Benefits Of Clove Tea: सोशल मीडियावर कधी कधी खूपच उपयुक्त ट्रिक्स समजतात तर काही वेळा उगाच अंधानुकरण करणं जीवावर बेतू शकतं. सहसा चांगल्या व वाईट अशा हॅक मध्ये फरक ओळखणं सोपं असतं पण खरी समस्या तिथे येते जेव्हा तुम्हाला हॅक फायद्याची तर ठरणार असतेच मात्र ती कशी अंमलात आणावी यासाठी सतर्क राहणे खूप गरजेचे असते. अशाच एका व्हायरल चहाच्या हॅकवर आज आपण तज्ज्ञांचं मत जाणून घेणार आहोत.

इन्स्टाग्राम पेज @hyaluxebody वर वजन कमी करण्यास मदत करण्यासाठी व चयापचय सुधारण्यासाठी लवंगाच्या चहाचा पर्याय सुचवण्यात आला होता. लवंगाचा चहा हे एक लोकप्रिय हर्बल पेय आहे जे गरम पाण्यात वाळलेल्या लवंगाच्या कळ्या टाकून तयार केले जाते. लवंग हा भारतीय मसाल्यांमध्ये चव आणि सुगंधासाठी ओळखला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. या लवंगाचे चहाच्या रूपात सेवन करणे हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Pankaj Tripathi shares recipe for his ‘special’ masala chai
पंकज त्रिपाठी मसाला चहामध्ये टाकतात तमालपत्र! चहामध्ये तमालपत्र घालावे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
Lauki ke creamy kofta in Marathi dudhi kofta recipe in marathi veg kofta recipe in marathi
दुधी खाताना घरचे नाक मुरडतात ? बनवा झणझणीत दुधी कोफ्ता; ही रेसिपी बनवाल तर दोन पोळ्या जास्तच खाल

हॅकनुसार लवंगाचा चहा कसा बनवायचा?

  • मूठभर लवंगा घ्या.
  • त्यांना थोडं खलबत्त्याने कुटूनघ्या
  • उकळत्या पाण्यात कुटलेल्या लवंगा घाला.
  • 20 मिनिटे उकळी येऊ द्या.
  • एका कपमध्ये चहा ओटा.
  • लिंबाचा रस घालून आनंद घ्या.

गुडगाव येथील पोषणतज्ज्ञ आणि प्रमाणित मधुमेह शिक्षक डॉ अर्चना बत्रा यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, सिझिजियम अ‍ॅरोमॅटिकम झाडाच्या वाळलेल्या फुलांच्या कळ्यापासून तयार केलेला लवंगाचा चहा हा आरोग्यासाठी उत्तम अशी ओळख मिळवत आहे. त्यांनी नमूद केलेले लवंगाच्या चहाचे फायदे खालीलप्रमाणे:

लवंग चहाचे फायदे (Laung Chai Benefits)

अँटिऑक्सिडेंटचं पॉवरहाऊस: लवंगाच्या चहामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यासाठी आणि पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. यामुळे आजारांचा धोका कमी होऊ शकतो. लवंगात आढळणारे युजेनॉल कंपाऊंड हे दाहक-विरोधी असते. लवंगाच्या चहाचे नियमित सेवन शरीरातील जळजळ कमी करण्यात मदत करू शकते, संधिवात असल्यास अशा स्थितीत आराम मिळू शकतो.

पचनास मदत: लवंग पचनाची समस्या कमी करण्यासाठी वापरली जाते. लवंगांचा चहा पोट फुगणे, गॅस आणि अपचन दूर करण्यास मदत करतो तसेच पचनाचा वेग सुद्धा वाढवतो.

तोंडाचे आरोग्य: लवंगा नैसर्गिक वेदनाशामक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. “लवंगाच्या चहामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी व्हायला मदत होते ज्यामुळे दातदुखी व हिरड्यांची जळजळ कमी होऊ शकते.

लवंग चहा सर्वांसाठी फायद्याचा आहे का?

लवंग चहा सामान्यतः अनेक लोकांसाठी प्रमाणात सेवन केल्यावर सुरक्षित असतो. पचन समस्या, जळजळ किंवा तोंडाच्या आरोग्याच्या समस्यांसाठी नैसर्गिक उपाय शोधणाऱ्यांसाठी हे विशेषतः फायदेशीर ठरू शकते. मात्र काही विशिष्ट बाबींची काळजी घेणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. डॉ. बत्रा यांनी सांगितल्याप्रमाणे लवंगाच्या चहाचे सेवन करण्याआधी लक्षात घ्यायच्या गोष्टी कोणत्या, हे पाहूया..

काय लक्षात ठेवावे?

संयम महत्वाचा आहे: लवंग आरोग्यसाठी अनेक फायदे देतो, परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्याने प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. गुंतागुंत टाळण्यासाठी लवंग चहाचा प्रमाणात आस्वाद घ्या.

गर्भधारणा आणि नवीन आईपण: गर्भवती महिला किंवा ज्यांची नुकतीच प्रसूती झाली आहे किंवा ज्या बाळाला अजूनही दूध पाजत आहेत, अशा महिलांनी लवंगाच्या चहाचे सेवन करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

रक्तातील साखरेची पातळी: लवंगाचा चहा रक्तातील साखरेची पातळी प्रभावित करू शकतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी किंवा रक्तातील साखरेचे नियमन करण्यासाठी औषधे घेत असलेल्यांनी चहाच्या सेवनानंतर रक्तातील साखरेच्या पातळीचे बारकाईने निरीक्षण करावे शिवाय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

हे ही वाचा<< १०० ग्रॅम आवळा तुमच्या शरीरात काय बदल घडवू शकतो? डायबिटीस असल्यास ‘हा’ गैरसमज आधी सोडवूया 

ऍलर्जी: लवंग किंवा संबंधित वनस्पतींची ऍलर्जी असलेल्या मंडळींनी लवंग चहा टाळावा.