करोना विषाणूचा झपाट्याने प्रसार झाल्यामुळे, बहुतेक कंपन्यांनी WFH सुरू केले होते. जेणेकरून त्यांचे कर्मचारी सुरक्षित राहतील आणि कंपनीच्या कामावर परिणाम होत नये.WFH सेट-अपचे एकीकडे अनेक फायदे आहेत, दुसरीकडे, यामुळे बहुतेक लोक आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. खरं तर घरच्या कामामुळे, लोकांना अनेकदा लॅपटॉपवर बराच वेळ बसून काम करावे लागते. त्याच्या अतिवापरामुळे लोक लॅपटॉप मांडीवर घेऊनही कामाला लागतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण आता यामुळे लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. लॅपटॉपमधून निघणाऱ्या उष्णतेमुळे आपली त्वचा आणि अंतर्गत ऊतींचे नुकसान होते, ज्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करताना तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते ते जाणून घेऊया…
पुरुषांमध्ये वंध्यत्वाचा धोका
महिलांपेक्षा पुरुषांना लॅपटॉपच्या उष्णतेचा जास्त त्रास होतो. महिलांचे गर्भाशय शरीराच्या आत असते आणि पुरुषांचे टेस्टीकल्स शरीराच्या बाहेरील भागात असते, त्यामुळे उष्णतेची किरणे जास्त जवळ राहतात. जास्त तापमानामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता कमकुवत होऊ लागते आणि त्यामुळे प्रजननक्षमतेमध्ये समस्या निर्माण होऊ शकते. म्हणूनच पुरुष जेव्हा लॅपटॉप वापरत असतील तेव्हा तो चुकूनही तुमच्या मांडीवर ठेवू नका.
( हे ही वाचा: भाताचे सेवन ‘या’ तीन आजारांवर विषासमान परिणाम करते; वेळीच जाणून घ्या..)
रेडिएशन पसरते
लॅपटॉप मांडीवर ठेवून तुम्ही काम करत असाल तर त्यामुळे डोकेदुखीही होऊ शकते. वास्तविक, यातून निघणारी उष्णता कमी फ्रिक्वेंसी रेडिएशन उत्सर्जित करते आणि रेडिएशन फक्त ब्लूटूथ कनेक्शनद्वारे बाहेर येते. ज्याने तुम्ही आजारी बनू शकतात.
स्नायूंमध्ये होऊ शकतात असह्य वेदना
लॅपटॉप वापरताना लोक अनेकदा पाय रोवून बसतात, त्यामुळे लॅपटॉपचे रेडिएशन थेट शरीरावर पडतात. त्यामुळे शरीरात वेदना सुरू होतात. तसेच लॅपटॉपचा सतत वापर टाळा. यामुळे स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात.