संक्रातीच्या कार्यक्रमासाठी मिलेनिअल मैत्रिणींचा झूम कॉल सुरु होता. या संक्रांतीसाठी मी ड्रायफ्रूट लाडू केलेत, देविका म्हणाली. उत्तम ! म्हणजे गिल्ट फ्री ट्रीट ! झूम मीटिंगमध्ये सोनल डोळे चमकावत म्हणाली. सगळ्यांनीच पटापट थम्सअपचा अंगठा दर्शविला. तेवढंच संक्रांतीला ग्लॅमर! देविकाने पुष्टी जोडली. पण थोडं ट्रॅडिशनल ठेऊयात, प्राची म्हणाली. त्यावर मी दोन्ही करू. तिळगुळ सध्या ट्रेंडिंग आहेत. कितीतरी परदेशी पदार्थांमध्ये तिळाचं असणं महत्वाचं आहे .
पल्लवी ड्रायफ्रूट लाडू वम्हणजे कॅलरीज किती होतील त्यात? ऋचाने काळजीयुक्त स्वरात विचारलं. या सगळ्यात नेहाने तिचं २०२४ च ड्रायफ्रूट तिळगुळाचं रुपडं सांगितलं आणि कसंबसं निवडक ड्रायफ्रूट आणि फक्त तिळगुळ अशी मान्यता मिळवत आमचा संक्रांतीचा मुख्य पदार्थ ठरला.
संक्रांत ग्लॅमरस यावर माझा मेंदू घुटमळत राहिला. खरं तर सूर्याशी संबंधित कोणताही सण कायम तेजस्वी स्वरूपचं घेऊन येतो. त्यामुळे सूर्य म्हणजे तेज त्याला ग्लॅमरची गरजच काय वगैरे विचार मनात फेर धरू लागले. भारतातल्या विविध भागात वेगेवेगळ्या रूपात साजरी केली जाणारी संक्रात मला दिसू लागली आणि संक्रातीचं स्वयंभू ग्लॅमरस रुप असं माझ्यासमोर अधोरेखित होऊ लागलं.
हेही वाचा : Health Special: हिवाळ्यात उष्ण आहार का करावा?
मकर संक्रांत केवळ भारतातच नव्हे तर नेपाळ, इंडोनेशिया यासारख्या देशात देखील साजरी केली जाते. सलग ३ दिवस साजरा केला जाणारा हा सण वैज्ञानिक आणि आहारशास्त्राच्या दृष्टीनेदेखील अत्यंत महत्वाचा आहे.
वैज्ञानिक भाषेत सूर्याचे दक्षिणायन पूर्ण होऊन उत्तरायण सुरु होते आणि हेच परिभ्रमण मकर संक्रांत म्हणून साजरे केले जाते. वातावरण आणि हवामान बदल याबाबत बोलायचं झालं तर हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागणे मकर संक्रातीपासून सुरु होते. वातावरणातील उष्मा वाढू लागतो आणि गरम होऊ लागतं.
लोहरी , संक्रांत, पोंगल, बिहू अशा विविध नावांनी सूर्याचा हा प्रवास भारतात विविध ठिकाणी साजरा केला जातो.
यादरम्यान मोठा होत जाणारा दिवस आणि आपल्या शरीराला दिवसभर काम करताना आवश्यक असणारी वाढीव ऊर्जा या दोन्ही बाबींचा विचार देखील व्हायला हवा.
हेही वाचा : हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘या’ ७ सुपरफूड्सचा आहारात समावेश करा, शरीराला ठेवा तंदुरुस्त!
संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी! या दिवशी या ऋतूत तयार होणाऱ्या भाज्या , कंदमुळे, तेलबिया एकत्र करून मिश्र भाजी तयार केली जाते. शेती उत्तम व्हावी, सकस उत्पन्न यावे यासाठी देखील मकरसंक्रांतीच्या विशेष महत्व आहे. वेगवेगळ्या भाज्या आणि त्याचे मिश्रण आहारात समाविष्ट करून आहार संपन्नता साजरी केली जाते.
या विचारात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे संतुलित ऊर्जा , प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्धांश असणारी भोगीची भाजी.
पावटा: कोलेस्टेरॉल नसलेली त्यामुळे हृदयासाठी पोषक , उत्तम जीवनसत्त्वे असणारी पचायला हलकी, मनस्वास्थ्य जपणारी , प्रतिबंधक , हाडांचे विकार,
वांगं : हिवाळ्यात उत्तम ऊर्जा देणारे , फायबरयुक्त , आतड्यासाठी उत्तम
गाजर : अ जीवनसत्त्वाने युक्त, उत्तम आणि रुचकर फायबरयुक्त, पोषक
बटाटा : पोटॅशिअम आणि कर्बोदकांनीयुक्त
तीळ : मॅग्नेशियम
संक्रांतीदरम्यात पतंग उडविण्याची परंपरा केवळ सामाजिक एकोपा वाढविते एवढेच नव्हे तर कोवळ्या उन्हात उत्तम सूर्यप्रकाशात उत्तम प्रमाणात ड जीवनसत्त्व मिळू शकते. म्हणजे खरं तर नेहमी १५ ते २० मिनिटे सूर्यप्रकाशात चालण्याचा सल्ला दिला जातो मात्र संक्राती सुमारास असणाऱ्या हिवाळ्यात २ ते ३ तास सूर्यप्रकाश असेल तर अति उत्तम ! या कालावधीमध्ये उत्तम प्रमाणात ड जीवनसत्त्व मिळतेच तसेच हाडांनादेखील मजबुती मिळते. या दरम्यान असणारे सूर्यकिरणं तापदायक नसतात त्यामुळे या ऋतूमध्ये उन्हाचा त्रास होत नाही.
संक्रांतीला तिळगुळाचे सेवन केले जाते. ऋतुमानात बदलांमध्ये आपल्या शरीरातील ऊर्जा विशेषतः रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी या दोन्ही पदार्थांचा उपयोग होतो. कमीत कमी प्रमाणात अन्नपदार्थ खाऊन जास्तीत जास्त शारीरिक फायदे मिळावेत म्हणून तिळाचे पदार्थ खाणे पोषक मानले जाते. मेंदूपासून ते पायापर्यंत मानवासाठी सर्वांगीण पोषण करत साजरी केली जाणारी मकरसंक्रात खऱ्या अर्थाने तेजोनिधीचा खरा ग्लॅमरस सण आहे.