दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. स्तनपानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, तसेच त्याचे फायदे आणि महत्त्व जाणून घेण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन केले जाते. अनेक महिलांना स्तनपान कसे करावे, त्याची योग्य पद्धत कोणती हे माहीत नसते. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी, तसेच आई आणि ब्लॅक दोघांसाठीही आरोग्य-कल्याणाचा महत्त्वाचा मुद्दा म्हणून जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येतो. यावर्षीची ‘लेट मेक ब्रेस्टफीडिंग अँड वर्क, वर्क’ ही थीम आहे.
२०१८ मध्ये, वर्ल्ड हेल्थ असेम्ब्लीने जागतिक स्तनपान सप्ताहाला एक महत्त्वाची आरोग्य योजना म्हणून मान्यता आणि प्रोत्साहन दिले. यावर्षी ‘लेट मेक ब्रेस्टफीडिंग अँड वर्क, वर्क’ ही थीम निवडण्यात आली आहे. या थीममागील कल्पना अशी आहे की, ज्या स्त्रिया कामही करतात आणि मुलांना स्तनपान करतात, त्या महिलांनी एक पर्याय निवडू नये. काम आहे म्हणून स्तनपान करण्याचे टाळू नये किंवा स्तनपानासाठी काम सोडू नये. दोन्ही गोष्टींना योग्य प्राधान्य द्यावे. आज अनेक ‘वर्किंग वुमन्स’ असतात. काम आणि बाळंतपण एकत्र करणे अवघड असते. गरोदरावस्था, त्यानंतर आलेले पालकत्व, वाढलेली जबाबदारी या सर्वांचा ताण त्या महिलेवर येतो. मुलांना ‘डेकेअर’ला ठेवले जाते, किंवा सांभाळणाऱ्या बाईकडे ठेवले जाते, त्यामुळे पुरेसे स्तनपान मुलांना होऊ शकत नाही किंवा स्तनपान टाळले जाते. याचा आईच्या आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो.
हेही वाचा : World Lung Cancer Day 2023: फुफ्फुसे निरोगी कशी ठेवाल ? फुफ्फुसे स्वच्छ ठेवणे शक्य आहे ?
स्तनपानाचे फायदे
बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या अँटीबॉडीज, पोषकद्रव्ये, पाचक संप्रेरके आईच्या दुधातून बाळाला मिळतात.डॉ. लता बालसुंदरम, हैदराबाद यांनी सांगितले की, स्तनपान जसे बाळासाठी आवश्यक असते, तसे आईसाठीही महत्त्वाचे असतात. स्तनपानामुळे कर्करोगाची शक्यता कमी होते, प्रसूतीनंतर होणारी रिकव्हरी योग्य होते, प्रसूतिपश्चात होणारा रक्तस्राव कमी होण्याची शक्यता असते. मुख्य म्हणजे आईचे आणि बाळाचे नाते अधिक दृढ होते. गरोदरपणात तसेच बाळंत झाल्यावर सर्वच आपल्या आपल्या परीने सल्ले देत असतात. त्यामुळे नक्की स्तनपान कसे करावे, याबाबत आईचा गोंधळ होऊ शकतो. डॉ. बालसुंदरम यांनी स्तनपानासंदर्भात काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.
हेही वाचा : मायग्रेनचा त्रास होतोय ? कशी कमी कराल डोकेदुखी
स्तनपान करताना ‘हे’ करा
बाळाचा जन्म झाल्यावरही आई आणि बाळाने एकमेकांच्या जवळ, त्वचेचा संपर्क राहील असे बघितले पाहिजे. त्वचेचा स्पर्श होणे हे बाळ आणि आईसाठी महत्त्वपूर्ण असते. जन्मानंतर लगेच किंवा जन्मानंतर जे ‘गोल्डन अवर्स’ असतात, त्या काळात स्तनपान करा. स्तनपान हार्मोन्स नियंत्रित करण्यासही मदत करते. बाळाला प्रथम आईचेच दूध द्या, अन्य सुवर्ण, साखर असे कोणतेही पदार्थ बाळाला देऊ नये. स्तनपानासाठी योग्य ‘पोझ’ निवडा. ज्याच्यामध्ये आई आणि बाळ दोघांनाही सुरक्षित आणि ‘कम्फर्टेबल’ वाटेल. तुम्हाला आणि बाळाला आरामदायी वाटणे आवश्यक आहे, यासाठी दोन-तीन पोझ माहीत करून घ्या. बाळाच्या भुकेचे संकेत समजून घ्या, तसेच त्याच्या साधारण भुकेच्या वेळा जाणून घ्या. याला रिस्पॉन्सिव्ह फीडिंग किंवा डिमांड फीडिंग म्हणतात. स्तनपान करणाऱ्या आईने पुरेसा आहार, द्रवपदार्थ घेणे आवश्यक आहे.
स्तनपान करताना ‘हे’ करू नका
बाळाला लवकर, टीथर, दुधाची बाटली देऊ नका. यामुळे त्याच्या आईचे दूध पिण्याच्या सवयी बदल्याची शक्यता असते. स्तनपानाच्या वेळी स्तने दुखत असतील, किंवा सुजलेली वाटत असतील तर वैद्यकीय सल्ला घ्या. स्तनपान करणाऱ्या आईने घट्ट ‘ब्रा’ घालणे टाळावे. घट्ट ब्रा किंवा कपड्यांमुळे दुधाच्या ग्रंथी अवरोधित होण्याची शक्यता असते. स्तनपान सुरू असताना कॅफीन किंवा अल्कोहोलचे सेवन करू नये. स्तनपान करताना कोणतीही औषधे घ्यायची असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. स्वतःच्या मनाने औषधोपचार करू नये. दूध अधिक यावे, यासाठी रासायनिक घटकांचे सेवन करू नये. योग्य पौष्टिक आणि सकस आहार घ्यावा. शारीरिक आणि मानसिकरित्या तंदुरुस्त राहावे. मानसिक ताणामुळे स्तनपान व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आईने प्रसन्न असणे आवश्यक आहे.
स्तनपान हे बाळासाठी आणि आईसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर स्तनपान केले पाहिजे. काही अडचण वाटत असल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.