Metabolism Booster: चयापचय एक प्रक्रिया आहे. ज्याद्वारे आपण एका दिवसात जे खातो आणि पितो त्याचे उर्जेमध्ये रूपांतर होते. ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. जी आपल्या शरीरात घडते. तुमचा चयापचय दर तुमच्या शरीरात बर्न कॅलरीजची संख्या ठरवतो. हे सर्व काही संतुलित ठेवते . जसे की, आपल्या रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि रक्तदाब. जर तुमचा चयापचय दर जास्त असेल तर तुम्ही जास्त कॅलरीज बर्न कराल आणि कॅलरीज बर्न केल्याने तुम्हाला वजन लवकर कमी करण्यात मदत होते. जर तुमचा चयापचय दर मंद असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये हे छोटे बदल करू शकता. हे चयापचय गती वाढविण्यात मदत करतात. यासाठी मध हे तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकते.
मधाचे औषधी गुणधर्म
आयुर्वेदात मधाला औषधाचा दर्जा देण्यात आला असून विविध प्रकारच्या शारीरिक समस्या,सौंदर्य प्रसाधने आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात,ज्यामुळे ते अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरते. औषधी गुणधर्मांमुळे,मधाला प्राचीन काळापासून भारतीय आयुर्वेदात महत्वपूर्ण मानले जाते.
आजकाल मधाचा वापर प्रामुख्याने चेहरा (त्वचा) सुधारण्यासाठी, पचन सुरळीत ठेवण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, शरीराचे वजन कमी करण्यासाठी आणि पूजेमध्येही केला जातो. याशिवाय मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जंतुनाशक गुणधर्म देखील असतात, या गुणधर्मांमुळे मधाचा उपयोग जखमा भरण्यासाठी किंवा दुखापतीपासून लवकर आराम मिळण्यासाठी देखील केला जातो.
(आणखी वाचा : ‘या’ ३ आजारात काजू करू शकतो विषासारखं काम; एका दिवसात किती काजू खाणे योग्य? पाहा तज्ज्ञांचा सल्ला )
मधाचे आरोग्यासाठी फायदे
- मधाचा उपयोग वजन कमी करण्यासाठी
आजकाल बरेच लोक त्यांच्या वाढत्या वजनाने किंवा लठ्ठपणाच्या समस्येने खूप अस्वस्थ आहेत आणि त्यांवर विविध प्रकारचे प्रयोग व औषधे वापरत असतात, परंतु नियमितपणे मधाचे सेवन केल्याने तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. मधाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी राहते आणि त्यात चरबी अजिबात नसते. वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा मध कोमट पाण्यात मिसळून घ्या, लगेचच फायदे होतील.
- मधाचा उपयोग हृदय रोगांसाठी
मधामध्ये अँटिऑक्सिडेंट तत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे शरीरातील घातक किंवा विषाक्त पदार्थ व रक्तामधील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास फायदा मिळतो. त्याच बरोबर चयापचय क्रियेत सुधार झाल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास उपयोगी ठरते. यामुळे हृदयावरील अतिरिक्त ताण कमी होतो व हृदयाचे कार्य व्यवस्तिथपणे चालू राहण्यास मदत मिळते. तसेच रक्तदाब सुद्धा नियंत्रित राहण्यास उपयोगी ठरते.
(आणखी वाचा : ‘या’ ब्लड ग्रुपला असतो हृदयविकाराचा सर्वाधिक धोका! यात तुमचा तर सहभाग नाही ना? जाणून घ्या)
- मधाचा उपयोग पाचन सम्बंधित समस्यांकरीता
मधामध्ये मोठ्या प्रमाणात पोटाकरीता आवश्यक पाचक तत्त्वे उपलब्ध असतात त्यामुळे पाचना सम्बंधित विविध आजार जसे अपचन,बद्धकोष्ठता,वायूविकार,पोटदुखी आणि अम्लता दूर होण्यास फारच उपयोगशीर ठरते. दररोज संध्याकाळी झोपायाच्या अगोदर कोमट दुधामध्ये थोड़े मध मिश्रित करून घेतल्यास पोटा सम्बंधित कोणच्याही समस्येकरिता रामबाण उपाय ठरतो.
- रोगप्रतिकारशक्ती वाढवते
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोमट दुधात एक ते दोन चमचे मध मिसळून रोज पिणे फायदेशीर ठरते आणि जर तुम्ही नियमितपणे दुधात मध मिसळून प्यायले तर ते अधिक फायदेशीर ठरते. याशिवाय मधामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स हृदयासाठी खूप फायदेशीर असतात आणि हृदयाशी संबंधित अनेक आजारांपासून संरक्षण करतात. याशिवाय शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हे मधाचे मुख्य कार्य आहे.मजबूत रोगप्रतिकारक शक्तीमुळे अनेक प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होते.