तुम्हाला माहितीये का २५ ऑक्टोबरला जागतिक पास्ता दिवस साजरा केला जातो. पास्ता हा एक इटालियन पदार्थ आहे, जो अनेकांना खायला आवडतो. जिभेचे चोचले पुरवणारा हा चविष्ट पदार्थ आहे. ज्यांना स्वयंपाक करण्यात खूप वेळ घालवायला आवडत नाही, त्यांच्यासाठी झटपट तयार होणारा पास्ता हा चांगला पर्याय आहे. पास्ता कितीही चविष्ट आणि आवडीचा पदार्थ असला तरी आरोग्याच्या दृष्टीने त्याचे काही तोटेदेखील आहेत. कारण त्यात मैदा मोठ्या प्रमाणात वापरला जातो, जो आरोग्यासाठी हानिकारक असतो. पण, या समस्येवर आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा यांनी सोपा उपाय सुचवला आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेला माहिती देताना तुमचा आवडीचा पास्ता हेल्दी कसा होऊ शकतो हे त्यांनी सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पास्ता खाण्यापूर्वी या तीन गोष्टी लक्षात ठेवा”, असे कॅप्शन देत त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे ज्यात पास्त्यासाठी आवश्यक असलेली हेल्दी पेस्ट कशी तयार करायची हे सांगितले आहे.

तज्ज्ञांनी शिफारस केल्यानुसार एकावेळी फक्त दोन औंस (ounces) पास्त्याचे सेवन करावे, पण आपण नेहमी एका दिवसामध्ये जवळपास नऊ औंस पास्ता खातो, जी अत्यंत वाईट सवय आहे. त्यामुळे तुम्ही हेल्दी आणि चविष्ट पास्ता खात आहात याची खात्री करण्यासाठी त्यांनी तीन सोपे मार्ग सांगितले आहेत.

पास्त्यामध्ये भाज्यांचा भरपूर वापर करा.
जेव्हा तुम्ही पास्ता खाता, तेव्हा त्यासह सॅलेड मागवायला विसरू नका. यामध्ये ऑलिव्ह ऑईलसह शिजवलेल्या भाज्या आणि औषधी वनस्पती असाव्यात. औषधी वनस्पतींच्या सेवनामुळे तुम्हाला भूक लागणार नाही. बऱ्याचदा चांगल्या चवीमुळे आपण गरजेपेक्षा नेहमी जास्त खातो, त्यामुळे तुम्ही पास्ता खाताना तेवढ्याच प्रमाणात भाज्यांचा समावेश करा, जेणे करून त्यातील फायबर्स तुम्हाला मिळतील.

हेही वाचा – रात्रपाळीसाठी काम करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स कसा टाळू शकतात?

मैद्याऐवजी धान्य किंवा मिलेट्सचा पास्ता खा

मैद्याचा पास्ता खाण्याऐवजी धान्य किंवा मिलेट्सपासून तयार केलेला पास्ता खाणे हा एक हेल्दी पर्याय आहे, जो leaky gut syndrome (एक प्रकारच्या आतड्याचा रोग) टाळण्यास मदत करतो, जो मैद्याच्या सेवनामुळे होतो. मैद्यामध्ये पोषक तत्व नसतात आणि पचण्यास जड असते.

धान्य किंवा मिलेट्सपासून तयार केलेल्या पास्त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स आणि फायबर्स असतात. हे वजन कमी करण्यासाठी दोन महत्त्वाचे पोषक तत्व आहे. त्यामुळे मैदा-पास्ताऐवजी हा हेल्दी पर्याय म्हणून धान्य किंवा मिलेट्सचा पास्ता खा, ज्यामुळे तुमची पास्ता खाण्याची इच्छाही पूर्ण होईल आणि जास्त वजनही वाढणार नाही, असे डॉ. जांगडा यांनी सांगितले.

हेही वाचा – तुमच्या आहारात अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध पदार्थांचे सेवन कसे वाढवावे? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…

पिंक सॉस पास्ता खाऊ नका

“पिंक सॉस तयार करण्यासाठी पांढरा सॉस आणि लाल टोमॅटो सॉस एकत्र करू नका. पास्त्यासाठी तयार केला जाणारा लाल सॉस हा टोमॅटोपासून बनवला जातो, जो व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिडचा चांगला स्त्रोत आहे. तर पांढरा सॉस हा दुग्धजन्य पदार्थापासून तयार केला जातो, ज्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. जेव्हा दोन्ही अॅसिड एकत्र होतात तेव्हा चयापचय प्रक्रियेत न पचलेला पास्ता पोटात आणि आतड्यामध्ये साचून राहतो, ज्यामुळे त्यातून बाहेर पडणारे पोषकतत्व शरीराला शोषून घेता येत नाहीत. एकावेळी कोणत्याही एका सॉसमधील पास्त्याचे सेवन करा आणि त्याचा आनंद घ्या. जर तुम्ही इटालियन पदार्थ खात असाल तर जसे इटालियन लोक खातात तसेच खा. भरपूर प्रमाणात कोल्ड प्रेस्ड ऑलिव्ह ऑईल (केमिकल न वापरता, दबावाचा वापर करून तेल काढले जाते) वापरा, ज्यामुळे तुमच्या अन्ननलिकेतून पचलेले अन्न सहज पुढे ढकलेले जाते. ज्यामुळे न पचलेला पास्ता तुमच्या पोटात तासनतास साचून राहत नाही”, असे डॉ. जांगडा स्पष्ट करतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love pasta heres how you can make it healthier know what to do and what not snk
Show comments