अलीकडे मुंबई शहरामध्ये तसेच अनेक उपनगरांमध्ये आपण हे पाहतोय की अवेळी पाऊस, बदललेलं वातावरण, प्रदूषण यांचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये खोकला, सर्दी आणि तापाचे प्रमाण देखील वाढलेले आहे. यादरम्याने आहाराशी काळजी घेणे अत्यावश्यक आहे त्यानिमित्ताने रोजच्या आहारामध्ये आपण वेगवेगळ्या पदार्थांचा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापर करणे आवश्यक आहे.

१. दालचिनीचे पाणी

Healthy Foods for Your Liver
लिव्हर खराब होण्याचा धोका वाटतोय? लिव्हरमधील फॅट्स झपाट्याने काढून टाकतात ‘हे’ आठ पदार्थ? सेवनाची पद्धत घ्या समजून…
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
Health centers should be capable of diagnosing cancer
‘कर्करोग निदानासाठी आरोग्य केंद्रे सक्षम हवीत’
Fresh ginger vs dried ginger: Which is better for your health?
ताजे आले की वाळलेले आले? आरोग्यासाठी कोणते फायदेशीर; जाणून घ्या कोणते आले वापरायचे?
Cholesterol and Diabetes
रोज किती तास झोपल्याने कोलेस्ट्रॉल अन् मधुमेहाचा धोका होईल कमी? संशोधनातून मोठा खुलासा
Malaria Causes, Symptoms and Precautions in Marathi This monsoon, use these practical safety tips when travelling to malaria-endemic areas
पावसाळ्यात फिरायला जाताय? मलेरिया होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी अन् ॲडमिट होण्याचा धोका टाळा
Nisargalipi lesson in nature education
निसर्गलिपी – निसर्ग शिक्षणाचा धडा

केवळ मधुमेह असणाऱ्यांनीच नव्हे तर हिवाळ्याच्या दिवसात शरीराचे तापमान राखण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. इन्शुलिनचे प्रमाण संतुलित राखणे तसेच कफ विकारांसाठी दालचिनीचे पाणी अत्यंत उपयुक्त आहे. दालचिनी आणि मध यांचे एकत्र मिश्रण करून ते पाण्यात उकळून प्यायला देखील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते ज्यांना खूप जास्त खोकला आहे त्यांच्यासाठी देखील हा अत्यंत खात्रीशीर उपाय आहे.

२. ज्येष्ठमध

ज्यांना वारंवार कफ होतो किंवा रात्री झोपताना खूप खोकला लागत असेल त्यांनी ज्येष्ठमधाची काडी झोपण्याआधी चघळावी किंवा गरम पाण्यात १ चिमूट ज्येष्ठमध पावडर मिसळून ते पाणी प्यावे.

३. सुंठ

सुंठ पावडर नियमितपणे आहारात समाविष्ट केल्यास फुप्फुसाचे विकार कमी होण्यास मदत होते. सुंठ मधासोबत खाल्ली जाऊ शकते तसंच गरम पाण्यातून देखील खाता येऊ शकते. सुंठ-मधाचं मिश्रण लहान मुले, तसेच मोठ्या माणसांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करू शकते.

४. मध

अगदी कमी प्रमाणात मत चाखल्यास खोकला कमी होण्यास मदत होऊ शकतो. फक्त तुम्ही जो मध निवडाल तो चांगल्या प्रतीचा आहे की नाही ते जाणणं अत्यंत महत्त्वाचा आहे.

५. धणे

धणे भिजत घालून किंवा उकळून प्यायला नंतर तुम्हाला होणारे कफ प्रवृत्ती कमी होऊ शकते.

६.कडुनिंब

कडुनिंबाचा पाला आणि गूळ असे एकत्र मिश्रण दररोज खाल्ल्यास विशेषतः लहान मुलांचे आरोग्य उत्तम राहते. पोटाचे आरोग्य आणि जंतांसारखे विकार दूर ठेवण्यासाठी कडुनिंब गुणकारी आहे.

७.लिंबू

जीवनसत्त्व क ने भरपूर असणारे लिंबू नियमित आहारात उपयुक्त आहेच परंतु सध्याच्या प्रदूषित वातावरणात शरीराला सहज निरोगी ठेवण्यासाठी एक लिंबू नेहमी जेवणात असावे. लिंबूपाणी, लिंबाची एखादी फोड, लिंबू-पुदिना रस या स्वरूपात लिंबाचे सेवन करावे. लिंबू पिळून जर तुम्ही ते पाणी रोज पिऊ शकलात तरी देखील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होऊ शकते.

८. आवळा

सध्या उत्तम प्रतीचा आवळा बाजारात उपलब्ध आहे . किमान एक वेळ आहारात आवळा समाविष्ट करावा. केवळ रोगप्रतिकार शक्तीच नव्हे तर संपूर्ण आरोग्यसाठी आवळा अत्यंत गुणकारी आहे.

९. ओली हळद

तांबूस नारंगी रंगाचे आल्यासारखे दिसणारी ओली हळद सध्या बाजारात उपलब्ध आहे . १ चमचा ओली हळद लिंबू आणि मधामध्ये असे मिश्रण पाण्यातून प्यायल्यास सर्दी, खोकला यापासून आराम मिळू शकतो.

१०.तुळस

तुळशीची पानं पिण्याच्या पाण्यात भिजवून ठेवावी. तुळशीच्या पानाचा अर्क पोटाच्या आरोग्यासाठी देखील गुणकारी आहे.

सध्या येणारे नळाद्वारे घरोघरी येणारे पाणी देखील दूषित असण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्यतो नळाद्वारे येणारे पाणी उकळून पिणेच योग्य आहे. घशात खूप कोरडा कफ असेल तर मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे उत्तम.

ज्यांना उष्णतेचा त्रास होतोय त्यांनी वाळ्याचे पाणी नियमित आहारात समाविष्ट करावे. यातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पांढऱ्या साखरेचा प्रमाण आहारमध्ये कमी ठेवा.

तळटीप: आलं लिंबू आणि ओल्या हळदीचा काढा. आलं शंभर ग्राम आलं दोन ते तीन लिंबू आणि 50 ग्रॅम आणि दहा ग्रॅम ओली हळद असे मिश्रण मिक्सरला एकत्र करून ते बर्फ करत ठेवल्यास आणि त्याचा समजा दहा ग्रॅम अर्क रोज जर गरम पाण्यातून घेतला तरी देखील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.