बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या DIY हॅक्स आणि रेसिपी फॉलो करणे सोपे आहे. चमकदार त्वचेसाठी अभिनेत्रीने नुकतीच एक खास रेसिपी सांगितली आहे. “जर तुम्ही संध्याकाळी बाहेर जाण्याचा विचार करीत असाल आणि तुमची त्वचा कोरडी वाटत असेल, तर तुम्हाला फक्त काकडीचे काही तुकडे आणि कच्चं दूध हवं आहे,” असं अभिनेत्रीनं आपल्या यूट्यूब चॅनेलवर सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

DIY उपाय कसा करावा?

साहित्य :

  • काकडी
  • कच्चं दूध

कृती :

  • काकडीचे काही तुकडे दुधात भिजवून १० मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा.
  • काकडीचे तुकडे तुमच्या चेहऱ्यावर १५-२० मिनिटं ठेवा आणि नंतर थंड पाण्यानं चेहरा धुऊन घ्या.
  • या कृतीमुळे तुमच्या त्वचेला तजेला येईल.

हे काम करते का?

डॉ. रिंकी कपूर, कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट व डर्मेटो-सर्जन, द अ‍ॅस्थेटिक क्लिनिक्स यांचे म्हणणं आहे की, काकडीचे तुकडे चेहऱ्यावर लावणं हा एक ‘क्लासिक उपाय’ आहे.

हेही वाचा… चहा ठरेल पिंपल्स, केसगळती आणि काळे डाग घालवण्यासाठी सर्वोत्तम उपाय! कॉन्टेन्ट क्रिएटरच्या ‘या’ रेसिपीवर तज्ज्ञ म्हणाले…

“हा उपाय त्याच पद्धतीच्या अद्ययावततेचा भाग आहे; पण त्याचा परिणाम किंवा त्याचे फायदे फारसा परिणाम देत नाहीत. तरीही तो तुमच्या त्वचेला ताजेपणा देऊ शकतो,” असं डॉ. कपूर यांनी सांगितलं.

काय लक्षात ठेवावं?

“परंतु, दूध सर्वांच्या त्वचेला जमत नाही. कारण- त्यामुळे काही लोकांच्या त्वचेची जळजळ होऊ शकते आणि लालसरपणा व मुरमेदेखील येऊ शकतात”. “हा उपाय वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध झालेला नाही. तुमच्या त्वचेला चमक आणण्यात याची प्रभावीता सिद्ध करण्यासाठी अजून संशोधन केले जाणे आवश्यक आहे. हा उपाय तुम्हाला तात्पुरती चमक देऊ शकतो; मात्र निरोगी व तेजस्वी त्वचा मिळवFण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते,” असं डॉ. कपूर यांनी सांगितलं.

हेही वाचा… डोकेदुखी आणि चक्करचा त्रास कायमचा होईल कमी! फक्त काही मिनिटे करा मानेचा ‘हा’ मसाज, तज्ज्ञांनी सांगितले फायदे

तुम्ही निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी योग्य आहार घेणं, ७-८ तास चांगली झोप घेणं, तणाव कमी करणं, भरपूर पाणी पिणं व डॉक्टरांनी सांगितलेली योग्य स्किन केअर रुटीन पाळणं आवश्यक आहे. हे घरगुती उपाय आकर्षक वाटत असले तरी ते तुमच्या त्वचेचे अधिक नुकसान करू शकतात. “नवीन उपाय किंवा घरगुती उपायांचा वापर तुमच्या त्वचेवर करण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमचे डॉक्टर त्या उपायाचे फायदे आणि दुष्परिणाम समजावून सांगून, तुमच्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात तुम्हाला मदत करू शकतात,” असं डॉ. कपूर यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit shared glowing skincare hack for dull dry skin in winters know expert advice dvr