मखाना हे अशा ड्रायफ्रुट्सपैकी एक आहे, जे आरोग्यदायी तसेच चवदार आहे. भारतात जम्मु-काश्मिर, मिझोरम, हिमाचल बिहार या राज्यांमध्ये अगदी आपण जसे गहु बाजरी ज्वारीचे पिक घेतो तसे या मखान्यांची शेती केली जाते. हेल्थ कॉन्शस लोकांकडून सगळ्यात मागणी व खाण्याच्या उपयोगात मखानेचा वापर केला जातो. मखानाला मराठीमध्ये मखने असे म्हणतात. हा मखाना ज्यांना सारखी भूक लागते त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त आहे, कारण हा भूक सुद्धा भागवतो आणि शरीरावर दुष्परिणाम सुद्धा करत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तज्ज्ञांच्या मते, मखाणा हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. मखाणा खाण्यास चविष्ट तर आहेच, शिवाय तो शरीरासाठीही फायदेशीर आहे. मखाणेमध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस देखील मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. बरेचसे लोक मखाना म्हणजे कमळाचेच बी असते असे म्हणतात. मात्र हे चुकीचे आहे मखानाचे रोप हे अगदी कमळासारखेच काटेदार असते व पाण्यात उगवते मात्र मखानाचे झाड हे पूर्णतः वेगळे असते.
(हे ही वाचा : करोनाची लागण झालेल्या व्यक्तींचा रक्तदाब वाढू शकतो का? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर )
मखाण्यामध्ये खालील पौष्टिक घटक
कॅलरीज: ३४७
कोलेस्टेरॉल: ० ग्रॅम
सोडियम: १ मिलीग्राम
एकूण कर्बोदके: ७६ ग्रॅम
साखर: ० ग्रॅम
एकूण चरबी: ०.९ ग्रॅम
संतृप्त चरबी: ०.२ ग्रॅम
मोनोसॅच्युरेटेड फॅट: ०.३ ग्रॅम
पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट: ०.२ ग्रॅम
प्रथिने: ९ ग्रॅम
मखणामध्ये प्रथिनांचे चांगले प्रमाण आढळते. १०० ग्रॅम मखाण्यांमध्ये जवळपास ३४७ कॅलरी असतात. याच्या सेवनामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरात फॅट्स वाढत नाही. मखणा खाण्याच्या फायद्यांमध्ये प्रोटीनची कमतरता पूर्ण करणे देखील समाविष्ट आहे. सुक्या मेव्यामध्ये समाविष्ट असलेला मखाना भारतात तसेच जगभरात वापरला जातो. मखाना चवीसोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. मखाना मुळे शारीरिक शक्ती वाढते. ज्या पुरुषांना वीर्याशी संबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी मखनाचे सेवन फायदेशीर आहे. याच्या सेवनाने वीर्य दोष दूर होतात, असेही सांगितले जाते. मखाना दररोज सेवन केल्यास स्टेस्टेस्टोरेन हार्मोन्सची पातळी वाढू शकते, म्हणून पुरुषांना दररोज मूठभर मखाना खाण्याचा सल्ला दिला जातो.
मखाणा खाण्याचे फायदे
- रिकाम्या पोटी मखाना खाल्ल्याने रक्तातील शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. हे मधुमेहींसाठी उत्तम खाद्य मानले जाते.
- मखाना केवळ मधुमेहींसाठीच्या रुग्णांसाठीच नाही तर हृदयविकाराच्या गंभीर आजारातही फायदेशीर आहे. त्यांचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते आणि पचनसंस्थाही निरोगी राहते.
- तुम्हाला तुमच्या वजन वाढीची काळजी वाटत असेल तर मखानाचा नाश्ता हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. हे प्रथिनांनी युक्त असल्याने शरीराला पोषण देते. एक मूठभर मखाणा खाल्ल्यानंतर शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते.
- मखानामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे ते पचन प्रक्रिया आणि चयापचय प्रोत्साहन देते. याशिवाय अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या टाळतात.
- गरोदरपणात मखाना हा आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर आहे. हे खाल्याने गरोदर महिलांना सर्व आवश्यक पोषकतत्त्वं मिळतात. याच्या सेवनाने शारीरिक कमकुवतपणा दूर होऊन थकवा दूर होतो.
- मखाना खाण्याचा हा सगळ्यात मोठा फायदा, जे लोक मखाना खातात त्यांच्या शरीरात मखाना द्वारे जास्त प्रमाणात अँटीऑक्सीडेंट वाढते.
- पचन क्रिया सुधारण्यासाठी मखाणे फारच उपयुक्त ठरतात. मखाण्यांमध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असतं. पचन क्रिया सुधारण्यासाठी , पोट स्वच्छ होण्यासाठी मखाणे खाणं फायदेशीर ठरतं.
मखानामध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स आहेत, ज्यामुळे मखाना एक वृद्धत्वविरोधी अन्न आहे. तर मुठभर मखाना खाल्ल्याने, आपल्या चेहऱ्यावर चमक दिसून येते. या व्यतिरिक्त ते आपल्याला तरुण दिसण्यास मदत करू शकते. एकूणच महिलांच्या आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी मखाणे खाणं फायदेशीर असल्याचं आहार तज्ज्ञ सांगतात.