Kissing Can Cause Health Issue: असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यास अनियोजित गर्भधारणेपासून ते STD, असे अनेक धोके असतात. पण केवळ सेक्सच नव्हे तर साधे किस करताना सुद्धा जर काळजी घेतली नाही तरीही अनेक आजारांना आमंत्रण दिले जाऊ शकते. तोंडाच्या समस्या एसटीडीसारख्या गंभीर नाहीत. पण याचा त्रास दीर्घकाळ असू शकतो. तोंडाचे आजार संसर्गजन्य असतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार किसिंगदरम्यान सुमारे ८० दशलक्ष जिवाणू एका तोंडातून दुसऱ्या तोंडात जाण्याची शक्यता असते. जर या प्रक्रियेतील एकही व्यक्ती अनेक वर्षांपासून डेंटिस्टकडे गेलेली नसेल किंवा नियमित तोंडाची स्वच्छता करीत नसेल तर वाईट जिवाणूंचा संसर्ग त्या व्यक्तीस स्वतःला व तिला किस करणाऱ्या प्रत्येकाला होण्याची शक्यता जास्त असते.
डॉ. विजय कदम यांनी सांगितल्याप्रमाणे, किसिंगमुळे मुख्यतः एड्स, टीबीसारखे संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका असतो. पण मुळात याविषयी काही प्रमाणात लोक जागरूक असतात, याशिवायही तोंडाच्या आजाराचे अनेक प्रकार आहेत. ते सर्व संसर्गजन्य नाहीत. जिवाणू किंवा विषाणूमुळे रोगाचा संसर्ग झाल्यास तोंडाच्या आजाराची लागण होण्याचा धोका जास्त असतो. जरी दुसर्या व्यक्तीचे सर्व दात मोत्यासारखे पांढरे असले तरीही ते तुमच्या नकळत तुम्हाला समस्या देऊ शकतात. असुरक्षित किसिंगमुळे उद्भवू शकणाऱ्या समस्या आता आपण जाणून घेऊ या…
१) दातांना कीड लागणे
दात किडण्यामुळे दातात पोकळी निर्माण होते, स्ट्रेप्टोकोकस म्युटान्स नावाच्या एका विशेष प्रकारच्या जिवाणूमुळे होतात, दात किडण्याचा धोका असतो. या प्रकारचे बॅक्टेरिया एक विशेष प्रकारचे आम्ल तयार करतात, जे हळूहळू दातांचे इनॅमल तोडून दात किडण्यास कारणीभूत ठरतात. वेळेवर नियंत्रण न केल्यास एका वेळी एकापेक्षा जास्त दातांवर परिणाम होऊ शकतो. लाळेद्वारे जिवाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊन हा त्रास वाढू शकतो.
२) हिरड्यांना सूज येणे
हिरड्यांना आलेली सूज वेगवेगळ्या प्रजातींच्या बॅक्टेरियामुळे होते. एकदा या जिवाणूचा संसर्ग झाल्यास त्या व्यक्तीला तोंडाच्या इतर समस्या उद्भवू शकतात. जेव्हा बॅक्टेरिया व्यक्तीच्या हिरड्याच्या संपर्कात येतात तेव्हा त्या एक विष सोडतात, ज्यामुळे हिरड्यांच्या नाजूक त्वचेला त्रास होतो, ज्यामुळे जळजळ होते. यामुळे शेवटी ब्रश करताना रक्तस्राव होतो. हेच तोंडाला दुर्गंधी येण्याचे कारणदेखील असू शकते.
३) मुखदुर्गंधी
दिल्लीचे प्रख्यात ऑर्थोडॉन्टिस्ट डॉ. आलोक परमार यांच्या माहितीनुसार काही वैद्यकीय कारणांनी सुद्धा तोंडाची दुर्गंधी वाढू शकते. डॉ. विजय कदम यांनी सांगितल्याप्रमाणे, या स्थितीला हॅलिटोसिस म्हणतात. याचे मुख्य लक्षण म्हणजे दुर्गंधीयुक्त श्वास. अशा व्यक्तीस किस केल्यावर हेच जंतू तुमच्याही तोंडात पसरण्याचा धोका असतो. याशिवाय याच जंतूंमुळे ओठावर पुरळ येणे, तोंड येण्यासारख्या त्रासांचा सुद्धा सामना करावा लागू शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.)