Health Special “मी तिला सांगितलं, मी आहे तुझ्यासोबत. नको काळजी करुस म्हणून.” दीपाची आई तिच्यासोबत होती. “हो आई. तूच म्हणतेस ना -तुमच्या वेळी असं होतं अॅण्ड ऑल… आमच्यावेळी थोडं वेगळं आहेच. यावर दीपाच्या आईने बरं असं म्हणत काहीशा मत- सहमतीदर्शक डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. “मला असं वाटत पहिल्या गरोदरपणात आहार नीट असायलाच हवा आणि म्हणून मी भेटायचं ठरवलं”.
मी रिपोर्ट्स पहिले आणि काही आहारविषयक प्रश्न विचारले. “मला दिवसभर इतकं खाऊन रात्री झोपल्यावर मध्येच जाग येते.” “तरी ती दिवसभर नीट खातेय, सकाळपासून रात्रीपर्यंत!” दीपाची आई म्हणाली. दीपा गरोदरपणात १६ आठवडे गर्भार होती. “दररोज पालेभाज्या खाल्ल्या जातायत का? आणि डाळी , कडधान्ये?” “पालेभाज्या तिला आवडत नाहीत, म्हणून मी त्याचे डोसे , पराठे करून देते.” “उत्तम! सोबत दही वगैरे खातेस का?” “हो, कोशिंबीर किंवा दही नेहमीचंच”
हेही वाचा… तुमच्या आवडत्या चिप्समध्ये साखरेचे प्रमाण किती असते? ते कसे ओळखावे घ्या जाणून…
दीपाचा आहार दुरुस्त करताना गर्भवती स्त्रियांवर सातत्याने होणाऱ्या जेवणाच्या अतिपणाचा मला जणू परिपाठ मिळाला. सकाळपासून लाडू, सुकामेवा, तीन वेगेवेगळे पदार्थ, दोन वेळा उत्तम जेवण असं सगळं असूनही रात्री झोपेतून उठून काहीतरी खावंसं वाटणं, हे थेट आहारातील आवश्यक ऊर्जा आणि पोषणघटकांचं असंतुलन असण्याचं लक्षण होतं. तिच्या आहारात प्रत्येक जेवणातील डाळींचे प्रमाण, रोज एक अंड , रोज किमान तीन फळं असा बदल केल्यावर तिला तिसऱ्या दिवशीच उत्तम झोप तर मिळालीच पण कमजोरीही नाहिशी झाली.
वैवाहिक आयुष्याचा महत्वाचा टप्पा म्हणून गर्भारपणाकडे पाहिलं जातं. कुतूहल, काळजी आणि किमया अशा वेगेवेगळ्या पातळीवर गर्भारपणाच्या डोलाऱ्यावर स्त्रियांचं जगणं बदलत असतं, त्यानुसार आहारबदल आलेच!
बाळाची जबाबदारी निभावण्याआधी…
गर्भधारणा होण्याआधी तुमचं शरीर स्वस्थ आणि सक्षम ठेवण्यावर लक्ष द्या. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असेल तर योग्य तज्ज्ञांचा – डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपाययोजना करा. स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जाऊन गर्भधारणेपूर्वीच्या सर्व तपासण्या करून घ्या. तुमच्या शरीराच्या वजनामध्ये स्नायूंच वजन उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करा. तुमचे चरबीयुक्त वजन जास्त असेल तर ते कमी होणं आणि नियंत्रणात आणणं महत्वाचं आहे .
स्वस्थ शरीरच, स्वस्थ बाळाचं पोषण करू शकतं. त्यासाठी नियमित व्यायाम करा. रक्त तपासण्या करताना शरीरातील संप्रेरके, जीवनसत्त्वे यांची नेमकी मात्रा जाणून घ्या. लोहाची कमतरता अनेक स्त्रियांमध्ये सर्रास आढळून येते. शरीरातील लोहाचे प्रमाण योग्य मात्रेत राखणे गर्भधारणा होण्यापूर्वीदेखील तितकेच आवश्यक आहे. पोटाचे स्वास्थ्य उत्तम राखा.
गर्भधारणा आणि आहार
गर्भधारणा झाल्याचे कळताच घरात अर्थातच आनंदाच आणि उत्साहाचं वातावरण असतं. त्यानिमित्ताने सगळीकडून प्रथा म्हणून भरपूर गोड पदार्थांची रेलचेल सुरु होते. सुरुवातीच्या काही दिवसातच कर्बोदकांचे प्रमाण आहारात अनावश्यक वाढले तरी वजन अवाजवी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भारपणात आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेचं प्रमाण वाढलं तरी सुरुवातीचे काही दिवस साधारण १६००-१७०० इतक्या कॅलरीजचा आहार उत्तम असतो. यातसुद्धा सगळ्या पोषणघटकांचे संतुलन आवश्यक असते. विशेषतः प्रथिने, लोह, चांगले फॅट्स आणि चांगले कार्ब्स (कर्बोदके) यांचं योग्य प्रमाण नवमातेसाठी पोषक ठरू शकतं. पहिल्या तीन महिन्यात आहारनियमन करताना कोणत्याही अन्न पदार्थांचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्यावी. विनाकारण तुपाचे जेवण, मिल्कशेक, आईस्क्रीम, फळांचे रस यांचा मारा करू नये.
आईच्या आहाराचा थेट परिणाम गर्भाच्या वाढीवर होत असतो. अनेक स्त्रिया सुकामेवा पौष्टिक आहे म्हणून अवाजवी प्रमाणात खातात ज्याने गरोदरपणात अनावश्यक वजन वाढत. बाळाच्या वाढीसाठी स्निग्धांश आवश्यक असतात, पण ते दुधासोबत किंवा खीर म्हणून अतिरिक्त प्रमाणात आहारात समाविष्ट करू नयेत. ते मूठभर असतील तरी पुरेसे असतात.
प्रत्येक जेवणात पालेभाजी आणि दररोज किमान तीन फळे हे किमान पथ्य पाळलं जायलाच हवं. जसजशी गर्भाची वाढ होऊ लागते तसतसं नवमातेच कॅलरीजचं प्रमाण वाढवावं लागत. अशात अनेकांना भूक न लागणे किंवा जास्त जेवण न जाणे अशा तक्रारी होऊ शकतात. अशावेळी कमी अन्नपदार्थांमधून जास्तीचे पोषण मिळेल याची काळजी घ्यावी. साधारण चौथ्या महिन्यानंतर सुकामेव्याची पावडर किंवा दूध यासारखे पदार्थ आहारात समाविष्ट करू शकतो.
हेही वाचा… जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
मलावरोध कमी करायचा असेल तर आहारात तंतुमय पदार्थ असणे आवश्यक आहे. त्यासाठी फळे, भाज्या, शिजवलेले सलाड यांचा आहारात समावेश करावा. मांसाहार करणाऱ्यांनी शक्यतो समुद्री मासे खाणे टाळावे. अनेकदा मासे खाताना माशांमधील मर्क्युरीचे प्रमाण गर्भाच्या वाढीसाठी घातक ठरू शकते. चहा, कॉफी पिणे शक्यतो टाळावे. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील जीवनसत्त्वांचे विशेषतः लोहाचे प्रमाण कमी होऊ शकते. अतिरिक्त कॉफीमुळे बाळाच्या वजनावर थेट परिणाम होतो.
फळे शक्यतो स्वच्छ धुवूनच खावीत. खूप वेळ कापूननंतर ती काळसर पडतात, अशी फळे खाऊ नयेत. कोणत्याही भाज्यांचा कच्चा रस पिणे टाळावे. भाज्या स्वच्छ धुवून, चिरून / साफ करून आणि शिजवूनच खाव्यात. भाज्या तयार करताना त्यात साखर/ साय/ लोणी टाकू नये. ताक, दही, पनीर , दूध यापैकी कोणतेही दुग्धजन्य पदार्थ वेगेवेगळ्या वेळी खावेत. (दही किंवा पनीर जेवणासोबत/ ताक मधल्या वेळात / दूध झोपताना इ.) कोणत्याही प्रकारचे अन्न हे शक्यतो शिजवलेल्या स्वरूपात आणि ताजे तयार केलेले असेल तर गरोदर स्त्रियांसाठी ते उत्तम असते.
१९९१ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रा. दंडवते यांचा पराभव झाला आणि राजापूर मतदारसंघातील समाजवादी पक्षाची मक्तेदारी संपुष्टात आली. १९९६च्या लोकसभा निवडणुकीपासून इथे शिवसेनेने आपली पकड बसवली.