Kidney Stone Ayurvedic Cure: नुकताच जागतिक किडनी दिन जगभरात साजरा करण्यात आला. या दिवसाचे उद्दिष्ट आपल्या एकूण आरोग्यासाठी आपल्या किडनीच्या महत्त्वाविषयी जागरुकता वाढवणे असे आहे. प्रत्येक वर्षी, एका विशिष्ट थीम नुसार या दिवसाचे सेलिब्रेशन केले जाते. प्राप्त माहितीनुसार २०२३ ची थीम ‘सर्वांसाठी किडनी आरोग्य’ अशी होती. किडनीच्या अनेक विकारांपैकी सर्वाधिक पसरलेला व वेदनादायी असा प्रकार म्हणजे मुतखडा अर्थात किडनी स्टोन. उन्हाळाच्या दिवसात आपल्या शरीराला आवश्यक तितके पाणी न मिळालेल्या याच महिन्यांमध्ये किडनी स्टोनचा धोका अधिक असतो. आज आपण डॉ. डिंपल जांगडा यांच्या मार्गदर्शनातून किडनी स्टोनवरील सर्वात स्वस्त, घरगुती व आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

किडनी निकामी होण्यापूर्वी दिसणारी लक्षणे (Kidney Failure Signs)

मळमळ, उलट्या, भूक न लागणे, अशक्तपणा, झोप न लागणे, वारंवार किंवा कमी लघवी, मसल क्रम्प्स, पाय आणि घोट्याला सूज येणे, कोरडी, खाज सुटणे, उच्च रक्तदाब, श्वास न घेता येणे ही अशक्त किडनीची लक्षणे आहेत. याशिवाय अगदी मोजक्याच प्रकरणात फुफ्फुसात द्रव जमा होणे, छातीत दुखणे अशी लक्षणे सुद्धा दिसून येऊ शकतात.

किडनी स्टोनवर आयुर्वेदिक उपचार (Kidney Stones Ayurvedic Treatment)

१) पाणी (Water)

अर्थात वर म्हंटल्याप्रमाणे तुम्ही जेव्हा आवश्यक प्रमाणात पाण्याचे सेवन करत नाही तेव्हा शरीरातील युरिक ऍसिड हे लाघवीवती बाहेर पडण्याऐवजी छोट्या क्रिस्टलच्या रूपात शरीरात जमा होऊ लागते. हेच खडे पुढे किडनीमध्ये जमा होऊन किडनी स्टोनचा धोका वाढवतात. हे टाळण्यासाठी आपण आपल्या वयानुसार व सीझननुसार योग्य तितके पाणी प्यायलाच हवे.

२) लिंबाचा रस (Lemon Juice)

लिंबाच्या रसातील सिट्रिक ऍसिड हे शरीरातील क्षार व मिनरल्स हे किडनीमध्ये टिकू देत नाहीत परिणामी अगोदरच किडनी स्टोनचा त्रास असल्यास तो अजून वाढत नाही. यासाठी डॉ. जांगडा सांगतात की तुम्ही दिवसातून एकदा कोमट किंवा रूम तापमानाच्या पाण्यात लिंबाचा रस घालून सेवन करायला हवे.

३) तुळशीचे पाने (Tulsi Juice)

किडनीमध्ये युरिक ऍसिड, पाणी व मिनरल्स यांचे प्रमाण संतुलित राहावे यासाठी तुळशीची पाने नामी उपाय ठरतात. तुम्ही चहामध्ये किंवा साध्या कोमट पाण्यात मधासह तुळशीचे पाने घालून सेवन करू शकता . अलीकडे अनेक आयुर्वेदिक तज्ज्ञांनी तुळशीच्या अर्काचे रस सुद्धा बाजारात आणले आहेत. यातील सत्व व पोषण पाहून आपण यातील उत्पादने सुद्धा वापरून पाहू शकता.

हे ही वाचा<< किडनी कमकुवत होऊ लागताच शरीर देतं स्पष्ट संकेत; सकाळी उठल्यापासून दिसतात ‘ही’ लक्षणे

४) नारळ पाणी (Coconut Water)

जर तुम्हाला अगोदरच किडनी स्टोन झालेला असेल तर यावर नारळाचे पाणी एक गुणकारी औषध ठरू शकते. नारळाचे पाणी कठोर क्रिस्टल मोडून टाकतात यामुळे युरिनरी ट्रॅकमधून किडनी स्टोन बाहेर पडायला मदत होते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज असल्यास वैद्यकीय सल्ला आवश्य घ्या)