डॉ. वैभवी वाळिम्बे

आपण एक अतिशय इंटरेस्टिंग आणि भक्कम शास्त्रीय आधार असलेली संकल्पना आज समजून घेणार आहोत. लोरेमर मोसेले आणि बटलर या दोन जगविख्यात पेन सायंटिस्ट्स यांना संशोधनानंतर असं लक्षात आलं की हे सिम्स आणि डिम्स मेंदूतील असे सिग्नल्स (शास्त्रीय भाषेत ‘न्यूरोटॅग्स’) आहेत, जे मेंदूला वेदना उत्पन्न करण्यासाठी किंवा न करण्यासाठी उद्युक्त करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर सिम्स आणि डिम्स मेंदूसाठी अनुक्रमे विश्वासार्हता आणि संभाव्य धोका यांचे पुरावे आहेत.

hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल
Most robotic surgeries performed by Tata hospital in shortest time
टाटा रुग्णालयाकडून कमी कालावधीत सर्वाधिक रोबोटिक शस्त्रक्रिया

आपल्या आजूबाजूला असलेल्या विश्वासार्ह पुराव्यांमुळे मेंदू आनंदी आणि निश्चिंत होतो (जेव्हा साहजिकच त्याला वेदना उत्पन्न करण्याची गरज भासत नाही) आणि संभाव्य धोक्याच्या पुराव्यांमुळे तो अलर्ट होतो, प्रोटेक्टिव्ह होतो (आणि साहजिकच तेव्हा तो वेदना उत्पन्न करतो; कारण वेदना ही संरक्षणासाठी आहे हे आपण या आधी उदहरणांसहित समजून घेतलं आहे). हे सिम्स आणि डिम्स बदलले जाऊ शकतात. किंबहुना, ते बदलले गेले पाहिजेत, आपली वेदनेबद्दलची समज बदलण्यासाठी.

एक्सप्लेन या उपचारपद्धतीत रुग्णांना आपण त्यांचे सिम्स ओळखायला शिकवतो. तसंच डिम्सकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन आत्मसात करायला मदत करतो त्यामुळे साहजिकच त्यांच्या मेंदुमध्ये उत्पन्न होणार्‍या वेदनांवर परिणाम होतो. सुरक्षिततेचे पुरावे म्हणजेच सेफ्टी इन मी (SIM) सिम म्हणजे अशा कृती, विचार, लोक, सभोवताली जे एकंदरीत सुरक्षितता आणि चांगल्या आरोग्याची भावना निर्माण करतात. लोक याला त्यांच्याही नकळत कमी झालेल्या वेदनेशी जोडतात.

संभाव्य धोक्याचे पुरावे म्हणजेच डेंजर इन मी (DIM)

डिम म्हणजे अशा कृती, विचार, लोक, सभोवताली जे एकंदरीत धोक्याची आणि बिघडलेल्या आरोग्याची भावना निर्माण करतात, लोक याला त्यांच्याही नकळत वाढलेल्या वेदनेशी जोडतात. जेव्हा आपल्या शरीराशी संबंधित धोक्याचा विश्वासार्ह पुरावा (डेंजर इन मी) आपल्या शरीराशी संबंधित सुरक्षिततेच्या विश्वासार्ह पुराव्यापेक्षा (सेफ्टी इन मी) जास्त असेल तेव्हा आपल्याला वेदना जाणवू शकतात. सुरक्षेचा विश्वासार्ह पुरावा धोक्याच्या विश्वसनीय पुराव्यापेक्षा जास्त असेल तेव्हा आल्यालाला त्रास होणार नाही.

सिम्स आणि डिम्स हे व्यक्तीगणिक वेगवेगळे असतात, एका व्यक्तीसाठी असणारं सिम हे दुसर्‍या व्यक्तीसाठी डिम असू शकतं. खाली दिलेली उदाहरणं ही कंबरदुखीच्या (लो बॅक पेन) रुग्णांना देण्यात आली. यासारख्याच गोष्टी, कंबरदुखीची सारखीच वेदना असलेल्या लोकांनी वेगवेगळ्या वर्गीकृत केल्या. त्यांनी या गोष्टी दोनपैकी कुठे आणि का वर्गीकृत केल्या हे बघू या.

सेफ्टी ईन मी वाटण्याची कारणे

१. जमिनीवर ठेवलेले जड वजन उचलणे.
२. नियमित व्यायाम, त्यामुळे वाढलेली कोर मसल स्ट्रेन्थ.
३. वजन उचलण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण माहिती असणे.
४. कंबरदुखीकडे बघण्याचा निकोप आणि वास्तविक दृष्टिकोन.
५. फिजिओथेरपिस्टने कंबरदुखीबद्दल दिलेली अचूक माहिती.

डेंजर ईन मी वाटण्याची कारणे

१. व्यायामाचा अभाव, मसल स्ट्रेन्थ आणि एण्ड्युरन्सची कमतरता.
२. वजन उचलण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण माहिती नसणे.
३. कंबरदुखीकडे बघण्याचा निराशावादी दृष्टिकोन (निगेटिव्ह पेन बिलीफ).
४. फिजिओथेरपिस्टने कंबरदुखीबद्दल न दिलेली माहिती.
५. खाली वाकण्याबद्दल इतरांनी किंवा डॉक्टरने घातलेली अवास्तव भीती (कायनेसिओफोबिया).

कामाची जागा आणि तिथले लोक (वर्क प्लेस/वर्क डेस्क)

सेफ्टी ईन मी वाटण्याची कारणे

१. दर एक तासाने उठून उभे राहणे, बैठ्या जागी सोपे व्यायाम आणि स्ट्रेचेस.
२. आवडीचे काम.
३. कामाच्या ठिकाणी खेळीमेळीचं वातावरण, समजूतदार आणि प्रोत्साहन देणारे वरिष्ठ.
४. कामाच्या पटीत मिळणारा पगार, सुलभपणे गरज असताना मिळणारी आजारपणाची सुट्टी.
५. या सगळ्यामुळे माझा आत्मविश्वास वाढतो, माझ्या वेदनेसहितसुद्धा मी काम करू शकतो.

डेंजर ईन मी वाटण्याची कारणे

१. खूप खूप तास सलग एका जागी बसून काम करणे (किंवा करावे लागणे).
२. बैठ्या जागी सोपे व्यायाम आणि स्ट्रेचेस न करणे.
३. आवडीचे नसलेले केवळ अर्थार्जनासाठी केले जाणारे काम.
४. कामाच्या ठिकाणी सततचे तणावपूर्ण वातावरण (अवास्तव डेडलाइन्स).
५. वर्चस्व गाजवणारे, केलेल्या कामाचे श्रेय न देणारे वरिष्ठ.
६. सुलभपणे न मिळणारी आजारपणाची सुट्टी (कंबरदुखी हे काम न करण्यासाठी सांगितलेलं कारण आहे, असे समजणारे सहकारी आणि वरिष्ठ).
७. या सगळ्यामुळे वाढणारी वेदना, त्यामुळे ऑफिस हे माझ्यासाठी नक्कीच डिम आहे.

तुमच्या आवडत्या मित्रासोबत किंवा मैत्रिणीसोबत गप्पा मारणे

सेफ्टी ईन मी वाटण्याची कारणे

१. माझ्या जवळच्या मित्राशी बोलून मला बरं वाटते.
२. कंबरदुखीचा त्रास कधी आणि कसा सुरू झाला हे मला त्याला सांगता येईल.
३. तो मला कदाचित अजून काही उपाय सुचवील, माझी वेदना जाणवून देईल.
४. त्याच्याशी बोलताना मला माझ्या वेदनेचा विसर पडेल, माझ्या मित्राला माझी मनापासून काळजी वाटते, त्याला भेटले की मला छान वाटते.

डेंजर ईन मी वाटण्याची कारणे

१. मला तर मुळात जवळचा मित्रच नाही, याचे मला वाईट वाटते.
२. माझा मित्र माझी कंबरदुखीची वेदना समजून घेणार नाही, माझी वेदना त्याला कळणारच नाही.
३. तो स्वतः अत्यंत फिट असल्यामुळे माझ्यावर हसेल, मला लोकांशी बोलायला तसेही आवडत नाही.

वरील उदाहरणे ही सभोवतालच्या वस्तू, जागा आणि माणसे यावर बेतलेली आहेत, यातून हे सिद्ध होते की वेदना संदर्भावर आणि आपला त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर अवलंबून आहे. डिम वर्गवारीतील कारणे ही स्वतःचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून, जीवनशैलीत बदल करून, फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करून सहज सिम्समध्ये बदलू शकतात.