Lifting Heavy Objects Tips In Marathi : आपण सर्वांनी ‘आपला पाठीचा उपयोग न करता पायांच्या जोरावर वजन उचलावे’ हे वाक्य अनेकदा ऐकलं असेल, पण आपल्यापैकी किती जण या सल्ल्याचे पालन करतात? कोणीच नाही… तर एखादी जड वस्तू उचलण्याची प्रॉपर टेक्निक केवळ जिमच्या उत्साही लोकांसाठी नाही; तर जड बॉक्स उचलणे, फर्निचर हलवणे, किराणा सामान घेऊन जाताना सुद्धा या टिप्सची गरज भासू शकते. तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने डॉक्टरांशी चर्चा केली.

एमबीबीएस, एमडी, जनरल मेडिसिनच्या डॉक्टर पल्लेटी शिवा कार्तिक रेड्डी म्हणाल्या की, एखादी वस्तू योग्य प्रकारे उचलण्याचे तंत्र समजून, मुख्य स्नायूंना बळकट करून सावधगिरी बाळगल्यास तुम्ही कोणत्याही शारीरिक स्थितीत असलात तरीही जड वस्तू सुरक्षितपणे उचलू शकता आणि इजा होण्याचा धोका कमी करू शकता. मग तुमची शारीरिक स्थिती काहीही असो.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
yoga poses to relieve gas
Health Special: पोटातील गॅसवर योगासनांचा जालीम उपाय; नेमके काय कराल? – भाग २
What is the Leidenfrost effect
Leidenfrost Effect : जेवण बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरताय? मग नक्की जाणून घ्या ‘या’ हॅकबद्दल
Indian jugad To Stop Footwear Theft In The Temple Use This Unique Trick Desi Jugaad Video
VIDEO: मंदिरात किंवा गर्दीच्या ठिकाणी तुमचीही चप्पल चोरीला जाते का? मग हा जुगाड कराच, कधीच चप्पल चोरी होणार नाही
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…
Rohit Shetty Singham Again movie Circus of entertainment news
मनोरंजनाची सर्कस

वस्तू उचलताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ? (Lifting Heavy Objects Tips)

कंबरेतून वाकणे : यामुळे तुमच्या पाठीच्या खालच्या भागावर प्रचंड ताण येतो, ज्यामुळे संभाव्य दुखापत होऊ शकते. त्याऐवजी तुमची पाठ सरळ ठेवून तुमचे गुडघे आणि हिप्स वाकवा. तुमचे पाय एखादे सामान उचलण्याचे पॉवरहाऊस आहे असं समजा.

वस्तू उचलताना वळणे : एखादी वस्तू उचलताना तुम्ही वळलात की तुमच्या मणक्यावर ताण येतो, ज्यामुळे तो कमजोर होतो. पाठ वळण्याऐवजी, दिशा बदलण्यासाठी पाय वळवणे ट्राय करा.

सामान हातांनी उचलणे : जड वस्तू उचलताना पायांचा वापर करा, हातांचा नाही. एखादी वस्तू तुमच्या शरीराजवळ ठेवा, तुमच्या पायाचे स्नायू सामान उचलण्यासाठी वापरा, त्यामुळे तुमचा हात आणि पाठीवरचा ताण कमी होईल.

हेही वाचा…Nutrient Rich Fruits : कोणती फळं सर्वात जास्त पोषण देतात तुम्हाला माहिती आहे का? मग आहारतज्ज्ञांनी दिलेली ‘ही’ यादी वाचा

श्वास थांबून ठेवणे : जड वस्तू उचलताना तुमचा श्वास रोखून ठेवल्याने पोटाच्या आतील दाब वाढू शकतो आणि तुमच्या मणक्यावर अनावश्यक ताण येऊ शकतो, त्यामुळे नैसर्गिकरित्या श्वास घेत राहावे हे लक्षात ठेवा.

मर्यादेकडे दुर्लक्ष करणे : आपण हाताळू शकता त्यापेक्षा जास्त उचलण्याचा प्रयत्न करू नका. एखादी वस्तू खूप जड वाटत असल्यास, मदतीसाठी विचारा किंवा कार्टसारखे सामान उचलण्याचे साधन वापरा.

डॉक्टर रेड्डी सांगतात की, जड वस्तू उचलताना योग्य आसनात आपण असणे पाठीच्या हाडांचे संरक्षण करण्यासाठी आणि इजा टाळण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपल्या पाठीची हाडे न्यूट्रल स्थितीत वजन सहन करण्यासाठी बनली आहेत, पण वाकणे किंवा वळणे यामुळे डिस्क आणि लिगामेंट्सवर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे वेदना, ताण किंवा हर्नियेटेड डिस्क होऊ शकतात.’

जड वस्तू उचलण्याच्या योग्य आसनात कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत (Lifting Heavy Objects Tips)?

स्क्वॅटिंग : खाली असणारी वस्तू उचलण्यासाठी गुडघे आणि हिप्स वाकवा, पाठ सरळ आणि छाती स्ट्रेट ठेवा.

रुंद पाय : संतुलित आधार तयार करण्यासाठी पाय खांद्याच्या रुंदीच्या बाजूला ठेवा.

टाईट कोर : आपल्या पोटाच्या स्नायूंना कामाला लावा, जेणेकरून आपल्या पाठीला स्थिरता मिळेल आणि पाठीचे संरक्षण होईल.

शरीराच्या जवळ धरा : वस्तू तुमच्या शरीराजवळ धरा, कारण यामुळे तुमच्या पाठीवर आणि हातावरचा ताण कमी होतो.

पायांनी उचला : पायाच्या स्नायूंचा वापर करून वस्तू उचलण्यासाठी तुमचे पाय सरळ करा.

हेही वाचा…Leidenfrost Effect : जेवण बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरताय? मग नक्की जाणून घ्या ‘या’ हॅकबद्दल

जर तुम्हाला पाठीच्या किंवा सांध्याच्या समस्या असतील, तर डॉक्टर रेड्डी जड वस्तू उचलताना (Lifting Heavy Objects Tips) अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची शिफारस करतात…

डॉक्टरांचा सल्ला घ्या : जड वस्तू उचलण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरांशी बोला. ते तुम्हाला जड वस्तू उचलण्याच्या पद्धतींबद्दल सल्ला देऊ शकतात किंवा पर्यायांची शिफारस करू शकतात.

लिफ्टिंग एड्स वापरा : तुमच्या शरीरावरील ताण कमी करण्यासाठी गाड्या किंवा लिफ्टिंग स्ट्रॅप्ससारख्या साधनांचा वापर करा.

मदतीसाठी विचारा : जड वस्तू उचलताना मदत (Lifting Heavy Objects Tips) मागण्यास संकोच करू नका.