Pre Kidney Failure Signs: किडनीचे दुर्धर विकार व क्रॉनिक किडनी फेल्युअर हे सध्याचे सर्वात चर्चेतील आजार आहेत. आपल्या बदलत्या जीवनशैलीनुसार शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढू लागले आहे. हे ऍसिडच किडनीला निकामी करणारे मुख्य कारण आहे. जेव्हा खड्याच्या रूपात युरिक ऍसिड किडनीमध्ये जमा होऊ लागते तेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होते. परिणामी शरीरातील टाकाऊ पदार्थ व द्रव्य लघवीवाटे बाहेर टाकण्यास किडनी अकार्यक्षम होऊ शकते, याकडे वेळीच लक्ष दिली नाही तर किडनी ट्रान्सप्लांटची सुद्धा वेळ येऊ शकते.
झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सल्लागार यूरोलॉजिस्ट डॉ. भावीन पटेल यांच्या हवाल्याने एचटीने दिलेल्या माहितीनुसार, मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपान, वय, पॉलीसिस्टिक किडनी रोग, हृदयविकार, सतत युटीआय, पायलोनेफ्रायटिस व किडनीला हानी पोहोचवणारी औषधे हे किडनीच्या आजाराचे मुख्य कारण आहे. यापैकी कोणत्याही घटकाचा आपल्याशी संबंध असेल तर आपण किडनीच्या आरोग्याविषयी सतर्क राहायला हवे. यासाठी नेमकी कोणती लक्षणे विचारात घ्यायला हवीत, पाहुयात..
अशक्त किडनीची लक्षणे (Weak Kidney Signs)
मळमळ, उलट्या, भूक न लागणे, अशक्तपणा, झोप न लागणे, वारंवार किंवा कमी लघवी, मसल क्रम्प्स, पाय आणि घोट्याला सूज येणे, कोरडी, खाज सुटणे, उच्च रक्तदाब, श्वास न घेता येणे ही अशक्त किडनीची लक्षणे आहेत. याशिवाय अगदी मोजक्याच प्रकरणात फुफ्फुसात द्रव जमा होणे, छातीत दुखणे अशी लक्षणे सुद्धा दिसून येऊ शकतात.
किडनीची शक्ती कमी झाल्यास उद्भवणारा धोका.. (Weak Kidney Threats)
किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यास उच्च रक्तदाब, अशक्तपणा, हृदयविकार, कमकुवत हाडे आणि हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका, मज्जासंस्था खराब होणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, संक्रमण गर्भधारणेत गुंतागुंत असे धोके उद्भवू शकतात.
हे ही वाचा<< तोंडाची दुर्गंधी देते खराब कोलेस्ट्रॉलचे संकेत; शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी ‘हे’ पाच गोल्डन नियम पाळा
क्रोनिक किडनीचा आजार टाळण्यासाठी काय करावे? (How To Make Kidney Strong)
- नियमित तपासणीसाठी जाण्यास विसरू नका.
- उच्च रक्तदाब तुमच्या किडनीवर परिणाम करू शकतो. त्यामुळे रक्तदाब वाढवणारे घटक जसे की मीठाचे सेवन आणि मद्यपान यावर नियंत्रण ठेवा.
- डायबिटीज असल्यास किडनीच्या बिघाडाचा धोका अगोदरच अधिक असतो त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. औषधे घ्या आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करा.
- रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यास आणि किडनीच्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी नियमित ३० मिनिट व्यायाम आवश्यक आहे.