कमी कालावधीसाठी होणाऱ्या आजारामुळे इन्फ्लेमेशनची समस्या उद्भवते. ज्यामध्ये ऍलर्जी, सूज, खाज, डोळ्यांत जळजळ, सांधेदुखी, सर्दी, या आजारांचा समावेश होतो. इन्फ्लेमेशन हे रोगप्रतिकारक शक्तीचा परिणाम आहे. अनेकदा आपले शरीर अशा काही पदार्थाच्या संपर्कात येते, ज्यासाठी आपले शरीर खूप संवेदनशील असते, ज्यामुळे ही संवेदनशीलता पटतन दिसून येते आणि काहीवेळा ती दीर्घकाळापर्यंत राहते.

डॉ. शुचिन बजाज उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे संस्थापक यांनी इन्फ्लेमेशनच्या समस्येबद्दलची काही कारणे आणि उपाय सांगितले आहेत, ते जाणून घेऊया. सूज येणे ही शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीची नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे संसर्ग, दुखापत किंवा वेदना होऊ शकतात. सूज ही अल्पावधीमधील किंवा जुनाट असू शकते. तीव्र सूज ही दुखापती किंवा संसर्गाचा अल्पकालीन प्रतिसाद असतो, तर जुनाट सूज काही महिने किंवा वर्षांपर्यंत टिकू शकते. ज्यामुळे संधिवात, हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या विविध समस्या उद्भवू शकतात.

हेही वाचा- डायबिटीज आणि बीपीच्या रुग्णांसाठी लाल द्राक्ष ठरु शकतात फायदेशीर? तज्ञ सांगतात…

इन्फ्लेमेशनची कारणे –

शारीरिक इजा – जखमा, भाजणे, कापणे आणि इतर शारीरिक दुखापतींमुळे सूज येऊ शकते.

जुनाट आजार – मधुमेह, लठ्ठपणा आणि ऑटोइम्यून रोग यांसारख्या जुनाट आजारांमुळे दीर्घकाळापर्यंत सूज येऊ शकते.

दुषित वातावरण – वायू प्रदूषण, रसायने आणि जड धातू यांसारख्या दुषित पर्यावरणामुळेही सूज येण्याची समस्या उद्भवू शकते.

तणाव – जास्तीचा तणाव हे देखील एक सूज येण्याचे कारण असू शकते.

हेही वाचा- Hormonal imbalance मुळे होऊ शकतात गंभीर आजार, हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी आहारामध्ये करा ‘या’ पदार्थांचा समावेश

  • सूज कमी करण्यासाठीचे उपाय –

डॉ. शुचिन यांच्या मते, सूज कमी करण्यासाठी दाहक-विरोधी आहाराचा अवलंब करणे फायदेशीर ठरते. ज्यामध्ये फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने आणि निरोगी चरबी यासारखे भरपूर प्रमाणात दाहक-विरोधी अन्नपदार्थांचे सेवन करा.

व्यायाम – नियमित व्यायामामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि तणाव कमी होतो ज्याची सूज कमी होण्यास मदत होते. म्हणूनच दिवसातून एकदा व्यायामासाठी वेळ काढा जेणेकरून तुम्हाचा शरीराला सूज येण्यापासून आराम मिळेल.

हेही वाचा- ‘ब्रेस्ट मिल्क’ डोनेट कसं केल जातं? परवानगी कशी मिळते? A टू Z प्रश्नांची उत्तर जाणून घ्या

योगासने – काही तणाव कमी करणाऱ्या योगासनांचा सराव केल्याने सूज येण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

सप्लिमेंट्स – सूज कमी करण्यासाठी ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, कर्क्युमिन आणि आले यांसारखी काही सप्लिमेंट्स घेऊ शकता.

झोप – पुरेशी झोप घेणे सूज कमी करण्यास खूप मदत करू शकते.

डॉक्टरांचा सल्ला – सूज मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर अशावेळी वैद्यकीय उपचार आवश्यक असू शकतात. यामध्ये डॉक्टरांनी दिलेली औषधे किंवा इतर गोष्टींचा समावेश असू शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)