जीवनसत्त्व ड, जीवनसत्त्व ब-१२ व लोहाची कमतरता प्रत्येक फ्ल्यूच्या हंगामात तुम्हाला संसर्गाचा धोका निर्माण करीत असतील, तर तुम्ही नक्कीच मूलभूत जीवनसत्त्वाच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करीत असणार. तर जीवनसत्त्व ड, जीवनसत्त्व ब-१२ हे दीर्घकालीन प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वपूर्ण असतात. शरीराला आवश्यक महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि त्यांच्या कमतरतेमुळे उदभवणाऱ्या काही समस्या याबाबत डॉ. रोमेल टिकू, मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, साकेत यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे; ती जाणून घेऊ.
डॉक्टरांनी सांगितले आहे की, आता पुन्हा फ्ल्यूचा हंगाम सुरू झाला असून, आमची ओपीडी पूर्णपणे विषाणूजन्य संसर्ग झालेल्या रुग्णांनी भरली आहे. त्यामध्ये डेंग्यू, H3N2 व COVID-19 अशा रुग्णांचा समावेश आहे. तसेच काही रुग्णांना प्रत्येक ऋतूमध्ये कोणत्या ना कोणत्या विषाणूचा संसर्ग होतो. तर, काहींची प्रतिकारशक्ती चांगली नसल्यामुळे ते एखाद्या रुग्णाच्या संपर्कात येताच आजारी पडतात. ते म्हणाले, आपल्याला माहिती आहे की, लहान मुलं, वृद्ध, गर्भवती महिला, रुग्णालयातील कर्मचारी आणि गर्दीच्या ठिकाणी काम करणारे लोक, जिथे विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते असे लोक सतत आजारी पडतात. कोविड-१९ नंतर अनेक प्रकारचे विकार विकसित झाले आहेत. तर ज्यांना संसर्गाची लगेच लागण होते अशा लोकांना खराब झालेली फुप्फुसं आणि आपल्या सभोवतालच्या हवेतील प्रदूषणामुळे आजारातून बरे होण्यासाठी जास्त वेळ लागतो; ज्यामुळे शरीर हळूहळू कमकुवत होते. पण, या सगळ्यात आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो ते म्हणजे आपल्या मूलभूत जीवनसत्त्वाच्या कमतरतेची काळजी न घेणं. आपण निदान रक्ततपासणीचा अहवाल येईपर्यंत तरी आवश्यक ते योग्य जीवनसत्त्व घेणं महत्त्वाचं आहे. दीर्घकालीन प्रतिकारशक्तीसाठी तुम्हाला महत्त्वाची जीवनसत्त्वं ब-१२, ड व लोह आवश्यक आहे.
हेही वाचा- महिलांनो ‘ती’ जागा स्वच्छ ठेवण्यासाठी व्हजायनल वॉशची गरज आहे का? डॉक्टरांनी सांगितले सत्य
जेव्हा तुम्ही संतुलित आहार घेत नाही तेव्हा या जीवनसत्त्वाची कमतरता कोणत्याही वयात आणि कोणालाही उदभवते. जीवनसत्त्व ब-१२ तुमच्या शरीराला डीएनए बनवण्यास मदत करते. तुमचे शरीर स्वतःचं जीवनसत्त्व ब-१२ बनवू शकत नसल्यामुळे तुम्हाला त्यात भरपूर अन्नस्रोत जसे की, मांस, दुग्धजन्य पदार्थ व अंडी यांवर अवलंबून राहणे आवश्यक आहे. प्रौढांना दिवसाला २.४ मायक्रोग्रॅम (mcg) जीवनसत्त्व ब-१२ ची गरज असते आणि आजारातून बरे होणारे लोक, वाढणारी मुले किंवा गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांना यांना तर त्याची जास्त गरज असते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात जीवनसत्त्व ब-१२ असते. तुमच्या आहारात यासाठी दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे; तसेच पूरक आहार घेणंही आवश्यक आहे.
तर काही रुग्ण तक्रार करतात की, जोपर्यंत पूरक आहार चालू असतो तोपर्यंत सर्व काही ठीक असतं; परंतु कोर्स पूर्ण होताच जीवनसत्त्वाची कमतरता पुन्हा जाणवू लागते. या प्रकारची कमतरता अशा लोकांमध्ये आढळते; ज्यांना शोषणाची समस्या असते. आपल्या पचनसंस्थेमध्ये पॅरिएटल पेशी असतात; ज्या जीवनसत्त्वं शोषून घेतात. जेव्हा तुमच्या शरीरात या पेशींविरुद्ध अँटीबॉडीज असतात आणि त्यांना नुकसान होते, तेव्हा तुमच्या शरीरात या जीवनसत्त्वाची कमतरता येऊ शकते. ब-१२ च्या कमी पातळीमुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते; ज्याला घातक ॲनिमिया म्हणतात. ज्या लोकांनी गॅस्ट्रिक बायपास (वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया) केली आहे, त्यांना जीवनसत्त्व ब-१२ शोषण्यास त्रास होतो. बर्याच लोकांना हे माहीत नसते की, ते या परिस्थितींसह जगत आहेत किंवा त्यांना नियमित अंतराने जीवनसत्त्व ब-१२ पूरक आहाराची आवश्यकता आहे.
काही लोकांमध्ये जीवनसत्त्व डची कमतरता का असते?
लोक नैसर्गिकरीत्या जीवनसत्त्व डला कॅल्शियम शोषण्यास सक्षम बनवतात; जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि हृदयाच्या पंपिंगसाठी आवश्यक असते. तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यातही त्याचा महत्त्वाचा वाटा आहे. जीवनसत्त्व ड मिळवण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे त्वचा. तुम्ही सकाळी १५ ते २० मिनिटं त्वचेवर घेतलेलं ऊन पुरेसं ड जीवनसत्त्व मिळवून देऊ शकते. परंतु, काही लोकांमध्ये या जीवनसत्त्वाची कमतरता पुन्हा उदभवण्याची इतर कारणंदेखील आहेत; ज्यामध्ये पुरेसा आणि योग्य आहार न घेण्यामुळेही कमतरता जाणवू शकते. त्याव्यतिरिक्त काही आरोग्य स्थितींमध्ये तुमचे यकृत किंवा मूत्रपिंड शरीरात जीवनसत्त्व डचे सक्रिय स्वरूपात रूपांतर करू शकत नाहीत; जे लोक जीवनसत्त्व डच्या पातळीवर परिणाम करणारी औषधं घेतात. त्यामध्ये काही कोलेस्ट्रॉल, एंटी-सीजर, स्टिरॉइड्स व वजन कमी करण्याच्या औषधांचा समावेश आहे. अशा लोकांना पूरक आहाराची आवश्यकता असते.
जीवनसत्त्व ड विषाणूविरोधी प्रतिक्रिया निर्माण करणार्या रोगप्रतिकारक पेशींच्या क्रियाकलापांचे नियमन करून संक्रमणाशी लढण्यास मदत करते. हे रोगप्रतिकारक पेशी किंवा नैसर्गिक किलर पेशींवरील रिसेप्टर्सशी बांधले जाते आणि त्यांना अँटीव्हायरल गुणधर्मांसह पेप्टाइड्स तयार करण्यासाठी मदत करते; जे शरीराचे रोगजनकांपासून संरक्षण करण्यास मदत करते. अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, जीवनसत्त्व ड या पेशींना सक्रिय करण्यात, त्यांना संसर्गाशी लढण्यास मदत करते.