भारतीय महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा पहिल्या क्रमांकाचा कर्करोग आहे. ज्याचे समायोजित दर प्रति १००,००० महिलांमध्ये २५.८ आणि मृत्यू दर १००,००० महिलांमागे १२.७ इतका आहे. २०२०च्या अभ्यासानुसार, भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान होते. दरवर्षी सुमारे १,७८,००० नवीन प्रकरणांचे निदान होत असल्याने, स्तनाच्या कर्करोगाच्या घटनांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला मागे टाकून भारतीय महिलांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हल्ली स्तनामध्ये हाताला छोटीशी जरी गाठ लागली तरी साशंक मनाने घाबऱ्याघुबऱ्या होऊन येणाऱ्या स्त्रिया व मुलींचे प्रमाण हल्ली खूपच वाढले आहे. दुसऱ्या टोकाला लोकलाजेस्तव आपलं दुखणे लपवून गाठ खूपच मोठी झाल्यावर व दुखणं विकोपाला गेल्यावर येणाऱ्या पण काही ग्रामीण व अशिक्षित स्त्रिया आहेत. स्तनात येणाऱ्या सर्वच गाठी काही कॅन्सरच्या नसतात. काही तर अगदीच निरूपद्रवी असतात. तेव्हा स्तनातील गाठ ही साधी आहे की काही दुर्धर आजाराची आहे हे कसे जाणायचे हे आपण पाहूया.

सर्व प्रथम स्तनातील गाठी खालील दोन प्रकारामध्ये विभागता येतील- १) सर्वसाधारण गाठी 2) उपद्रवी , धोकादायक गाठी

तारूण्यात पदार्पण करण्यापूर्वी म्हणजे वयाच्या साधारण दहाव्या वर्षापासून मुलींच्या व काही मुलांच्या पण स्तनाच्या जागी छातीवर छोटीशी गाठ येते. मुलींमध्ये ही स्तनाच्या वाढीची सुरूवात असते. मुलामुलींच्या शरीरात असमतोल हार्मोन्समुळे ही गाठ येते जी नंतर म्हणजे वयाच्या १७-१८ व्या वर्षी आपोआप नाहीशी सुद्धा होऊ शकते. ही गाठ साधारणपणे प्रथम एकाच स्तनावर होते व त्यामुळे पालक काळजी करतात. या गाठीमध्ये जर दुखत असेल तर काही औषधे घेऊन हा त्रास कमी करता येतो. अन्यथा या प्रकाराला ओषधाची काही गरज नसते. मुलांमध्ये जर ही गाठ मोठी असेल (Gynaecomastia ) तर १८ वर्षानंतर त्यावर शस्त्रक्रिया करून ही गाठ काढावी लागते.

आणखी वाचा: आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असावे?

स्तनपान करणाऱ्या मातेच्या छातीतील गाठ
बाळाला दूध पाजताना अनेकदा स्तनांच्या अग्रांना भेगा पडतात. या भेगामध्ये जंतूसंसर्ग झाला की मातेच्या स्तनामध्ये गाठ तयार होते. ही गाठ प्रचंड ठणकणारी असते व या स्त्रिला त्यामुळे थंडी वाजून तापही येतो. बरेचदा नुसती औषधे देऊन ही गाठ बरी करता येते. औषधांनी गाठ बरी न झाल्यास व तिच्या आत पू साठल्यास एखाद्या सुईने छोटीशी चिर देऊन पू बाहेर काढला जातो व गाठीला आराम पडतो.

Fibroadenoma (फायब्रोअडीनोमा) साधारपणे १५ ते २५ या वयामध्ये अशा गाठी स्तनामध्ये आढळून येतात. ह्या गाठी तपासत असताना हाताच्या खालून इकडे तिकडे सरकतात. यांना “Mouse in breast” असे म्हणतात. या टणक (Hard) किंवा मऊ (Soft) असतात. मुलींच्या व तरुण स्त्रियांच्या स्तनामध्ये हाताला कडक परंतु कधी कधी स्तनामध्ये फिरणारी गाठ होऊ शकते . ह्याला fibroadenoma असे म्हणतात. या गाठी क्वचित मासिक पाळीच्या वेळी दुखतात. या गाठी मध्ये सहसा कॅन्सर होत नाही. या गाठी औषधाने विरघळत नाही, तर शस्त्रक्रिया करूनच त्या काढल्या जातात. ही गाठ मोठी झाल्यास ती एक छोट्या व साध्या शस्त्रक्रियेने काढता येते. याचा तिच्या पुढच्या आयुष्यावर/ मातृत्वावर काहीही परिणाम होत नाही.

Fibroadenosis (फाइब्रोडेनोसीस) बोटांनी तपासताना पूर्ण स्तनभर बारीक बारीक गुठळ्या लागतात पण सपाट पंजाने तपासला गेल्यावर हाताला काहीच लागत नाही. असा हा प्रकार वयाच्या २५-४५ या वयोगटात आढळतो. यामध्ये पाळीच्या आधी व सुरूवातीला दोन्ही स्तनात दुखुन आल्यासारखे होते किंवा वजन आल्यासारखे वाटते. शरीरात असमतोल हार्मोन्समुळे ही गाठ येते. हा प्रकार काही विशिष्ट औषधे देऊन बरा होतो. मध्यमवयीन किंवा रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.

मार लागल्याने बनलेल्या चरबीच्या गाठी- (Traumatic Fat Necrosis) हा प्रकार मोठे स्तन असलेल्या कष्टकरी महिलांमध्ये दिसून येतो. स्तनाला मुका मार लागल्याने- तिथे थोडासा रक्तस्त्राव होतो व एक दुखरी गाठ तयार होते. ही गाठ २-३ आठवड्यात औषध देऊन नाहीशी होते.

स्तनांचा कर्करोग भारतातच नव्हे तर जगात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. स्त्रियांमधील सर्व कॅन्सरमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण २५-३२ टक्के आहे. भारतात दार चार मिनिटाला एका स्त्रीला स्तनाचा कर्करोग झल्याचे निदान होते व दार २८-ते ३० स्त्रियांमध्ये एकीला स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. पाश्चिमात्य देशात स्तनाच्या कॅन्सरचे निदान झाल्यानंतर पाच वर्ष जगण्याचे प्रमाण ८९ टक्के आहे तर आपल्या देशात ते ६०-६५ टक्के या दरम्यान आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उशिरा निदान होणे. कर्करोगाच्या गाठी कडक व घट्ट असतात. व सुरवातीस त्याचा काहीच त्रास होत नाही. यामुळे बराचशा स्त्रिया हे दुखणे अंगावर काढतात व डॉक्टर/ सर्जन कडे उशिराने जातात. साधारणतः ५५-६४ या वयामध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त असते, पण या आधी व पलीकडेही कॅन्सर होऊ शकतो. तरुण वयामध्ये कॅन्सर हा जास्त आक्रमक स्वरूपाचा असू शकतो. स्तनाचा कॅन्सर असण्याची अनेक करणे असू शकतात.

आणखी वाचा: निरोगी आयुष्यासाठी मीठ किती खावे? किती खावू नये?

१) वाढते वय व कौटुंबिक – आई, मावशी, किंव्हा बहिणींना स्तनांचा कॅन्सर असेल तर त्या स्त्रीला कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते, २) वैयक्तिक आरोग्य – ज्या मुलींना मासिक पाळी लहान वयात सुरु होते, किंवा ज्यांना उशिरा मुले होतात. तसेच निपुत्रिक स्त्रिया किंवा ज्या काही कारणास्तव आपल्या मुलांना स्तनपान करू शकल्या नाहीत अशांना स्तनाचा कॅन्सर जास्त प्रमाणात होतो. ३) एका स्तनाला कॅन्सर झाला असेल तर दुसऱ्या स्तनाला कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. ४) आहारामध्ये मांसाहारी किंवा स्निग्धपदार्थांचे जास्त सेवन असल्यास, लठ्ठपणा तसेच रजोनिवृत्तीनंतर लठ्ठपणा येणे यामध्ये स्तनाचा कॅन्सर अधिक प्रमाणात होतो. धूम्रपान, ताणतणाव व मद्यपान हे जोखमीचे घटक आहेत. 5) अनुवांशिक घटक : – गेल्या काही वर्षात BRCA १ व २ ह्या चाचण्या पॉझिटीव्ह असल्यास कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते.

प्रत्येक स्त्रीने दर महिन्यातून एकदा तरी स्वत;च स्वतःच्या स्तनांची हाताने तपासणी करावी. यासाठी हाताच्या तळव्याचा उपयोग करावा. (Self examination of breast ). आरश्यासमोर उभे राहून/ आंघोळ करताना, स्तनांचा आकार, त्यावरील त्वचा, स्तनाग्र (nipple) याकडे लक्ष दिले पाहिजे. यात काही बदल आढळले तर ताबडतोब डॉक्टरी सल्ला घ्यावा. दरवर्षी डॉक्टरकडून पूर्ण तपासणी व आवश्यक असल्यास मॅमोग्राफी (Mammography) किंवा mammosonography करणे.

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे
१. स्तनामध्ये किंवा काखेमध्ये गाठ येणे व तिथे घट्ट वाटणे.
२. स्तनाचा किंवा स्तनाच्या भोवती त्वचा बदलणे / त्वचेचा रंग बदलणे. (खळगेपणा/ फुगीरपणा)
३. स्तनाग्रामध्ये नव्याने बदल होणे- आत जाणे किंवा लहान होणे
४. स्तनाग्रामधून लालसर स्त्राव जाणे.

कर्करोगाची शंका असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

कर्करोगाचे निदान हे सायटोलॉजी किंवा गाठीचा तुकडा (बायोप्सी) करून केले जाते. बायोप्सी व इतर तपास यावरून स्तनाच्या कर्करोगाची स्टेज म्हणजेच तो शरीरात किती पसरला आहे याचा अंदाज येतो. त्यानुसार उपचार केले जातात.

स्तनाच्या कर्करोगाच्या उपचार पद्धतीत गाठ व बाजूचा सर्व भाग काढणे, पूर्ण स्तन काढणे आणि इंप्लाट वापरून स्तन पुन्हा निर्माण करणे इत्यादी शस्त्रक्रिया केल्या जातात. या व्यतिरिक्त केमोथेरपी, रेडिएशन, हार्मोनल थेरपी व इम्म्युनोथेरॅपी यांचा वापर केला जातो.

शेवटी, प्रत्येक स्त्रीने जागरूक राहिले व स्वतः स्वतःच्या स्तनाची नियमितपणे तपासणी केली तर स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान होते. लवकर निदान झाल्यास त्या स्त्रिया पूर्णपणे बऱ्या होऊन नेहमीसारखे आयुष्य जगू शकतात. म्हणूनच स्तनातील कुठल्याही गाठीबद्दल डॉक्टरांचा सल्ला ताबडतोब घ्या व दिरंगाई करू नका.