Health Special : टीव्ही, वर्तमानपत्रे किंवा इतर ठिकाणी अँटासिडचा प्रचार केला जातो. दोन चमचे घेतल्याने अ‍ॅसिडिटी दूर पळते असा प्रचार केला जातो. अन्टासिडचे सिरप व गोळ्या- ही औषधे पोटाच्या म्हणजे जठराच्या अंतःत्वचेवर पसरतात व अ‍ॅसिडिटी होणारा पोटाचा दाह (जळजळ) कमी करतात. परंतु याचा परिणाम तात्पुरता असतो.

गेल्या काही दशकात अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी परिणामकारक गोळ्या/ इंजेक्शन्स उपलब्ध आहेत. या गोळ्या पोटात अ‍ॅसिड तयार होण्याची क्रिया कमी करतात. त्यामुळे अ‍ॅसिडिटीला आराम पडतो. (Ranitidine, Omeprazole, Rabeprazole) इत्यादी. यातील काही औषध महाग असतात. एकदा आराम पडल्यानंतर ही औषधे ४-६ आठवड्यानंतर बंद करावीत. बरेच जण ही औषधे दुकानातून घेऊन स्वतःच अयोग्य वेळी व मधून मधून घेतात. त्यामुळे अ‍ॅसिडिटीचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. काही व्यक्तींना ही औषधे जास्त काळ घ्यावी लागतात. परंतु जास्त काळ ही औषधे घेतल्याने शरीरावर वाईट परिणाम होतात. भूक कमी होते, इन्फेक्शन्स होतात. तसेच काही प्रकारच्या गाठीही होण्याची शक्यता असते. म्हणूनच ह्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात.

Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

हेही वाचा… खरचं तुम्ही एका आठवड्यात एक किलो वजन कमी करू शकता का? काय सांगतात तज्ज्ञ

मानसिक ताण कमी करणारी औषधे – ताणतणाव हे अ‍ॅसिडिटी होण्याचे कारण असेल तर ही औषधे वापरल्याने अ‍ॅसिडिटीचे प्रमाण कमी होते.

इतर उपाय

१) स्वतःच्या जीवन पध्दतीत बदल करणे- अति आंबट, तिखट, तळलेले पदार्थ खाणे टाळावे.
२) योग्य वेळी योग्य जेवण घ्यावे.
३) योग्य म्हणजे पुरेशी व शांत झोप घ्यावी.
४) रात्रपाळीचे काम शक्य झाल्यास टाळावे.
५) उपाशी राहू नये.
६) कुठलेही वेदनाशामक औषध फार काळ घेऊ नये.
७) मानसिक ताणापासून स्वतः रिलॅक्स कसे होता येईल ते पहावे. (ध्यानधारणा करुन हे शक्य
आहे.)

अ‍ॅसिडिटीमुळे जठरात व आतडयातील पहिल्या भागात अल्सर होण्याची शक्यता असते. हल्ली औषधांमुळे हे आजार बहुतांश बरे होतात. ज्या रुग्णांना रक्ताची उलटी किंवा अन्न अडकते त्यांनाच शस्त्रक्रियेची गरज पडते.

हेही वाचा… पदार्थांची चव वाढवणारा चटपटीत सॉस, केचअपमध्ये किती असते साखर ? मग कशाची करावी निवड? तज्ज्ञांनी केला खुलासा

अ‍ॅसिडिटी होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल?

१. तिखट, तळलेले पदार्थ खाण्याचे टाळावे.
२. कडक उपवास करु नये. फळ, फळांचे रस, दूध इ. घेत रहावे.
३. जागरण करु नये.
४. मद्यपान, धुम्रपान करु नये.
५. ब्रुफेन सारख्या वेदनाशामक गोळ्या घेणे बंद करावे.
६. ताणतणावाला धैर्याने तोंड द्यावे, काळजी करत बसू नये.
७. जेवण वेळेवर घ्यावे व सात्विक असावे. सात्विक म्हणजे वरण, तूप, भात, पोळी-भाजी,
दही, कोशिंबीर आदींनी युक्त असावे.
८. लहानपणी आई सांगत असे की, एक घास बत्तीस वेळा चावून खावा, सावकाश जेवा. आईच्या सांगण्यामध्ये जरी जिव्हाळा व प्रेम असले, तरी त्या मागे शास्त्रीय उपयुक्तताही आढळते. जास्त वेळा घास चावल्याने तो मऊ होतो. त्यामुळे जठरावरचा ताण कमी होतो. तसेच घासामध्ये लाळ मिसळते. लाळ ही alkaline (आम्ल्पित्त प्रतिकारक)
असते व त्यामुळे अॅसिडिटी कमी होते.
९. दर १२ दिवसांनी लागोपाठ तीन दिवस योगातील जलधौती ही शुध्दिक्रिया करावी.
१०. दूध प्यायल्याने अ‍ॅसिडिटी तात्पुरती कमी होते परंतु दोन तासांनी पुन्हा वाढते म्हणून दूध टाळावे. सर्वसाधारण समजापेक्षा हे वेगळे आहे, पण शास्त्रीय आधाराप्रमाणे दुधाचा परिणाम हा काही काळच असतो. आणि तो कमी झाल्यावर अ‍ॅसिडिटी उफाळून जास्त प्रमाणात येते.
११. आयुर्वेदात व निसर्ग उपचारपद्धती मध्ये अ‍ॅसिडिटीसाठी बरेच उपाय सांगितले आहेत. केळी व बदाम हे अ‍ॅसिडिटीचे प्रतिबंधक आहेत. अननसाचा रस, आवळा रस , आमलकी पावडर हे सुद्धा आम्ल्पित्तावर उपयुक्त आहेत. तुळशीची पाने, बडीशेप व दालचिनी ह्या मुळे जठरातील आवरणावर mucous पदार्थांचा एक थर निर्माण होतो त्यामुळे अॅसिडिटी पासून जठराचे संरक्षण होते व त्रास कमी होतो.

Story img Loader