सध्याची बदलती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, यात आपण अनेक पारंपरिक आहार पद्धती विसरत चाललो आहोत. विशेषत: नव्या पिढीला पिझ्झा, बर्गरच्या जमान्यात हंगामी रानभाज्या, फळांविषयी कसलीच माहिती नाही. शिवाय पालकही मुलांना आपल्या जुन्या पारंपरिक आहार पद्धतींची माहिती देण्याचे प्रयत्न करत नाहीत. यामुळे आपण सध्या अनेक जीवघेण्या आजारांचे शिकार होत आहोत. यामुळे आता गांधींच्या निरोगी डाएट प्लॅनविषयी बोलले जात आहे. महात्मा गांधीजीचा डाएट प्लॅन निरोगी आरोग्याचे एक उत्तम उदाहरण होते, जे निसर्गाच्या प्रवाहाबरोबर चालणारे होते. गांधीजींच्या याच डाएट प्लॅनबाबत इंडियन एक्सप्रेसशी बोलताना आरोग्य तज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गांधीजींचा डाएट प्लॅन नेमका कसा होता?
थोडक्यात सांगायचे तर सूर्य डोक्यावर येण्याआधी उठणे, रात्री लवकर झोपणे आणि शरीराला गरजेचे आहे तेवढेच अन्न खाणे; हे गांधीजींच्या निरोगी आरोग्याचे रहस्य होते. यात नेहमीच शरीरासाठी आवश्यक तेवढेच साधे शाकाहारी जेवण जेवायचे. त्यांच्यासाठी खाणं हे शरीरासाठी आवश्यक कर्तव्य होत, ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होत होती.
या आहारात मुख्यत: भरपूर फळे, सुका मेवा, भाज्या, औषधी वनस्पती, पौष्टिक पदार्थ, साधे शिजवलेले अन्न (यातून अंतर्निहित पोषक घटक नष्ट होत नाहीत) आणि पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा समावेश होता. ते नेहमी हंगामी फळे, भाज्या खाण्याचा सल्ला देत होते. त्याचबरोबर शुद्ध तूप आणि गूळ यांचा समावेश करून त्यांनी गाय आणि शेळीच्या दुधाच्या वापराला प्रोत्साहन दिले.
गांधींच्या डाएट प्लॅनमध्ये शरीराला विश्रांती देण्यास आणि स्वतःला डिटॉक्स करण्यासाठी उपवासाचा सल्ला देण्यात आला आहे. म्हणून ते स्वत:हा सुद्धा एक दिवसाआड फळांचा रस आणि काही द्रव पदार्थांचा आहारात समावेश करायचे. त्यांच्या या डाएट प्लॅनवरून असे सांगितले जाते की, तुम्हाला शरीर हलके आणि तंदुरुस्त असल्याचे जाणवते, ज्यामुळे तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करू शकता. यामुळे शरीराची ऑटोफॅजीची प्रक्रिया सक्रिय राहते, तसेच विविध आजार टाळण्यास मदत होते.
गांधीजींच्या जीवनशैलीत शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे आणि शक्य तितके मोकळ्या हवेत चालणेदेखील समाविष्ट आहे. यासह प्राणायामाच्या मदतीने लयबद्ध श्वास घेणे, संध्याकाळी हलका व्यायाम करणे आणि कार्यक्रमात व्यस्त असताना थोडावेळ विश्रांती घेणे; या सर्व गोष्टींमुळे शरीराला एकप्रकारची शांतता मिळते. योग्य पद्धतीने श्वास घेणे, शक्य असेल तेव्हा मोकळ्या आकाशाखाली स्वच्छ जागेवर झोपणेदेखील फायदेशीर आहे.
गांधीजींचा डाएट प्लॅन फॉलो करण्यासाठी काही सोप्या टिप्स
गांधीजींच्या डाएट प्लॅनमध्ये फळे, भाज्या, कडधान्य, बाजरी, शेंगा, औषधी वनस्पती आणि मसाले यावर भर दिला जातो. पण, आपणही आपल्या दैनंदिन जीवनात त्यांच्या डाएट प्लॅनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करू शकतो, तो कसा जाणून घेऊ…
१) दिवसाची सुरुवात पुरेसे कोमट पाणी पिऊन करा. हे वॅसोडिलेटर म्हणून कार्य करते, याचा अर्थ ते रक्तवाहिन्या विस्तृत करते, यामुळे स्नायू आणि अवयवांमध्ये रक्ताभिसरण सुधारते.
२) आले, हर्बल आणि ग्रीन टी यांचा समावेश करा. आले विशेषतः हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. कारण संशोधनात असे दिसून आले आहे की, आल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण १७ टक्के कमी होऊ शकते, शिवाय ट्रायग्लिसराइड्सच्या प्रमाणातही घट होते.
3) नाश्त्यामध्ये डाळिंब, हनी ड्यू टरबूज, खरबूज, सफरचंद आणि नाशपतीची फळे असणे आवश्यक आहे. या सर्वांमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि साखरेचे प्रमाण कमी असते. नैसर्गिकरित्या पिकलेल्या फळांमध्येही खूप साखर असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी कोणतेही फळ खाताना काळजी घेतली पाहिजे.
४) जेवणाच्या २० मिनिटे आधी एक वाटी सॅलेड घ्या. यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, जे तुमची जास्त खाण्याची इच्छा कमी करेल.
५) दुपारच्या जेवणात डाळी (मूग, मसूर, कुळीद इ.) समावेश करा. तसेच बाजरी, ज्वारी आणि नाचणीपासून बनवलेल्या भाकऱ्या खा. भाज्यांमध्ये (दुधी, भोपळा, पालक, मेथी, राजगिरा, फरसबी, फ्लॉवर, मुळा किंवा हंगामी आणि प्रादेशिक भाज्या) खाऊ शकता. तुम्हाला भात आवडत असल्यास, पॉलिश न केलेल्या तांदुळापासून बनवलेला भात खा. यात तांदळाला कोडो बाजरी किंवा फॉक्सटेल बाजरीसारखे पर्याय आहेत. दुपारच्या जेवणात जिरे, हिंग, पुदिना आणि मीठ सोबत दही आणि छास यांचा समावेश करा.
६) तुम्ही संध्याकाळी ग्रीन टी किंवा आलं घातलेल्या चहाचे सेवन करावे, याशिवाय एक वाटी स्प्राउट्स सॅलेड किंवा मखना किंवा ड्राय फ्रूट (भिजवलेले काजू – बदाम/अक्रोड/काळे मनुके) किंवा बिया (सूर्यफूल, तीळ, भोपळ्याचे दाणे) खाऊ शकता.
७) रात्री लवकर आणि हलके जेवण खावे, भाज्या आणि डाळ घातलेले सूप प्यावे. तसेच भोपळा, दुधीसह मूग किंवा मसूर घातलेली खिचडी खावी.
८) झोपण्याच्या फक्त ३० मिनिटे आधी तुमच्या पद्धतीने जायफळ/वेलची/आले/दालचिनी घालून एक कप कोमट दूध प्या.
९) तुमच्या हर्बल प्रोडक्टचा वापर करा. जिरा, ओवा, धणे, हळद, मेथी, बडीशेप, आले, काळी मिरी, पुदिना, कोथिंबीर यांसारखे भारतीय मसाले आणि औषधी वनस्पती वापरणे फायदेशीर आहे.
१०) दिवसभर स्वतःला हायड्रेट ठेवा.
११) ताजे आणि जेवढे खाणार असाल तेवढेच अन्न शिजवा. यात हंगामी आणि प्रादेशिक फळभाज्यांचा समावेश करा.
१२) दिवसातून किमान दोनदा एक चमचे घरच्या घरी बनवलेले गाईचे तूप वापरावे.
१३) गांधीजींच्या आहार पद्धतीमध्ये, खूप दिवसांपासून स्टोअर केलेले, पॅक केलेले पदार्थ, शुद्ध पीठ, साखर, मीठ, संपृक्त चरबीयुक्त पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला आहे. सर्कॅडियन लय पाळणे आणि दररोज त्याच वेळी खाणे खूप महत्वाचे आहे.
१५) रात्री वेळेवर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे या चक्राचे पालन केल्याने पचनक्रिया सुलभ होते आणि तुम्हाला रोजच्या जीवनात फायदा होतो.
डाएट प्लॅन म्हणजे एकप्रकारे निसर्गाशी एकरूप होऊन जगणे, योग्य आहार आणि पोषणाबरोबरच काय खावे, कधी खावे आणि किती खावे याचेही प्रमाण त्यांनी त्यांच्या डाएट प्लॅनमध्ये निश्चित केला होता; यामुळे व्यक्ती निरोगी दीर्घायुष्य राहणे शक्य आहे.
गांधीजींनी निसर्गोपचार रुग्णालय आणि सेवाग्राम उभारले होते, हे फार कमी लोकांना माहीत असेल. त्यांनी शेत नांगरले, कुष्ठरोग्यांची काळजी घेत त्यांचे प्रेमाने संगोपन केले, नैतिक मूल्ये, अन्न, योग या विषयांवर रोज जनजागृती केली, लोकांना ध्यान करायला लावले आणि त्यांना चांगल्या मार्गावर नेले.
त्यांनी सहज योग किंवा साध्या योग नित्यक्रमांचा प्रचार केला, ज्याचा प्रत्येकजण स्वीकार करू शकतो. सनबाथ, चिखल/मातीचे स्नान, वॉटर थेरपी यांचे फायदे सांगितले. कारण ते चांगले आरोग्य वाढविण्यास मदत करू शकतात.