अलीकडेच पुण्यात घडलेली घटना. १३ आणि १४ वर्षांच्या दोन मुली के पॉप मध्ये संधी मिळावी या हेतूने घरातून पळून मुंबईला गेल्या. त्यांना इंटरनेटवर केपॉप इंडस्ट्रीत जाण्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्थांची माहिती मिळाली होती आणि आपल्याला नृत्य चांगले करता येते तर आपणही केपॉप आयडल होण्याचा प्रयत्न करावा असं त्यांना वाटलं पण कुठलीही इतर माहिती न मिळवता त्यांनी थेट मुंबई गाठलं. साऊथ कोरियाला जाण्यासाठी किंवा मुळातच भारताबाहेर जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसा, विमानाचे तिकीट या गोष्टी लागतात याची कसलीही माहिती त्यांच्याकडे नव्हती. नशिबाने त्या चुकीच्या माणसांच्या संपर्कात आल्या नाहीत आणि सुखरूप घरी पोचल्या. पण मुंबईच्या मायानगरीत भलत्याच माणसांशी त्यांचा संपर्क आला असता तर? नुसत्या विचारानेही काळजाचा ठोका चुकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा: Mental Health Special: शाळकरी मुलांहाती मोबाईल …

ही बातमी वाचत असताना स्ट्रगल हे पुस्तक लिहिताना मुंबईत भेटलेले कितीतरी तरुण तरुणी आठवले. एकदिवस आपण पण माधुरी दीक्षित नाहीतर अमिताभ बच्चन बनणार हे स्वप्न उराशी बाळगलेले. स्ट्रग्लर्स लिहिलं तेव्हा इंटरनेट आणि विशेषतः सोशल मीडिया आजच्या सारखा जोमात नव्हता. त्यामुळे ऐन तारुण्यात पदार्पण करणाऱ्या भारतभरातल्या मुलांमुलींसाठी हिंदी सिनेसृष्टीच सगळं काही होती. पण काळ बदलला, इंटरनेटचं जाळं पसरलं, सोशल मीडिया आला आणि मनोरंजनाचं जग खऱ्या अर्थाने जवळ आलं. कालपर्यंत ज्यांना लांबून बघत, ऐकत होतो त्यांच्याशी DM च्या माध्यामातून थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. आणि मै माधुरी दीक्षित बनाना चाहती हू चं स्वप्न ‘नेक्स्ट लेव्हल’ ला गेलं.

आणखी वाचा: सर्फिग : हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा

२०१२मध्ये साय या कोरियन आयडलचं गंगनम स्टाईल हे गाणं आलं आणि भारतामध्ये कोरियन एंटरटेनमेंटची लाट उसळली. पाठोपाठ, BTS आणि ब्लॅक पिंक या केपॉप ग्रुप्सनी मुलांच्या मनाचा ताबा घेतला. या सगळ्याच के पॉप ग्रुप्स आणि आयडल्सशी ऑनलाईन जगामुळे कनेक्शन सोपं झालं आणि मोठ्या शहरांपासून गावखेड्यात राहणाऱ्या मुलामुलींना मुंबई ऐवजी साऊथ कोरियाची स्वप्न पडायला लागली. त्यातही दोन भारतीय मुलींनी केपॉप ग्रुप्समध्ये डेब्यू केल्यामुळे हे परदेशी स्वप्न हाताबाहेरचं नाही असंही वाटायला लागलं. वयात येत असताना सेलिब्रिटी क्रश असणं, आपणही ग्लॅमरच्या जगात जावं, प्रचंड प्रसिद्ध व्हावं असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. हे सगळं पूर्वीही होतं आणि आजही आहे. फक्त फरक इतकाच झाला आहे की इंटरनेटमुळे या सगळ्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. संधी वाढल्या आहेत तसेच धोकेही वाढले आहेत. के पॉप किंवा के ड्रामाचा विषय निघाला की त्यांनी कसं जाणीवपूर्णक आपल्याकडच्या तरुणतरुणींना टार्गेट केलं आहे, हे के आक्रमण कसं रोखलं पाहिजे वैगरे चर्चांना उधाण येतं. पण मुळात या सगळ्या चर्चा करत असताना दोन गोष्टींकडे लक्षच दिलं जात नाही, एक म्हणजे अशा तऱ्हेने ग्लॅमर जगाचं आकर्षण वाटणारी ही पहिली पिढी नाहीये. सिनेमा या प्रकाराची निर्मिती झाल्यापासून हे आकर्षण आहे. तुफान आहे. आणि या सगळ्यातल्या धोक्यांविषयी पूर्वीही कुणी वयात येणाऱ्या मुलामुलींशी बोलत नव्हतं, आजही बोलत नाही. आपली मुलं के पॉप ऐकतात याविषयी रागराग अनेक घरातून बघायला मिळतो. किंवा टीनएज / हायस्क्रूल के सीरिअल्स बघतात याबद्दल कुत्सित चर्चा होते पण हा विचार कधी केला आहे का की किशोरवयीन मुलांना त्यांच्या आयुष्याचं जगणं बघायला मिळेल असं मनोरंजन आपल्याकडे निर्माण होतं का? टीनएज मुलामुलींसाठी म्हणून निर्मित केली जाणारी ना पुस्तकं आहेत, ना सिनेमे आहेत, ना सीरिअल्स आहेत, ना वेबटून्स आहेत. यातलं काहीही त्यांना उपलब्ध नाही. आजही आपल्याकडे मुलांनी मोठ्यांसाठी बनवलेल्या मनोरंजनात स्वतःच समाधान करुन घ्यावं अशी अपेक्षा असते.

मग मुलं का जापनीज ऍनिमे बघणार नाहीत? का हायस्कुल ड्रामा बघणार नाहीत, का त्यांच्याच वयाच्या मुलांनी गायलेली गाणी ऐकणार नाहीत. आपल्याकडे तरुण मुलामुलींच्या गाण्यांचे रिऍलिटी शो होतात, पण त्यात नवीन गाणी किती असतात? जुन्या गाण्यांच्याच बळावर सगळं सुरु आहे आजही. अशावेळी नवं, वेगळं जे त्यांच्या जगण्याशी संबंधित आहे असं मुलांना ऐकायला, बघायला, वाचायला मिळणार असेल तर ते त्या गोष्टी करणार. ते थोरा मोठ्यांची आत्मचरित्र्य नाही वाचणार ते हॅरी पॉटरच वाचणार. कारण आपल्याकडे हॅरी पॉटर तयार होत नाही. वयाच्या पंधराव्या वर्षी केपॉप आयडल होऊन २५ साव्या वर्षी ग्लोबर स्टार होणारा जंग कूक आपल्याकडे निर्माण होत नाहीये ही वस्तुस्थिती आहे. मुलांसाठी काहीही बनत नाही आपल्याकडे. मग त्यांच्या मनोरंजनाच्या या गरजा जिथून भागातील तिथे ही मुलं जातात, जाणार.

कुठलीही मनोरंजनाची इंडस्ट्री ब्युटी स्टॅंडर्ड शिवाय चालत नाही. मग ती साऊथ कोरियन असो नाहीतर भारतीय. त्यामुळे त्या इंडस्ट्रीला नावं ठेवण्यापेक्षा त्यांनी जगभर स्वतःचं वादळ आणण्यासाठी काय काय केलं, मार्केटिंग आणि संस्कृतीचं मार्केटिंग कसं केलं हे बघणं आवश्यक आहे. आज आपल्याकडे फक्त केपॉप आणि के ड्रामाच हिट आहे असं नाहीये, त्यांचे पदार्थ, भाषा याचीही प्रचंड क्रेझ आहे. आणि हे फक्त आपल्याकडे आहे असं नाहीये, जगभर आहे. JYP ही केपॉप मधली सगळ्यात मोठी संस्था सध्या अमेरिकन केपॉप ग्रुप बनवण्यासाठी अमेरिकाभर ऑडिशन्स घेते आहे. त्याचा रिऍलिटी शो युट्युबवर बघता येऊ शकतो. भारतात हे वेड आहे नक्कीच, पण भारतात आजवर एकही केपॉप ग्रुप कार्यक्रम करायला आलेला नाही किंवा भारतात त्यांच्या ऑडिशन्सही होत नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे. असं का होत असावं याचा विचार केला पाहिजे. बारकाईने बघितलं तर एक मात्र लक्षात येतं की भारताची ग्लोबल इमेज ग्राहक ही आहे. क्रिएटर्स नाही.

आपल्याकडे आणि तरुण पिढीकडे, येणाऱ्या पिढ्यांकडे जर जग बाजारपेठ आणि ग्राहक म्हणून बघणार असेल तर एकतर देश म्हणून खूप मेहनत घेऊन आपल्याला ही इमेज बदलावी लागेल नाहीतर आपल्या घरातल्या मुलांना तुम्ही या सगळ्याचे ग्राहक आहात म्हणजे काय आहात हे नीट समजावून द्यावं लागेल. आहे तयारी?