Avoid this habits to fall asleep : उत्साहात काम करण्यासाठी चांगली झोप घेणे गरजेचे आहे. झोप शरीराला आणि मनाला आराम देते. मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यात ती मदत करते. मात्र, एव्हाना अनेकांना झोप न लागण्याची समस्या येत आहे. तुम्हालाही झोप लागत नसेल किंवा तुमची झोपमोड होत असेल तर याला झोपण्यापूर्वीच्या सवयी जबाबदार असू शकतात, असे पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लवनीत यांनी इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी काही सवयींचा उल्लेख केला आहे, ज्यांना टाळल्यास तुम्हाला चांगली झोप मिळू शकते. लवनीत यांनी रीलमध्ये दिलेल्या सवयी पुढील प्रमाणे आहेत.

(वाईट कोलेस्टेरॉल घटवू शकते ‘ही’ वनस्पती, जुलाबापासूनही मिळू शकते आराम, जाणून घ्या इतर लाभ)

१) झोपण्यापूर्वी फोनचा वापर

तरुणांपासून प्रोढांपर्यंत सर्वांमध्ये फोनचा वापर वाढला आहे. काही लोक झोपण्यापूर्वीही फोन वापरतात. लहान मुले मैदानी खेळ खेळण्याऐवजी मोबाईलवर दिसून येतात. स्मार्टफोनने सर्वांनाच भुरळ घातली आहे. अनेक लोक रात्री झोपण्यापूर्वी फोनवर नजर टाकतातच. ही सवय झोप न लागण्याचे कारण असू शकते. त्यामुळे, रात्री झोपण्यापूर्वी फोनचा वापर करण्याचे टाळा.

२) झोपण्यापूर्वी जड जेवण करणे

झोपायच्या आधी जास्त जेवण करणे हे झोप न येण्याचे कारण असू शकते. अधिक कॅलरी असलेले मोठे आहार पचण्यासाठी वेळ लागू शकते आणि अशात थेट झोपण्यासाठी गेल्यास तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. म्हणून रात्री उशिरा जेवण करू नये आणि झोपण्यापूर्वी जेवणाचे नियोजन करावे, असा सल्ला दिला जातो.

(त्वचेवर स्ट्रेच मार्क्स आहेत? करा हे ४ उपाय, फरक दिसेल)

३) कॅफीन आणि मद्यपान

मद्यपानाने तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकते किंवा तुम्हाला झोप येण्यास त्रास होऊ शकतो. याशिवाय झोपण्यापूर्वी कोणत्याही स्वरुपातील कॅफीन घेण्याचे टाळावे. चांगली झोप घेण्यासाठी तुम्ही कॅफीनचे सेवन टाळले पाहिजे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lovneet batra suggested to avoid this habits to fall asleep ssb
Show comments