आपल्या शरीराला हार्मोन्स, जीवनसत्त्वे आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. मात्र, कोलेस्टेरॉलचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होणं शरीरासाठी हानिकारक ठरु शकतं. कारण कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने हृदयविकार, रक्तवाहिनीचे आजार, हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळीत समतोल राखणं खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची असेल तर ती कशी करु शकता याबाबतची माहिती जाणून घेऊया.

शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी किंवा नियंत्रित करण्यास कोणती फळे मदत करतात याबाबत जसलोक हॉस्पिटलचे मुख्य आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ डेलनाझ चंदुवाडिया यांनी हेल्थ शॉट्सशी बोलताना सांगितलं की, जर तुमचे कोलेस्टेरॉल जास्त असेल तर त्याला तुमचा अनहेल्दी आहार कारणीभूत आहे. ज्यामध्ये रिफाइंड पदार्थ, तळलेले पदार्थ, साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि फायबरचे प्रमाण कमी असणाऱ्या पदार्थाचा समावेश असतो. शिवाय तुमच्या जीवनशैलीत धूम्रपान, व्यायामाचा अभाव आणि उच्च रक्तदाब, मधुमेह या घटकांचा समावेश असेल, तर कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी, तुम्हाला अत्यावश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्समध्ये जास्त असलेल्या फळांचा आहारात समावेश करायला हवा.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
How exercising for 2-3 days may help reduce risk of Alzheimer’s Alzheimer Disease exercise
व्यायामामुळे ‘अल्झायमर’चा धोका कमी होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितले व्यायाम प्रकार
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ

हेही वाचा- धूम्रपान आणि गर्भनिरोधक गोळ्यांमुळे महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो? तज्ञ सांगतात…

उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्या कमी करणारी फळं –

फायबरयुक्त फळे –

जास्त प्रमाणात सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅट्स असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमच्या कोलेस्टेरॉलच्या पातळी असंतुलीत होऊ शकते. परंतु विरघळणारे फायबर असणारे अन्न हृदयासाठी उत्तम असून कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासही मदत करते. फळांमध्ये पेक्टिन नावाचे विरघळणारे फायबर जास्त प्रमाणात असते. ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. फायबरयुक्त पदार्थामध्ये तुम्ही सफरचंद खाऊ शकता.

बेरी –

बेरी हे पौष्टिक पॉवरहाऊस असून ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याला फायटोन्यूट्रिएंट्सच्या सर्वात स्वादिष्ट आणि बहुमुखी स्त्रोतांपैकी एक मानले जाते. त्यांच्या अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे, ते विशेषतः बायोएक्टिव्ह रसायनांमध्ये मुबलक प्रमाणात असतात जे हृदयरोगासारख्या जुनाट विकारांना प्रतिबंधित करण्यास मदत करतात. बेरीज अँटिऑक्सिडंट्समुळे कोलेस्ट्रॉल आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.

हेही वाचा- तुमच्या जीवनातील ‘या’ ५ सवयी डायबिटीजचा धोका सहज दूर करु शकतात, कसं ते जाणून घ्या

अॅव्होकॅडो –

कॅलिफोर्निया अॅव्होकॅडो कमिशनच्या मते, अॅव्होकॅडो खाल्ल्याने तुमच्या शरीराला तुमच्या आहारातील इतर पोषक तत्वे शोषण्यास मदत होते. त्याच्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड (monounsaturated and polyunsaturated) फॅट्स असतात, जे हृदयासाठीही फायदेशीर असतात. त्याच्यातील HDL आणि LDL कोलेस्ट्रॉल पातळी दोन्ही योग्य पद्धतीने मॅनेज करू शकतात.

हेही वाचा- लठ्ठपणामुळे तुमची त्वचा काळी पडू शकते? जाणून घ्या काय सांंगतात तज्ञ…

केळी –

अनेकांना केळी खायला आवडतात, केळ हे सहज उपलब्ध होणाऱ्या फळांपैकी एक आहे. ते गोड आणि चविष्ट तर आहेच शिवाय त्याला एक उत्कृष्ट सुपरफूड देखील आहे. कारण त्यामध्ये फायबर, आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे तसेच सुक्रोज, फ्रक्टोज आणि ग्लुकोज सारख्या नैसर्गिक शर्करा असतात. चंदुवाडिया यांच्या म्हणण्यानुसार, केळी हे पोटॅशियम आणि फायबरचे चांगले स्त्रोत आहेत जे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.

लिंबूवर्गीय फळे (Citrus fruits) –

सफरचंदांमध्ये आढळणारा पेक्टिन हा पदार्थ कोलेस्ट्रॉल कमी करतो. तर लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यांच्यात अँटिऑक्सिडंट गुणांची ताकद असते, ते हानिकारक LDL कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यासाठी आणि निरोगी HDL कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे कार्य करतात. शिवाय ते व्हिटॅमिन सी हृदयरोग आणि रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत करतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)