भारतीय वापरकर्त्यांवर लाईव्ह स्ट्रीमिंग apps झपाट्याने आपल्या कवेत घेत आहेत. आपल्या फॅन्सशी, फॉलोअर्सशी थेट कनेक्ट होता यावं यासाठी जरी ही ऍप्स तयार झाली असली आणि काही प्रमाणात या कारणासाठी वापरली जात असली तरीही लाईव्ह स्ट्रीमिंग ऍप्सवर मोठ्या प्रमाणावर लैंगिक कन्टेन्ट बघायला मिळतो आहे. यात तरुण मुलंमुली, काहीवेळा लहान वयाची मुलंमुलीही लैंगिक भावना चालवणाऱ्या हालचाली, हातवारे, हावभाव करताना दिसतात. कमी कपडे किंवा मुलांच्या बाबतीत शर्टलेस लाईव्ह स्ट्रीम्सचे प्रकार वाढताना दिसत आहेत. एकीकडे भारतात पॉर्न कन्टेन्ट निर्मित आणि प्रसारित करण्यावर कायद्याने बंदी आहे. तर दुसरीकडे लाईव्ह स्ट्रीमिंग ऍप्सवरुन फक्त सॉफ्ट पॉर्न कॉन्टेन्टच चालत असावा अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. यातल्या बऱ्याच ऍपना साइन इन ही करावे लागत नाही. डाउनलोड केल्याबरोबर वेगवेगळ्या लोकांच्या प्रायव्हेट रूम्स आणि लाईव्ह स्ट्रीम्स दिसायला लागतात. त्यात सहभागी होता येते.

आणखी वाचा: Mental Health Special: मुलांशी हिंसेबद्दल बोलणार का?

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Neelam Gorhe issued important warning to police and other departments regarding case of women abused by psychiatrists in Nagpur
नागपुरात मानसोपचार तज्ज्ञांकडून महिलांवर अत्याचार प्रकरण…आता थेट उपसभापतींनीच…
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Science and technology as a tool of power
तंत्रकारण : विज्ञान – तंत्रज्ञानातून सत्तेकडे…
how to use data science properly how to learn data science
कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात : डेटा सायन्स
zara dar pornhub video income
Zara Dar: PhD सोडून पॉर्नहब निवडलं; आता अभ्यासाचे व्हिडीओ टाकून कमावते अधिक पैसे; कोण आहे जारा डार?
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…

हा प्रकार फक्त भारतात आहे अशातला भाग नाही ‘ओन्ली फॅन पेज’ आता जगभर रुळाला आहे. तिथे टाकले जाणारे व्हिडीओ आणि फोटो हे फक्त फॅन्स पुरते मर्यादित असतात. फॅन पेज पेड असतं. त्यामुळे तिथले फोटो आणि व्हिडीओ बघायचे तर पैसे देऊन सदस्यत्व घ्यावं लागतं. या ओन्ली फॅन्स पेजवर न्यूड फोटोपासून स्ट्रिपिंग व्हिडिओपर्यंत अनेक गोष्टी सर्रास होतात. तोच प्रकार इथल्या चॅट रूम्समध्येही आहे. पर्सनल व्हिडिओ लाईव्ह चॅटिंगच्या सुविधाही आहेत. ज्यात स्ट्रीप शोपासून अनेक गोष्टी घडतात. गुगल प्लेवर बघितलं तर यातल्या काही अँप्स १८+ आहेत, तर काही ऍप्स १२+. पण येणारा व्यक्ती १८ + आहे का हे तपासण्याची कुठलीही व्यवस्था इथे नाही. जशी ती पॉर्न साईट्सवर ही नसते. तिथेही १८+ असाल तरच साईटवर जा असं म्हटलेलं असतं पण येणारा १८+ आहे का हे तपासण्याची सुविधा नसते. वन टू वन कॉलिंग, प्रायव्हेट चॅट रूम्स, लाईव्ह रूम्स, देशी परदेशी इन्फ्लुएन्सर्स, क्रिएटर्सपासून युजर्स पर्यंत सगळ्यांशी कनेक्ट होण्याच्या सोयी यात आहेत. सब्स्क्रिप्शन घेता येतं. मेंबरशिप घेता येते. हे ओन्ली फॅन्स पेज सारखंच आहे. सगळा अत्यंत उथळ लैंगिक कंटेण्टचा इथे धिंगाणा इथे सुरु आहे. बॉडी शो – डु यू वॉन्ट अ शो असे मेसेज फिरत असतात. आणि या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर टीनएज मुलंमुली ग्राहक म्हणून आणि क्रिएटर म्हणून असण्याची दाट शक्यता आहे. जे अतिशय धोकादायक आहे.

आणखी वाचा: पुरुष इतके हिंस्त्र का आहेत?

या प्लॅटफॉर्म्सवर लाईव्ह स्ट्रीमिंग व्हिडीओज करणाऱ्यांना केसेस, डोनट्स, लॉलीपॉप वगैरेंच्या माध्यमातून ग्राहक पैसे मोजतो. यात अगदी १०० रुपयापासून पाच-दहा हजार रुपयांपर्यंतची गिफ्ट्स क्रिएटर्सना पाठवण्याची सोय आहे. आणि या गिफ्ट्सच्या बदल्यात ग्राहकाच्या मागणीनुसार पुरवठा इथे केला जातो. काही कॉमेंट्स बघितल्या तर इथे किती गलिच्छ प्रकार सुरु आहे याचा अंदाज येतो. १००रु. काय मिळेल?, दोनशेत काय दाखवाल असल्या अतिशय फालतू कॉमेंट्स इथे सर्रास बघायला मिळतात. याच्या पुढे जाऊन लाईव्ह स्ट्रीममध्ये सहभागी झालेल्यांना ब्लॅक मेल करण्याचे, सेक्स्टर्शनचे प्रकारही इथे घडले आहेत.

आपल्या देशात पॉर्न निर्मिती आणि प्रसार यांना बंदी आहे पण लाईव्ह स्ट्रीमिंग ऍपवर सगळा नंगा नाच सुरु आहे. या प्लॅटफॉर्म्सवर येणाऱ्यांची मानसिकतेचा विचार केला तर नेहमीच्या पॉर्नपेक्षा हे अधिक रंजक वाटू शकण्याची शक्यता बरीच आहे. कारण गोष्टी लाईव्ह आहेत. कुणीतरी कुठेतरी रेकॉर्ड केलेला कन्टेन्ट बघणं आणि लाईव्ह कन्टेन्ट बघणं, त्यातही आपल्या मागणी प्रमाणे कन्टेन्ट मिळणं यातला फरक आणि त्यातून मिळणारी उत्तेजना अनेकांना हवीशी वाटत असावी. असे व्हिडीओ करणाऱ्यांच्या मानसिकतेचा विचार केला तर प्रत्यक्ष कुणाबरोबरही न झोपता, निव्वळ ‘सजेस्टिव्ह’ गोष्टी करुन त्यांच्यावर गिफ्टच्या माध्यमातून पैसे उधळणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे हा मामला सोयीचा असावा. मोठ्यांच्या जगाने काय करायचं हा ज्याचा त्याचा विषय आहे. पण इथे किशोरवयीन मुलंमुली, तरुणतरुणी क्रिएटर आणि ग्राहक म्हणून असणार असतील तर ती काळजीची बाब आहे. लाईव्ह स्ट्रीम ऍपची बाजारपेठ २०३० पर्यंत १.७ बिलियन डॉलर्सची असेल असा अंदाज वर्तवला जातोय. ऑनलाईन जगात अनेक चांगल्या गोष्टी आहेत तशाच मुलांसाठी ज्या धोकादायक गोष्टी आहेत त्यातला हा एक प्रकार आहे. कायद्याच्या चौकटीत याचे काय होईल ते कळेलच पण तोवर मुलामुलींना या ऍप्सच्या विळख्यातून सोडवायचं कसं याचा विचार करणं आवश्यक आहे.

लैंगिकतेबद्दलची उत्सुकता वेगळी, प्रयोग करून बघणं वेगळं आणि सतत चोवीसतास बारा महिने तुमच्या खिशात या गोष्टी उपलब्ध असणं वेगळं. या ‘पॉकेट पॉर्न’मुळे वाढीच्या वयातल्या मुलामुलींचं विविध स्तरीय नुकसान होऊ शकतं. सतत सेक्सबद्दलचा विचार करत राहणं इथपासून ते स्वतःच्या लैंगिकतेच्या जाणिवा, स्वतःच्या शरीराचा आणि दुसऱ्याच्या शरीराचा सन्मान, स्वीकार, परवानगी या अतिशय महत्वाच्या जाणिवा विकसित होण्यामध्ये येऊ शकणारे अडथळे काळजीत टाकणारे आहेत. तंत्रज्ञानाचा, माध्यमांचा, ऍप्सच्या जगाचा सुयोग्य आणि शहाणा वापर हे आपलं ध्येय असलं तरी हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही.

Story img Loader