Kidney Infection Tips in Monsoon: किडनी आपल्या शरीराच्या कार्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते.शरीराच्या संपूर्ण प्रणालीला हानिकारक असलेल्या टाकाऊ पदार्थांना बाहेर काढण्यासाठी किडनी फिल्टर म्हणून काम करते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात तसेच रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये देखील मदत करतात. किडनीच्या आरोग्यावर तुमच्या आहार व जीवनशैली इतकाच ऋतू सुद्धा परिणाम करत असतो. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये संसर्गजन्य आजारांमुळे किडनीची कार्यक्षमता प्रभावित होऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ अजित कुमार सिंग, नेफ्रोलॉजिस्ट, सांगतात की, “मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, टायफॉइड, गॅस्ट्रोएन्टेरिटिस, हिपॅटायटीस ए आणि हिपॅटायटीस ई ही यांसारख्या आजारांचा धोका पावसाळ्यात वाढतो. या सर्व आजारांमध्ये किडनीत दाह होऊन ज्यामुळे किडनी निकामी होऊ शकते.” अशावेळी पावसाळ्यात किडनीला सुदृढ ठेवण्यासाठी खालील काही उपायांची स्वतःला सवय लावणे आवश्यक आहे.

•तुमचा सतत वावर असणाऱ्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी निदान दिवसातून दोन वेळा केर काढणे व एकदा लादी पुसून घेणे याची सवय लावा

• पिण्याचे पाणी वापरण्यापूर्वी ते उकळून किंवा गाळून घ्यावे कारण पावसाळ्यात हा संसर्गाचा सर्वात मोठा स्त्रोत ठरतो.

• घरी शिजवलेले ताजे अन्न खाणे सर्वात फायद्याचे ठरू शकते

• हात धुण्याला प्राधान्य द्या

• इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये हानिकारक सूक्ष्मजीव देखील असू शकतात. म्हणूनच फोन, लॅपटॉप नियमित अंतराने स्वच्छ केले पाहिजेत. यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

• फळे खाण्यापूर्वी शक्यतो सोलून घ्यावीत व ज्या फळांना सालीसहित खाल्ले जाते त्यांना नीट स्वच्छ करून पुसून मग खावे.

• फळ कापून स्टोअर करून ठेवणे टाळा, कापल्यावर लगेच फळे खा अन्यथा नंतरही त्यावर जंतू बसू शकतात.

• पावसात भिजण्याचा मोह आवरला नाही तरी निदान घरी परतल्यावर केस व अंग नीट कोरडे करा.

• चप्पला, शूज घराच्या बाहेरच काढणे फायद्याचे ठरेल

• तुमच्या मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवले पाहिजे. पावसाळ्यात ग्लुकोजची उच्च पातळी तुमच्या किडनीला हानी पोहोचवू शकते. त्यामुळे आहारात साखरेचा वापर कमी करा.

हे ही वाचा<< पोहे, डोसा, उपमा बनवताना असे वाढवा प्रोटीनचे प्रमाण; डायबिटीज, हायपरटेन्शनवर रामबाण उपाय

दरम्यान, वरील सवयी या अगदी साधारण असल्या तरी मोठमोठ्या आजारांपासून तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतात, म्हणूनच वेळीच तुमच्या जीवनात यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kidney failure prevention 10 tips that will reduce threat of kidney infection monsoon health news save your body svs