Low back pain : दिवसभराच्या बैठ्या कामांनी अनेकदा आपली पाठ अवघडते. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम असल्याने बसून काम करण्याशिवाय पर्याय नसतो. सकाळी लवकर उठून-आवरून आपण जे कामाला सुरुवात करतो, ते संध्याकाळ आणि रात्र कधी होते तेही कळत नाही. रात्री आपण पाठ टेकतो तेव्हाच काय तो पाठीला आराम मिळतो. त्यात पाठदुखी ही कोणत्याही वयातील व्यक्तीसाठी समस्या बनू शकते. तुम्हालाही पाठीत हलके दुखणे सतत होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यावर वेळीच उपचार करा. एकाच आसनात बराच वेळ बसल्याने पाठदुखी होते. पण, जर ही समस्या तुम्हाला बराच काळ त्रास देत असेल तर थोडी काळजी घ्या. कारण- ही गंभीर आजाराची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर पाठदुखीची समस्या असेल, तर काही पदार्थांपासून तुम्ही दूर राहणे गरजेचे आहे.

हे पदार्थ नेमके कोणते ते जाणून घेऊ. फिटनेस व पोषण शास्त्रज्ञ आणि फूड दरझीचे सह-संस्थापक डॉ. सिद्धांत भार्गव यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. ज्यांना पाठदुखीची समस्या आहे त्यांनी साखर, साखरयुक्त सिरप, मका आणि तेल याचा आहारात समावेश करू नये. नैसर्गिक वा प्रक्रिया न केलेला मका हा आरोग्यदायी असला तरी प्रक्रियेदरम्यान त्यातील पोषक तत्त्वे निघून जातात आणि त्याचा आपल्या शरीरावर वेगळा परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या आहारात मक्याचा समावेश करीत असाल, तर तो प्रक्रिया केलेला नसावा. प्रक्रिया केलेला मका खाल्ल्यानं पाठीच्या खालच्या वेदना वाढू शकतात.

actress Bhagyashree shared recipe of unpeeled potato
‘मैने प्यार किया’फेम भाग्यश्री म्हणते, “न सोललेल्या बटाट्यांमुळे कमी होतो क्रॅम्प्सचा त्रास” खरंच हे शक्य आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”

डॉ. सिद्धांत भार्गव यांच्या मते, “प्रक्रिया केलेल्या मक्यामुळे इन्सुलिनच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ शकते आणि त्यामुळे जळजळ आणि वजन वाढू शकते. जास्त वजनामुळे मणक्यावर अतिरिक्त ताण पडतो आणि पाठीच्या खालच्या भागात दुखणे वाढते.” तसेच यामुळे जळजळ बरे होण्याची प्रक्रिया मंद होऊ शकते आणि पाठीच्या खालच्या भागात दुखण्यासारखी परिस्थिती वाढू शकते.

“मक्यामध्ये बी जीवनसत्त्व आणि खनिजे, तसेच फायबर असते; मध्यम प्रमाणात सेवन केल्यास एकूण आरोग्यासाठी हे घटक चांगले असू शकतात. संपूर्ण मक्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सदेखील असतात, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात.” डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दाहकविरोधी आहारामुळे पाठदुखी कमी होण्यास मदत होते. भरपूर फळे आणि भाज्या खाणे आवश्यक आहे. कारण- त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात.

हेही वाचा >> तुम्हालाही डायबिटीज आहे का? मग टेस्ट करताना कोणत्या बोटावर करायची? जाणून घ्या

“स्वयंपाक करताना हळद किंवा आले घातल्याने शक्तिशाली दाहकविरोधी फायदेदेखील मिळू शकतात. तसेच, भरपूर पाणी प्यायल्याने आपले शरीर हायड्रेट राहते आणि त्यामुळे स्नायूंमधील कडकपणा कमी होऊन संपूर्ण आरोग्याला चालना मिळते,” असे डॉ. भार्गव म्हणाले.