‘लव्ह बाईट’ किंवा ‘हिकी’ हा शब्द तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये किंवा तरुण पिढीकडून ऐकला असेल.. लव्ह बाईट म्हणजे चुंबन घेतल्यानंतर किंवा त्वचेवर, विशेषत: मानेवर किंवा हातावर डाग दिसतो. लव्ह बाईटला “हिकी” असेही म्हटले जाते. दरम्यान, मेक्सिकोमधील एका प्रकरणात १७ वर्षीय मुलाचा स्ट्रोकमुळे मृत्यू झाला. निमित्त ठरले मैत्रिणीने दिलेला ‘लव्ह बाईट.’ हे ऐकल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, लव्ह बाईटमुळे खरंच कोणाचा मृत्यू होऊ शकतो का? चला तर मग याबाबत तज्ज्ञ काय सांगतात जाणून घेऊ या.

रोमँटिक नातेसंबंधांमध्ये, लव्ह बाईटला सहसा स्नेह, उत्कटता आणि घनिष्ठतेचे लक्षण मानले जाते. पण, लव्ह बाईटकडे लोकांचे लक्ष गेले (विशेषत: सार्वजनिक ठिकाणी वावरताना) तर एखाद्यासाठी ते लाजिरवाणे किंवा अस्वस्थ करणारेदेखील असू शकते.

two brothers and friend died drowning after their car fell into a well in Butibori
धक्कादायक! कार शिकत असताना विहिरीत पडली ,दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
coastal road girl death loksatta
मुंबई : ‘कोस्टल रोड’ अपघातात तरुणीचा मृत्यू
Rangava dies in accident in Sangamner news
संगमनेर मध्ये प्रथमच आढळला रानगवा, मात्र अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा दुर्दैवी मृत्यू !
What is 'Johatsu'
Johatsu: एका रात्रीत माणसं गडप; जपानमधील थरकाप उडवणारा ‘जोहत्सू’ हा प्रकार नेमका आहे तरी काय?
brain dementia signs
तुमच्या चालण्यातील ‘ही’ चार लक्षणं डिमेंशियाची सुरुवात असू शकतात? तज्ज्ञ काय सांगतात…
This young girl burns cloth on gas to Shoot reels Video netizens warned her that you would have died
“अगं रिलच्या नादात मेली असती!”, नेटकरी स्पष्टच बोलले; गॅसवर ओढणी जाळून…पाहा Viral Video
Biker dies in car collision in Deccan Gymkhana area Pune news
डेक्कन जिमखाना भागात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

“हिकीमुळे स्ट्रोक होणे अत्यंत दुर्मीळ आहे, परंतु वैद्यकीय साहित्यामध्ये काही प्रकरणे नोंदवली गेली आहेत,” असे बंगळुरूच्या एस्टर आर व्ही हॉस्पिटल, लीड कन्सल्टंट (इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी), डॉ. एस. व्यंकटेश यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना स्पष्ट केले.

त्यामुळे लव्ह बाईट किंवा हिकीमुळे तुम्हाला स्ट्रोक कसा येऊ शकतो का? असे का घडते आणि तुम्ही असे प्राणघातक लव्ह बाईट कसा टाळू शकता ते समजून घ्या…

हेही वाचा – तुम्हीही खुशी कपूरप्रमाणे सलग ७-८ तास Binge-Watch करता का? तज्ज्ञांनी सांगितले ते का आहे धोकादायक?

लव्ह बाईट प्राणघातक असू शकतो का?

बंगळुरू येथील कावेरी हॉस्पिटल इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीचे एचओडी, डॉ. दीपक कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, “न्हावी (barber) किंवा कायरोप्रॅक्टर (chiropractor) यांच्याकडून मानेला मसाज करताना कॅरोटीड (carotid) किंवा मेंदू आणि मणक्याला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या खराब होऊ शकतात. कॅरोटीड धमन्या, मानेच्या प्रत्येक बाजूला एक असते आणि या धमन्या मेंदूसह डोक्याला रक्तपुरवठा करण्यासाठी जबाबदार असतात.

“कॅरोटीड धमनीला हानी पोहोचवणारी लव्ह बाईट अत्यंत असामान्य गोष्ट आहे. निरोगी कॅरोटीड धमनी (मानेतील एक प्रमुख रक्तवाहिनी) सामान्यतः मानेवर दाब दिल्यास प्रभावित होत नाही. पण, जर खूप जोरात दाब दिला दिला तर ते नुकसान पोहचू शकते,” असे डॉ. कृष्णमूर्ती सांगतात.

डॉ. व्यंकटेश म्हणाले की, “कॅरोटीड धमनीसारख्या संवेदनशील संरचनेला इजा होऊ नये म्हणून दाताने एखाद्याच्या गळ्यावर खूप जोरात चावू नये, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.”

हेही वाचा – गर्भधारणा आणि केस धुणे यांच्यात काही संबंध आहे का? तज्ज्ञ काय सांगतात….वाचा

“कॅरोटीड धमनी असलेल्या ठिकाणी मानेवर जोरात दाब दिल्यास किंवा लव्ह बाईट घेतल्यास कॅरोटीड धमनीच्या आतील भिंतीला तडा जाऊ शकतो, ज्याला वैद्यकीयदृष्ट्या कॅरोटीड धमनीचे विच्छेदन ( Carotid Artery Dissection) म्हणतात. अशा प्रकारचे विच्छेदन हे निडस (nidus) (अशी जागा जिथे जीवाणू, बुरशी, विषाणू, दुपटीने वाढू शकतात) तयार करते, जे रक्ताच्या गुठळ्या करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. रक्ताची गुठळी नंतर विखुरली जाऊ शकते आणि मेंदूच्या रक्ताभिसरणात प्रवेश करून स्ट्रोक होऊ शकतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader