Unpeeled Potato Benefits : आपल्यापैकी बऱ्याच लोकांना बटाटा आवडतो. आपण सहसा भाजी बनवताना बटाटा सोलून टाकतो; पण अभिनेत्री भाग्यश्री सांगते की, असे करू नका. न सोललेल्या बटाट्याची भाजी खाल्ल्याने स्नायूंचे दुखणे कमी होते. भाग्यश्रीने तिच्या एका यूट्यूब शॉर्टमध्ये सांगितले आहे, “पोटॅशियम व मॅग्नेशियम यांच्या कमतरतेमुळे आपल्याला क्रॅम्प्स येतात. पोटॅशियम आणि मॅग्नेशियमची मात्रा वाढविण्यासाठी बटाट्याची साल उपयुक्त ठरू शकते.”
बटाट्याच्या सालीमध्ये आवश्यक खनिजे असतात, जी आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. आपल्या दैनंदिन आहारात सालीसह बटाट्यांचा वापर करा. बटाट्याची साल मसाल्यांबरोबर आणखी चविष्ट वाटते.

साहित्य

  • एक चमचा तेल
  • एक चमचा जिरे
  • चिमूटभर हिंग
  • एक चमचा जिरे पावडर
  • एक चमचा लाल मिरची पावडर
  • एक चमचा धणे पावडर
  • एक चमचा आमचूर पावडर
  • सालीसह उकडलेले दोन बटाटे
  • पाणी
  • मीठ

कृती

वरील सर्व मसाले तेलात टाका आणि चांगले परतून घ्या.
त्यानंतर त्यात उकडलेले बटाटे सालीसहित टाका. त्यानंतर त्यात थोडे पाणी आणि चवीनुसार मीठ टाका.
त्यानंतर ही भाजी शिजवून घ्या.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
onion prices loksatta news
कांदा स्वस्त; गृहिणींना दिलासा, आठवडाभरात किलोमागे २० ते २५ रुपयांनी घट
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार
Manikrao Kokate , Manikrao Kokate Chhagan Bhujbal,
छगन भुजबळ यांची समजूत काढण्याचा प्रश्नच नाही, माणिक कोकाटे यांची भावना
potato prices , prices vegetables pune,
आवक वाढल्याने कांदा, मटार, शेवगा, बटाट्याच्या दरात घट
nashik Angry farmers protested on Manmad Yewla Road halting auction due to falling onion prices
येवला बाजार समितीत शेतकऱ्यांकडून लिलाव बंद, मनमाड रस्त्यावर ठिय्या
paneer bhaji recipe
या थंडीत बटाटा आणि कांदा भाजी खाऊन कंटाळलात? मग पनीरची ही नवीकोरी रेसिपी करा ट्राय

हेही वाचा : Low back pain : पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही? डॉक्टरांचं ऐका आणि ‘हे’ पदार्थ पूर्णत: बंद करा

पाहा व्हिडीओ

खरेच ही वरील रेसिपी फायदेशीर आहे का?

मुंबई येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसीन डॉ. ऋतुजा उगममुगले सांगतात, “बटाट्याची साल आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. बटाट्याच्या सालीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे स्नायूंच्या क्रॅम्प्स दूर करण्यास विशेषत: इलेक्ट्रोलाइट संतुलित नसल्यामुळे होणारे शारीरिक त्रास टाळण्यास मदत करते. पोटॅशियममुळे स्नायूंचे कार्य मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच बटाटे मॅग्नेशियमचाही प्रमुख स्रोत आहे. ही खनिजे स्नायूंचे क्रॅम्प्स कमी करण्यास मदत करतात. त्याशिवाय बटाट्याच्या सालीमध्ये भरपूर फायबर असते, जे पचनास मदत करतात.”

बटाट्याची भाजी खाणे किंवा न सोललेले बटाटे खाणे हा पोटॅशियम वाढविण्याचा एक उत्तम सोपा मार्ग आहे आणि त्यामुळे स्नायूंच्या क्रॅम्प्सपासून आराम मिळतो. उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल सांगतात, “न सोललेल्या बटाट्याची भाजी ही फक्त स्नायूंच्या आरोग्यासाठीच नाही, तर संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असते; जी आपल्याला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे देतात.”

“जर डिहायड्रेशन किंवा नीट रक्तप्रवाह होत नसेल आणि यांसारख्या कारणांमुळे क्रॅम्प्स येत असतील, तर त्यासाठी बटाट्याच्या सालीबरोबर भरपूर पाणी पिणे आणि इलेक्ट्रोलाइट्स (पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम) समृद्ध संतुलित आहार घेणे फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे सुरुवातीला क्रॅम्प्सचे कारण शोधा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतर उपचार घ्या”, असे डॉ. ऋतुजा उगममुगले यांनी बजावून सांगितले.

Story img Loader