस्थापक निधी एस यांनी हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे फळे व भाज्या खाणे हे हेल्दी मानले जाते पण काही फळ व भाज्यांमध्ये असणारे फ्रुक्टोज हे प्युरीनचे वाहक असू शकतात. फ्रुक्टोज ही नैसर्गिक साखर आहे यामुळे रक्तातील यूरिक ऍसिडचे उत्पादन वाढू शकते. आज आपण सर्वाधिक फ्रुक्टोज असणाऱ्या पाच फळांची माहिती घेणार आहोत. आहारतज्ज्ञ सांगतात की ही फळे खाणे टाळल्यास युरिक ऍसिड वाढण्याचा व किडनी निकामी होण्याचा धोका कमी होउ शकतो.
- पिवळा- सोनेरी मनुका
फ्रुक्टोज प्रति १०० ग्रॅम: २६.५४ ग्रॅम
मनुका द्राक्षांपासून बनवले जाते ज्यामध्ये प्युरीन असते. प्युरीन युक्त पदार्थांचे सेवन केल्याने गाउटची समस्या आणखी वाढू शकते आणि यामुळे रक्तातील यूरिक ऍसिडची पातळी देखील वाढते.
- चिंचेचा कोळ
फ्रुक्टोज प्रति १०० ग्रॅम: १२.३१ ग्रॅम
फ्रुक्टोजच प्रमाण यूरिक ऍसिडचे उत्पादन उत्तेजित करते ज्यामुळे वाईट परिणाम होतात. त्यामुळे चिंचेचा कोळ खाणे टाळणे उचित ठरेल.
- सफरचंद
फ्रुक्टोज प्रति १०० ग्रॅम: ८.५२ ग्रॅम
सफरचंद देखील नैसर्गिक फ्रुक्टोजचे भांडार आहेत. सफरचंदांचे जास्त सेवन केल्याने गाउटची स्थिती आणखी बिघडू शकते.
- खजूर
फ्रुक्टोज प्रति 100 ग्रॅम: १५. ०४ ग्रॅम
खजूर हे कमी प्युरीन असलेले फळ असले तरी त्यात फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते. यामुळे खजूर खाणे धोकादायक ठरू शकते यामुळे रक्तातील यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढू शकते.
हे ही वाचा<< ‘या’ पद्धतीने भेंडी खाल्ल्यास खराब कोलेस्ट्रॉल शरीरात टिकतच नाही? ब्लड शुगरवरही रामबाण, पाहा कसं करावं सेवन
- चिकू
फ्रुक्टोज प्रति १०० ग्रॅम: ८. ६ ग्रॅम
चिकुमधील फ्रुक्टोजमुळे शरीरात युरिक ऍसिड वाढते त्यामुळे चिकूचे सेवन शक्यतो टाळावे किंवा कमी करावे.
कमी फ्रुक्टोज असलेली फळं
- काळे मनुके (२.९८ ग्रॅम)
- आवळा (२.१ ग्रॅम)
- खरबूज (०.६२ ग्रॅम)
- पीच (१. १५ ग्रॅम)
हे ही वाचा<< ‘या’ पद्धतीने कॉफी बनवल्यास कोलेस्ट्रॉलचा धोका होतो कमी? तज्ज्ञ सांगतात दिवसाला किती कॅफिन घ्यावे?
- अननस (१.२१ ग्रॅम)
- डाळिंब (१.०१ ग्रॅम)
- स्ट्रॉबेरी (१.९ ग्रॅम)
यूरिक ऍसिड वाढ टाळण्यासाठी दैनंदिन आहारात काही फळे समाविष्ट करणे आवश्यक आहे. या फळांची फ्रुक्टोज पातळी कमी असल्याचे धोक्याचे प्रमाण कमी असते.