शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. कोलेस्टेरॉल हा एक खराब चिकट पदार्थ आहे जो रक्ताच्या नसांमध्ये जमा होतो. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने हृदयविकार, रक्तवाहिनीचे आजार, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारख्या घातक आजारांचा धोका वाढू शकतो. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने लठ्ठपणा, जास्त घाम येणे, त्वचेचा रंग बदलणे, छाती व पाय दुखणे असे त्रास होऊ शकतात.

जेव्हा तुमच्या शरीरात एलडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते तेव्हा ते तुमच्या रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जमा होऊ लागते. ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोक सारख्या समस्यांचा धोका वाढतो. जर तुमचे कोलेस्टेरॉल जास्त असेल आणि तुम्हाला ते कमी करायचे असेल तर उत्तम उपचार म्हणजे तुमचा आहार. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ.सलीम झैदी यांच्या मते, आहाराच्या माध्यमातून तुम्ही रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्टेरॉल सहज काढून टाकू शकता. काही खास पदार्थांचे सेवन केल्याने तुम्ही शरीरातील नसांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्टेरॉल सहज काढून टाकू शकता.

triphala in excess is beneficial or harmful for health
जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
How does your menstrual cycle affect your skin We asked a dermatologist
तुमच्या मासिक पाळीचा तुमच्या त्वचेवर कसा परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा….
dark chocolate cinnamon coffee and green tea enough to reduce blood sugar
Blood Sugar : ग्रीन टी, डार्क चॉकलेट, दालचिनीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते का? काय खरं काय खोटं? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
actress Bhagyashree shared recipe of unpeeled potato
‘मैने प्यार किया’फेम भाग्यश्री म्हणते, “न सोललेल्या बटाट्यांमुळे कमी होतो क्रॅम्प्सचा त्रास” खरंच हे शक्य आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
is petroleum jelly safe to consume know expert advice petroleum jelly uses and effects
तुम्ही पेट्रोलियम जेली खाताय? चेहऱ्यालादेखील लावताय? पण यामुळे उद्भवू शकतात आरोग्याचे अनेक धोके; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
Is blackcurrant and chia seed water really beneficial for health Get expert advice l काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Loksatta kutuhal System Reliability Self Driving Artificial Intelligence
कुतूहल: प्रणालींची विश्वासार्हता

आहारात ओट्सचा समावेश खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकेल..

जर तुम्हाला शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकायचे असेल तर तुमच्या आहारात ओट्स खा. ओट्समध्ये विरघळणारे फायबर असते जे लहान आतड्यांमधून अतिरिक्त चरबी आणि साखर शोषण्यास थांबवते. याचे सेवन केल्याने आतड्यांमध्ये जमा झालेले घाणेरडे कोलेस्टेरॉल शरीरातून बाहेर पडते. ओट्सचे सेवन केल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी सर्वात महत्वाचे अन्न म्हणजे ओट्स, जे तुम्ही सकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता.

बार्लीचे सेवन करा कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील

ओट्सप्रमाणे बार्लीच्या सेवनानेही कोलेस्ट्रॉल सहज नियंत्रित करता येते. बार्ली हा विरघळणाऱ्या फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे जो कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारतो. बार्लीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते, असे अनेक संशोधनांतून समोर आले आहे. ज्या लोकांना कोलेस्ट्रॉल जास्त आहे त्यांनी त्यांच्या आहारात बार्लीचा समावेश करावा. बार्लीचे सरबत बनवून तुम्ही सेवन करू शकता. बार्ली सत्तू आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, तुम्ही याचे सेवन करू शकता.

( हे ही वाचा: तुम्हीही टॉयलेट सीटवर १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवता का? तर होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार)

डाळी आणि बीन्स सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित करा

डाळी आणि बीन्स हे असे पदार्थ आहेत जे आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल सहज नियंत्रित करता येते. सॉल्यूबल फायबर समृद्ध डाळ आणि बीन्सचे सेवन केल्याने भूक दीर्घकाळ टिकते. वजन कमी करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी तुम्ही या दोन्ही धान्यांचे सेवन करू शकता. डाळींमध्ये तुम्ही मूग डाळ, तूरडाळ, मसूर डाळ, उडीद डाळ आणि चनाडाळ देखील घेऊ शकता. या कडधान्ये आणि बीन्स रक्तात साठलेले खराब कोलेस्टेरॉल काढून टाकतात आणि हृदय निरोगी ठेवतात.