Know Your Body : मानवी शरीर ज्या पद्धतीने काम करते आणि ज्या प्रकारे प्रतिक्रिया देते ही एक अविश्वसनीय गोष्ट आहे. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांच्या कार्याबाबत जाणून घेणे हे किती रंजक गोष्ट आहे. तुम्हाला असे वाटते असेल की तुम्हाला तुमच्या शरीराबाबत सर्व काही माहित आहे. पण हे सत्य आहे का? आता हेच बघा ना, तुम्हाला जर कोणी गुदगुदल्या केल्या तर लगेच हसू येते पण तुम्ही कधी स्वत:ला गुदगुदल्या करून पाहिल्या आहेत का? नसेल तर मग एकदा करून पाहा! तुम्हाला गुदगुदल्या होतायेत का? नाही ना! कारण आपण स्वत:ला गुदगुदल्या करूच शकत नाही. कदाचित हे तुम्हाला माहित नसेल पण हे सत्य आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? काळजी करू नका! तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.

तुमच्या शरीराबाबत जाणून घ्या(Know Your Body ) या सदरामध्ये इंडियन एक्सप्रेसने याबाबत काही तज्ज्ञांबरोबर संवाद साधला आहे.

going to bed with a full stomach may cause backache cause a back pain
पोटभर जेवल्यानंतर लगेच झोपू नका! पाठदुखी टाळण्यासाठी सदगुरुनी दिला सल्ला, जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
hindu names of hijackers controversy
भावना दुखावून घेण्याची साथ आली आहे का? आयसी-८१४ वरील वाद हे त्याचंच लक्षण…
Tips for Buying a New Car in marathi
नवीन कार घरी आणण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची तपासणी करणे गरजेचे? PDI टेस्ट म्हणजे काय? जाणून घ्या A TO Z माहिती
रात्री गाडी चालवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? ‘या’ टिप्स करतील मदत
Making modak for beloved bappa
लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवत आहात? तज्ज्ञांकडून जाणून घ्या मोदकाचे फायदे
morality Act to impose restrictions on women by the Taliban government of Afghanistan
संपूर्ण शरीर झाकणारा पोशाख… मोठ्या आवाजात बोलणे नाही, गाणी नाही… महिलांसाठी अफगाण नैतिकता कायद्यातील अजब तरतुदी! 
Which finger should you get a glucometer test done on?
तुम्हालाही डायबिटीज आहे का? मग टेस्ट करताना कोणत्या बोटावर करायची? जाणून घ्या

आपण स्वत:ला गुदगुल्या का करू शकत नाही

राजकोट येथील, एचसीजी हॉस्पिटलचे, कन्सलटंट फिजिशियन, डॉ खुशाली लालचेता यांच्या मते, स्वतःला गुदगुल्या न करता येण्यामागे आपली मज्जासंस्था (nervous system) कारणीभूत आहे.

डॉ लालचेता सांगतात, ”गुदगुल्यामध्ये आश्चर्य आणि अनिश्चितता हे घटक असतात, ज्यामुळे स्पर्श आणि हास्यासंबंधित मज्जातंतूच्या प्रतिक्रियांची (neural responses) मालिका(cascade) सुरू होते. म्हणून, जेव्हा आपण स्वतःला गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपला मेंदू संवेदनांचा अंदाज घेतो आणि प्रतिसाद कमी करतो आणि गुदगुल्या होण्याची भावनेकडे दुर्लक्ष करतो.”

हेही वाचा – व्हिटॅमिन डीची कमतरता आहे, हे कसे ओळखावे? जाणून घ्या त्याची लक्षणे ….

मेंदूला स्वत:चा स्पर्श आणि इतरांचा स्पर्श ओळखता येतो

“हे न्यूरल मेकॅनिझम, ज्याला संवेदी क्षीणन(sensory attenuation) म्हणून ओळखले जाते, जे स्वत: केलेल्या कृतीमुळे निर्माण होणाऱ्या संवेदना फिल्टर करण्यासाठी एक संरक्षणात्मक यंत्रणा(Protective mechanism) म्हणून काम करते. त्यामुळे आपल्याला स्वत:चा स्पर्श आणि इतरांचा स्पर्श यामध्ये फरक करता येतो. स्वत:ला गुदगुल्या केल्यानंतर हसू येत नाही कारण हे सर्व आपल्या स्वतःच्या शरीराला जाणून घेण्याच्या आणि नियंत्रित करण्याच्या आपल्या उल्लेखनीय क्षमतेची कमाल आहे.”

गुदगुल्यांचा शारीरिक आणि मानसिक पैलू लक्षात घ्या

या प्रक्रियेचे वर्णन करताना, बंगळूरूच्या फोर्टिस हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजीचे सिनिअर कन्सटंट, डॉ कृष्णन पीआर गुदगुल्यांच्या शारीरिक पैलूबाबत सांगतात की, आपल्याला काखेत, तळव्यांना आणि बरगड्यांसारख्या संवेदनशील भागांना गुदगुल्या होतात, कारण शरीर मेंदूला संकेत पाठवते तेव्हा ज्या संवेदना जाणवतात त्यालाच आपण गुदगुदल्या म्हणतो.

गुदगुल्यांचा मनोवैज्ञानिक पैलूबाबत डॉ कृष्णन सांगतात की, ”गुदगुदल्या केल्यानंतर जाणवणारे आश्चर्य किंवा अनिश्चतता महत्त्वाचे घटक आहे. जेव्हा कोणी आपल्याला गुदगुल्या करतो तेव्हा आपल्याला त्याची अपेक्षा नसते. हे आश्चर्य गुदगुल्यांच्या संवेदना अधिक तीव्र करते. पण, जेव्हा आपण स्वतःला गुदगुल्या करतो, तेव्हा मेंदूला आधीच माहित असते की, काय होणार आहे, त्यामुळे गुदगुल्या होण्याची संवेदना तितकी तीव्र नसते,”

हेही वाचा – महिनाभर मीठ सोडल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या तज्ज्ञांकडून… 

स्वत:ला गुदगुदल्या केल्यानंतर मेंदू कसा काम करतो?

डॉ कृष्णन म्हणाले की, ”शास्त्रज्ञांनी निदर्शनास आणले आहे की, सेरेबेलम (जे हालचालीं नियंत्रण करणे आणि आपल्या कृतींच्या संवेदी परिणामांचा(sensory consequence)अंदाज लावण्यासाठी जबाबदार असते) हे आपल्या मेंदूचा एक भाग आहे जो आपल्याला स्वत:ला गुदगुल्या होण्यापासून प्रतिबंधित करतो.

जेव्हा आपण स्वतःला गुदगुल्या करतो तेव्हा सेरेबेलमला आधीच माहित असते की काय होणार आहे. आपण स्वतःला गुदगुल्या करू शकत नाही या नियमाला काही अपवाद आहेत. स्किझोफ्रेनियासारख्या काही न्यूरोलॉजिकल स्थिती असलेल्या लोकांना स्वतःला केलेल्या गुदगुल्या जाणवू शकतात. काही लोक त्यांच्या स्वत:च्या हालचाली आणि परिणामी होणाऱ्या गुदगुल्या, दोन्हीमध्ये थोडा विलंब करून स्वत: ला गुदगुल्या करू शकत असल्याचे नोंदवले आहे,” असेही डॉ कृष्णन यांनी सांगितले.

पण, डॉ कृष्णन यांनी निदर्शनास आणून दिले की, स्वतःला गुदगुल्या न होणे ही एक क्लिष्ट प्रक्रिया (complex phenomenon) आहे जी पूर्णपणे समजलेली नाही”.

काही व्यक्तींना स्वतःला गुदगुल्या होतात?

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ” स्वत:ला गुदगुदल्या न होण्यासारख्या सामान्य घटनेलाही अपवाद असू शकतात,”असे मत मुंबई येथील पवईच्या डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटलमधील जनरल मेडिसिन अँड इन्फेक्शन डिसिज स्पेशालिस्ट, डॉ नीरज कुमार तुलारा यांनी नमूद केले.

“काही व्यक्तींना स्वतःला गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करताना, विशेषत: शरीराच्या अधिक संवेदनशील भागात अजूनही सौम्य गुदगुल्याचा अनुभव येऊ शकतो. पण, त्याची तीव्रता सहसा दुसर्‍या व्यक्तीने गुदगुल्या केल्याच्या तुलनेत खूपच कमी असते,” असे डॉ तुलारा यांनी स्पष्ट केले.