प्रत्येक मानवी शरीराचे कार्य एकाच पद्धतीने पार पडते, असे आपण मानतो; पण या नियमालाही काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ- एका संशोधनातून असे समोर आले की, महिलांमध्ये दिवसाला ५० कॅलरीज या दराने म्हणजे अत्यंत मंद गतीने फॅट्स बर्न होतात.
Know Your Body series या सीरिजचा भाग म्हणून ‘इंडियन एक्स्प्रेस’ने काही तज्ज्ञांशी याबाबत संवाद साधला. तज्ज्ञांनी पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक मंद गतीने फॅटस् का बर्न होतात याची संभाव्य कारणे दिली आहेत.
स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरात अधिक फॅट्स बर्न होतात
हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार सांगतात की, सामान्यत: महिलांच्या तुलनेत पुरुष दिवसाला ५००-१००० पेक्षा जास्त कॅलरीज बर्न करतात. याचाच अर्थ असा की, जरी समान प्रमाणात कॅलरीचे सेवन केले तरी पुरुष महिलांपेक्षा एक ते दोन पौंड (दोन ते चार किलोग्रॅम) जास्त वजन आठवड्याला कमी करू शकतात.
महिलांच्या तुलनेत पुरुषांचे स्नायू अधिक lean muscle mass असतात आणि बेसल मेटाबॉलिक रेट (BMR) जास्त असतो आणि बेसल मेटाबॉलिक रेट (BMR) जास्त असतो. lean स्नायूंमध्ये इन्सुलिन रिसेप्टर्स (Insulin Receptors) असतात आणि ते जास्त कॅलरी वापरतात. म्हणूनच अगदी विश्रांती घेत असतानाही स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांसाठी अधिक कॅलरी बर्न करणे (आणि त्यामुळे जास्त फॅट्स कमी करणे) सोपे असते, ” असे डॉ. कुमार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – गुडघ्यांना दुखापत न होऊ देता एखादी व्यक्ती आठवड्यातून किती अंतर धावू शकते? जाणून घ्या काय सांगतात डॉक्टर….
स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये चयापचय दर जलद असतो
मुंबई येथील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी या रुग्णलया चे नोंदणीकृत आहारतज्ज्ञ व क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट डॉ. उषाकिरण सिसोदिया सांगतात, ”सामान्यत: स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त स्नायू असतात आणि स्नायू फॅट्सपेक्षा जास्त कॅलरीज वापरतात. परिणामत: पुरुषांमध्ये चयापचय दर जलद (Faster Metabolic Rate) असतो;जो स्त्रियांपेक्षा ३ ते १० टक्के जास्त असू शकतो, असे अभ्यासात दिसून आले आहे.”
चयापचयाची क्रिया मंदावणे (Slower Metabolism) हे सूचित करते, की शरीर श्वसन, आकलन व रक्ताभिसरण यांसारख्या सामान्य शारीरिक कार्यासाठी कमी कॅलरीज वापरते. डॉ. सिसोदिया यांच्या मते, ”कोणत्याही अतिरिक्त कॅलरीज नंतर फॅटच्या स्वरूपात शरीरात साठवल्या जातात.”
पुरुषांपेक्षा स्त्रियांचे शरीर नैसर्गिकरीत्या जास्त फॅट्स साठवते
रजोनिवृत्तीनंतरच्या (Post Menopausal) महिलांमध्ये ही समस्या अधिकच वाढत असल्याचेही डॉ. कुमार सांगतात.
“रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनची पातळी कमी होते आणि ज्या दराने शरीर संचयित ऊर्जेचे (चरबी) कार्यरत उर्जेमध्ये रूपांतरित करते. त्यानुसार इस्ट्रोजेन कमी झाल्यास चयापचयाचा दर (Metabolic Rate) कमी होऊ शकतो. त्याशिवाय रजोनिवृत्तीनंतर स्त्रिया lean muscle mass देखील (Lean Muscle Mass) गमावतात; ज्यामुळे बीएमआरमध्ये आणखी घट होते. पुरुषांपेक्षा स्त्रियांचे शरीर नैसर्गिकरीत्या जास्त फॅट्स साठवते,” असे डॉ. कुमार यांनी सांगितले.
हेही वाचा – तुम्ही स्वत:ला गुदगुदल्या का करू शकत नाही? जाणून घ्या काय सांगतात डॉक्टर
पुरुषांसाठी हा फरक फायेदशीर असला तरी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये
हा फरक पुरुषांसाठी फायदेशीर दिसत असला तरी पुरुषांनी त्याचा चुकीचा अर्थ घेऊन आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. अमेरिकन कौन्सिल ऑन एक्सरसाइजनुसार, अॅक्टिव्ह स्त्रीच्या शरीरात २१ ते २४ टक्के फॅट्स असतात; तर पुरुषांमध्ये त्याचे प्रमाण १४ ते १७ टक्के आहे.
डॉ. कुमार स्पष्ट करतात, “स्त्रियांच्या शरीरात खालच्या अर्ध्या भागात (नितंब, ओटीपोट व मांड्या) फॅट्स साठवले जातात; तर पुरुषांच्या ओटीपोटात फॅट्स साठवण्याची प्रवृत्ती असते, विशेषत: त्यांच्यामध्ये जास्त व्हिसरल फॅट्स असतात (ज्यामुळे स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो).
डॉ. सिसोदिया यांच्या म्हणण्यानुसार, वजन कमी करण्यात सर्कॅडियन ऱ्हिदम (Circadian rhythms ) देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. जिम वर्कआउट्स करणाऱ्या स्त्रिया सामान्यत: कार्डिओवर लक्ष केंद्रित करतात; तर पुरुष वजन प्रशिक्षणाला प्राधान्य देतात.
अन्नाच्याबाबतीत पुरुष आणि स्त्रियांचा मेंदू वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात
जानेवारी २००९ मध्ये प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासाचा दाखला देत, नवी दिल्लीच्या मदर्स लॅप आयव्हीएफ सेंटरच्या वैद्यकीय संचालक असलेल्या डॉ. शोभा गुप्ता सांगतात, ”जरी त्यांनी भूक लागत नाही, असा दावा केला असला तरी महिलांच्या मेंदूच्या स्कॅनमध्ये त्यांच्या खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण ठेवणाऱ्या भागात अॅक्टिव्हिटी दिसून आली. या स्कॅनदरम्यान महिलांना एखाद्या पदार्थाचा वास देण्यात आला, एखाद्या पदार्थाची चव दिली आणि पिझ्झा खाण्यास सांगण्यात आले होते; पण पुरुषांच्या बाबतीत मात्र अशी अॅक्टिव्हिटी दिसून आली नाही.
हेही वाचा – व्हिटॅमिन डीची कमतरता आहे, हे कसे ओळखावे? जाणून घ्या त्याची लक्षणे ….
“जेव्हा एखादा पदार्थ खाण्याचा प्रश्न येतो, तेव्हा पुरुष आणि स्त्रियांचा मेंदू वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतो. इतर वेळी तुम्ही उठल्यापासून झोपण्याच्या क्षणापर्यंत तुमची लाइफस्टाईल महत्त्वाची असते,” डॉ. गुप्ता म्हणतात.
“एखाद्यासाठी वैयक्तिक आरोग्य स्थितीची पर्वा न करता, निरोगी होण्याचा प्रवास अवघड आणि गोंधळात टाकणारा असू शकतो. वजन कमी करणे म्हणजे फक्त तुम्ही जितके फॅट्स बर्न करता, त्यापेक्षा कमी कॅलरीचे सेवन करणे, असा दीर्घकाळचा विश्वास असूनही प्रत्यक्षात याबाबत कोणतीही स्पष्टता नाही,” असे डॉ. सिसोदिया म्हणतात.