मेथीच्या पानांपासून बनवलेले मेथीचे पराठे सर्वांनाच आवडतात. परंतु, हे पराठे चवीला जितके सुंदर लागतात तेवढेच ते आपल्या आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहेत असे समजते. या पराठ्यांमध्ये फायबर, लोहा आणि जीवनावश्यक जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने हे पराठे आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. असा हा पौष्टिक मेथी पराठा, अभिनेत्री क्रिती सेननचादेखील आवडता पदार्थ असल्याचे समजते. कारण क्रिती सेननने तिच्या सोशल मीडियावर, “अमूल बटर + मेथी पराठा, माझ्या आवडीचा पदार्थ” असे लिहले होते.

मेथी पराठ्याचे शरीराला आणि आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे होत असतात ते कोणते पाहा.

१. पोषक घटक

Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
Cardamom benefit in winter Wonderful Cardamom Benefits You Should Definitely Know About
हिवाळ्यात वेलची खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; आहारात समावेश करण्याआधी नक्की वाचा
Ginger benefits in winter This winter superfood will help keep the body warm and healthy
आला हिवाळा…तब्येत सांभाळा! थंडीत आलं खाणं चांगलं, पण किती प्रमाणात खावं? जाणून घ्या
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
fruits pack the most nutritional punch
Nutrient Rich Fruits : कोणती फळं सर्वात जास्त पोषण देतात तुम्हाला माहिती आहे का? मग आहारतज्ज्ञांनी दिलेली ‘ही’ यादी वाचा

मेथी पराठ्यांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर असल्याने आपल्या शरीरास आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांचा पुरवठा या पदार्थांमधून होतो.

२. रक्तातील साखरेवर नियंत्रण

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी, मेथीचा वापर केला जाऊ शकतो. असे असल्याने मेथी पराठा हा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी उत्तम आहार ठरतो, असे मुंबई येथील रेजुआ एनर्जी सेंटरमधील आहारतज्ज्ञ डॉक्टर निरुपमा राव यांचे म्हणणे आहे.

३. पचनसंस्था

मेथी पराठ्यामध्ये असणारे फायबर आपल्या पचनाच्या क्रियेसाठी फार उपयुक्त असून, यांच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

हेही वाचा : पोट फुगण्याचा, ब्लोटिंगचा सतत त्रास होतोय? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजाराचे लक्षण; पाहा

४. हृदयाच्या आरोग्यासाठी

हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मेथीचा फायदा होतो. मेथीमुळे, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

५. अँटी-इंफ्लेमेटरी घटक

शरीरातील इंफ्लेमेशन/दाहकता कमी करण्यास मेथीचा उपयोग केला जाऊ शकतो, असे डॉक्टर राव म्हणतात.

६. लोहाचे प्रमाण वाढवणे

आपल्या शरीरात, रक्तातील लाल पेशी वाढवण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. मेथीमध्ये लोह असल्याने रक्तातील लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत होते. “ज्यांना नैसर्गिकरित्या रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवायचे असेल, त्यांनी मेथी घातलेले पराठे खाणे फायद्याचे ठरू शकते”, असा सल्ला डेहेराडूनमधील, ‘सोलफिट क्लाउड किचनच्या संस्थापक आणि आहारतज्ज्ञ रूप सोनी यांनी दिला आहे.

पराठ्यांसोबत बटर खायला कोणाला नाही आवडत? पण, ते किती खायचे याचेदेखील एक प्रमाण आहे. त्या प्रमाणाबाहेर खाऊ नये.

हेही वाचा : हिवाळ्यात बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय? ‘या’ पाच सवयी असू शकतात यामागचे कारण….

किती प्रमाणात बटर खाणे योग्य असते?

बटरमध्ये असणाऱ्या फॅट्स आणि कॅलरीजमुळे हा पदार्थ थोड्या प्रमाणात खाणेच योग्य ठरेल. “पराठ्यावर अगदी हलक्या हाताने पसरवलेले बटर पराठ्याची चव वाढवण्यास मदत करून फार प्रमाणात कॅलरीज वाढत नाही. त्यामुळे ते तितकेच खाणे योग्य ठरेल. आपल्या आहारानुसार आणि शरीराला जितकी गरज असेल, तेवढ्याच प्रमाणात बटर खाणे अपेक्षित आहे”, असेदेखील डॉक्टर राव यांचे म्हणणे आहे. डॉक्टर राव यांच्या मताशी आहारतज्ज्ञ रूपा यासुद्धा सहमती दर्शवतात आणि म्हणतात, “बटर जरी पदार्थाची चव वाढवण्यासाठी मदत करत असले आणि चांगले फॅट्स देत असले तरीही त्याच्या अतिरिक्त खाण्यामुळे कॅलरीज वाढण्याची शक्यता असते.”

मेथी पराठा खाण्याची योग्य वेळ कोणती?

आहारतज्ज्ञ रूपा यांच्या मते तुम्ही सकाळच्या नाश्त्याला मेथी पराठा खाणे चांगले राहील. यामुळे दिवसभर पोट भरल्यासारखे वाटू शकते. “मेथी पराठ्यामध्ये असणारे फायबर आणि कर्बोदके [कार्बोहायड्रेट] हे दिवसभरासाठी तुम्हाला भरपूर ऊर्जा प्रदान करू शकते. त्यासोबतच सकाळी असा भरपेट नाश्ता केल्याने, मधल्यावेळात लागणारी भूक कमी होऊन तुम्हाला अवेळी काही खाण्यावर ताबा मिळवता येऊ शकतो.”